Fish Processing Business: मत्स्य प्रक्रिया व्यवसायासाठी क्लाउड किचन, फूड ट्रक
Cloud Kitchen Business: बाजारपेठेत तयार मत्स्य प्रक्रिया पदार्थ, क्लाउड किचन आणि फूड ट्रक ही मॉडेल्स लोकप्रिय होत आहेत. मत्स्य उत्पादनांवर आधारित क्लाउड किचन उभारल्यास, मत्स्य व्यवसायाचे मूल्यवर्धन करता येते. फिश फ्राय, फिश करी, मत्स्य कबाब, पकोडे, फिश बर्गर असे विविध पदार्थ तयार करून स्थानिक बाजारपेठेत तसेच मोठ्या शहरात पाठवता येतात.