Freshwater Research: पिण्यायोग्य गोड पाणी हे शेती सिंचनासोबतच मानवाच्या एकूणच अस्तित्वासाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या ७६ टक्के पाणी हे समुद्रामध्ये असून, ते खारे असल्याने वापरता येत नाही. भविष्यामध्ये सर्वाधिक युद्धे ही पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावरून होतील, असे अंदाज विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ नेहमीच व्यक्त करत आले आहेत. अशा स्थितीमध्ये न्यू इंग्लंड जवळच्या नानटकेट येथील समुद्राखालील थरामध्ये गोड्या पाण्याचा एक साठा ऱ्होड्स आयलंड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या गटाला मिळाला आहे..कोलोरॅडो स्कूल ऑफ माइन्स येथील शास्त्रज्ञ ब्रॅण्डन दुगान आणि ऱ्होड्स आयलंड विद्यापीठातील रिबेका रॉबिनसन यांच्यासह गटाने नानटकेट समुद्रकिनारी केलेल्या खोदाईमध्ये पिण्यायोग्य दर्जाच्या जवळचे पाणी असलेला साठा मिळाला आहे. हा गोड्या पाण्याचा साठा समुद्राच्या इतक्या जवळ आला कोठून, कधीपासून आणि त्याचे नेमके प्रमाण किती, असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्याची उत्तरे मिळविण्यासाठी ऱ्होड्स आयलंड विद्यापीठातील रिबेका रॉबिनसन या पाणीसाठ्याचे वय मिळविण्यासाठी समुद्रालगतच्या तीन ठिकाणावरून पाणी व विविध खनिजांचे विश्लेषण करून नायट्रोजन चक्राचा मागोवा घेत आहेत..न्यू इंग्लंडमध्ये केल्या गेलेल्या या खोदाईला (शेल्फ हायड्रोजिओलॉजी एक्सपिडिशन) दिशा देण्यासंदर्भात महत्त्वाच्या तीन शास्त्रज्ञांपैकी रिबेका रॉबिन्सन या एक आहेत. या संपूर्ण खोदाई प्रकल्पामध्ये विविध देश आणि शास्त्र शाखांमधील सुमारे ७१ शास्त्रज्ञ एकत्रितरीत्या काम करत आहेत. समुद्रांमध्ये एकूण ७४ दिवस केलेल्या खोदाई (ड्रीलिंग) नंतर या गटाला गोड्या पाण्याचा आणि चिखलाचा साठा समुद्राच्या तळाशी मिळून आला आहे. त्यांनी घेतलेल्या ७१८ छिद्रांचा एकत्रित विचार केला असता त्याची एकत्रित लांबी ही ८७१ मीटरपेक्षा अधिक होते..Agriculture Technology: मजुरी, वेळेत बचत करणारे ऊसतोडणी यंत्र.न्यू इंग्लंडच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या गाळांमध्ये क्षारांचे प्रमाण नेहमीप्रमाणेच असले तरी त्याखालील थरामध्ये मात्र गोड्या पाण्याचा साठा मिळाला आहे. रॉबिन्सन यांच्या मते, अशा प्रकारे पिण्यायोग्य गोडे पाणी सागराच्या तळाखाली मिळणे ही असामान्य बाब आहे. त्यामुळे त्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळांमध्ये भूरासायनिक अभ्यास केला जात आहे. त्यातून गुणधर्माबरोबरच पाणी साठ्याचा इतिहास, वय इ. माहिती उपलब्ध होणार आहे..खोदाईतील आव्हाने आणि यशयुरोपियन कन्सोर्शिअम फॉर ओशन रिसर्च यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय सागरी खुदाई प्रकल्प (IODP³) यांच्या अंतर्गत समुद्राच्या तळाशी खोदाईचे काम करण्यात आले. त्यासाठी १८५ फूट लांबीच्या लिफ्टबोटवर लहान आकाराच्या ड्रीलिंग रिग बसविण्यात आल्या होत्या. त्याच्या साह्याने समुद्राच्या खालील वेगवेगळ्या थरातून (subseafloor depths) ५० हजार लिटर पाणी बाहेर काढण्यात आले. .पण प्रचंड खोलीवरून मोठ्या प्रमाणात भूजल बाहेर काढणे हे आव्हानात्मक ठरणार आहे. त्यासाठीच्या विहिरी या स्थिर केल्याशिवाय असे प्रयत्न केल्यास त्यात बाजूचा गाळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोरणात्मक पातळीवर जिथे आम्ही खोदाई करत होते, त्या जागा, ठेवलेला पंपिंगचा वेग आणि उपकरणातून वाहणाऱ्या प्रवाहाचा दर निश्चित करण्यात आला होता. त्यात सातत्याने बदलत असलेल्या घटकांबाबत अद्याप अनेक बाबी शिकत आहोत, असे रॉबिन्सन यांनी सांगितले..Agriculture Research: चिकू बियांपासून स्टीमबायोटिक विकसित.नायट्रोजन चक्राचा इतिहासरॉबिन्सन म्हणाल्या, की आम्ही करत असलेली खोदाई आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचे नमुने मिळविण्यात आलेले यश यामुळे सध्या तरी आनंदाचे वातावरण आहे. पण या भूजलाचा मूळ स्रोत आणि त्याच्या इतिहासाबाबत अधिक अभ्यास करण्यात येत आहे. त्यासाठी पाण्यातील नायट्रोजन चक्राचा आणि त्याचा गोड्या पाण्यावर नेमका कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. कारण बहुतांश सर्व सजीवांच्या जीवनचक्रामध्ये नायट्रोजन हा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. त्यामुळे नायट्रोजन चक्राच्या विविध टप्प्यांवर विविध प्रकार्चाय सूक्ष्मजैविक प्रक्रिया होत असतात. त्यातून आपल्याला या पाण्याचा इतिहास कळणे शक्य होईल..त्याच प्रमाणे त्याची तीव्रता मोजली जाईल. मास स्पेक्ट्रोमीटरच्या साह्याने नायट्रोजनच्या आयसोटोपिक संरचना मोजण्यात येतील. त्यानंतर अन्य शास्त्रज्ञ कार्बन १४ आणि हेलियम ४ या किरणोत्सारी आयसोटोपचा वापर करून पाण्याचे वय काढतील..जगासाठी खुले संशोधनया खोदाईमध्ये मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कोलोरॅडो स्कूल ऑफ माइन्सचे प्रो. ब्रॅण्डन दुगान आणि मॅसेच्युसेट्स बोस्टन विद्यापीठातील प्रो. कॅरेन जोहान्नेस्सोन यांनी काम पाहिले. जर्मनी येथील ब्रेमेन विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा गट जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये पूर्णवेळ या खोदाईवर संशोधन करणार आहे. त्यातून माहिती मिळवून त्यावर आधारित प्राथमिक अहवाल तयार करतील. हे संपूर्ण संशोधन व निष्कर्ष जगभरातील शास्त्रज्ञांसाठी एक वर्षानंतर संपूर्णपणे खुले केले जातील. या खोदाईसाठी IODP³ आणि राष्ट्रीय शास्त्र फाउंडेशनने सहकार्य केले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.