Profitable Goat Farming: म्हातारगाव (ता. धारूर, जि. बीड) येथील बाबासाहेब किसनराव कुकडे यांनी शेतीच्या बरोबरीने बीटल शेळीपालनामध्ये स्वतःची ओळख तयार केली आहे. जातिवंत पैदास, शास्त्रशुद्ध व्यवस्थापनावर त्यांचा भर आहे. शेळ्यांची वयोमानानुसार कप्प्यांमध्ये विभागणी आणि करडांच्या संगोपनासाठी मचाण पद्धतीतून त्यांनी मरतूक नियंत्रणात आली. तंत्रज्ञानाचा अवलंब आणि काटेकोर व्यवस्थापनातून बीटल शेळीपालन किफायतशीर ठरले आहे..म्हातारगाव (ता. धारूर, जि. बीड) येथील बाबासाहेब कुकडे यांच्याकडे सुमारे १३ एकर शेती. कुटुंबात सुमारे १२ सदस्य. मोठा मुलगा त्र्यंबक हा शेतीची जबाबदारी पाहतो. लहान मुलगा विक्रम हा शेळीपालनाची जबाबदारी सांभाळतो. बाबासाहेबांच्या पत्नी हरीबाई आणि सुना सविता, सोनाली या तिघी णी शेळीपालन आणि शेतीकामातही आघाडीवर आहेत..बाबासाहेब कुकडे यांनी २०११ मध्ये पहिल्यांदा पाच उस्मानाबादी शेळ्या घेऊन पूरक उद्योगाला सुरुवात केली. साधारणतः २०२० पर्यंत उस्मानाबादी शेळीपालन सुरू होते.सुमारे १०० पर्यंत उस्मानाबादी शेळ्या त्यांच्या गोठ्यात होत्या. त्याच वेळी बाजाराचा अंदाज आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन २०२० मध्ये त्यांनी १० जातिवंत बीटल शेळ्यांच्या संगोपनास सुरुवात केली..Goat Farming: मामा, भाच्याचे किफायतशीर शेळीपालन.जातिवंत पैदाशीचा बोकडपैदास धोरणाबाबत बाबासाहेब म्हणाले, की शेळीपालनात यशस्वी होण्यासाठी पैदाशीचा बोकड बदलणे अत्यावश्यक असते. त्यासाठी दर दोन वर्षांनी जातिवंत पैदाशीचा बोकड बदलला जातो. आता त्यांच्या प्रकल्पामध्ये दोन जातिवंत बोकड आहेत. अलीकडेच एक नवीन सात महिन्यांचा बोकड त्यांनी आणला आहे. पैदाशीचा बोकड बदलल्यामुळे शेळ्यांतील व्यंग, दूध कमतरतेसह होणाऱ्या आजारावर नियंत्रण मिळाले आहे..पोषक आहारावर भरशेळ्यांना पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी बाबासाहेबांनी एक एकरावर सुबाभूळ लागवड केली आहे. याशिवाय अर्धा एकर मेथी घास, नेपिअर गवत आणि हंगामी चारा पिकाची लागवड असते. सकाळी आठ वाजता खुराक, त्यानंतर सुका चारा, दुपारी मका किंवा मुरघास, संध्याकाळी सुबाभळीचा पाला किंवा हिरवा चारा दिला जातो. खुराकामध्ये मका भरडा, सोयाबीन चुरी, चना चुन्नी, शेंगदाणा पेंड एकत्रितपणे प्रति शेळी २५० ते ३०० ग्रॅम दररोज दिली जाते..शेळ्यांची विभागणीवयोमानानुसार शेळ्यांची विभागणी कप्प्यांमध्ये करणे फायद्याचे ठरले आहे. गाभण असलेल्या शेळ्यांची विशेष खबरदारी घ्यावी लागते. आक्रमक शेळीचा मार गाभण शेळीच्या पोटात लागल्यास शेळीचा गर्भपात होतो. त्यामुळे गाभण शेळ्यांची पाच महिने खबरदारी घ्यावी लागते. विण्याआधी दोन महिने ही खबरदारी जास्त असते. त्यामुळे अनुभवानुसार कप्प्यांच्या रचनेत गाभण शेळ्यांचा कप्पा महत्त्वाचा ठरला आहे. गाभण शेळ्या एका कप्प्यात ठेवल्याने त्या कप्प्यातील सर्व शेळ्यांची हालचाल सारखीच राहते..कुटुंबाची प्रगतीशेती आणि पूरक उद्योगाच्या भरवशावर आतापर्यंत कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासोबतच प्रशस्त घराची वास्तू उभी राहिली आहे. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा भार शेती आणि शेळीपालनाच्या पूरक उद्योगावरच अवलंबून आहे. बाबासाहेबांचा मोठा मुलगा त्र्यंबक यांच्या दोन मुलींपैकी एक डी फार्म तर दुसरी बी फार्म शिक्षण घेते. मुलगा बारावीला शिकतो. लहान मुलगा विक्रम यांचा मुलगा सहावी, तर मुलगी तिसरीमध्ये आहे. अवर्षणप्रवण भाग, हलकी जमीन, सिंचनाची अपुरी सोय यामुळे बाबासाहेब कुकडे शेळीपालनाकडे वळले. त्या शेळीपालनाला जीव लावला, सातत्य ठेवले त्यामुळे आजच्या घडीला त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणाचा मुख्य आधार शेळीपालन बनले आहे..Goat Farming : बंदिस्त शेळीपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर.शेती, शेळीपालनाचा प्रवासदरवर्षी तीन एकरावर टोमॅटो लागवड.पाच ते सात वर्षांपासून खरबूज लागवडीवर भर.सिंचनासाठी दोन विहिरी, दोन कूपनलिका.जल, मृदा संधारण, जमीन सुपीकतेवर भर.सुका चारा साठविण्यासाठी २० बाय ३० फुटाचे गोदाम.२० जणांना शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन.दरवर्षी १५ ते २० ट्रॉली लेंडी खत. या खतामुळे रासायनिक खतांच्या वापरात बचत.विविध बाजारपेठेत शेतीमाल विक्रीसाठी नेण्यासाठी वाहनाची सोय..शेडमधील कप्प्याचे तंत्रबीटल शेळी संगोपन सुरू केल्यानंतर बाबासाहेबांनी ६० बाय ८० फुटांचे प्रशस्त शेड उभारले. एका कप्प्यात किमान २५ शेळ्या, अशा पद्धतीने सुमारे १५० शेळ्यांचे संगोपन करण्याची क्षमता या शेडमध्ये तयार झाली. पूर्व-पश्चिम ६० फूट आणि दक्षिण-उत्तर ८० फूट असे शेड आहे. शेडच्या रचनेत २० फुटांचा एक या प्रमाणात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन मिळून सहा कप्पे तयार केले..कप्प्यांमध्ये चाऱ्यासाठी गव्हाणी, पाण्यासाठी भांडे, चाटण वीट आदींची व्यवस्था केली. एकाच वयाच्या शेळ्या एका कप्प्यात, माद्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था, व्यायलेल्या शेळ्या वेगळ्या, गाभण शेळ्या वेगळ्या ठेवण्याचे तंत्र अवलंबिले. त्यामुळे शेळ्यांमधील टकरी टळल्या. सारख्या वयांच्या शेळ्यांचे चारा, पाणी, खुराक व इतर व्यवस्थापन करणे सोपे झाले..करडांच्या संगोपनासाठी मचाण व्यवस्थाउस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन करत असताना करडांची मरतूक मोठ्या प्रमाणावर व्हायची. जमिनीवर वावरणारे करडू माती खायचे, त्यातून पोटाचे आजार होऊन त्यांचा मृत्यू व्हायचा. ही बाब बाबासाहेबांच्या लक्षात आली. यावर पर्याय म्हणून बाबासाहेबांनी शेडमध्येच मचाणरूपी कप्पा तयार केला. करडांचा जन्म झाला, की त्यांना जमिनीपासून काही फूट उंचीवर असलेल्या मचाणामधील कप्प्यात सुमारे दीड महिन्यापर्यंत ठेवले जाते. साधारणपणे दीड- पावणेदोन महिन्यापर्यंत करडांचा जमिनीशी फारसा संपर्क होणार नाही, अशी व्यवस्था केली. योग्य व्यवस्थापन, लसीकरण, आहार नियोजन केल्यामुळे करडांच्या मरतुकीचे प्रमाण शून्यावर आले आहे..‘लक्ष्मी’चा सन्मान : सध्या सुमारे ७० बीटल शेळ्या असलेल्या बाबासाहेबांच्या शेळीपालन शेडमध्ये एका उस्मानाबादी शेळी असून तिचा मान वेगळा आहे. सुरुवातीला पाच उस्मानाबादी शेळ्यांपासून २०११ मध्ये पूरक उद्योगाला बाबासाहेबांनी सुरुवात केली. त्या पहिल्या पाच शेळ्यांपैकी ही एक शेळी आहे. याच ‘लक्ष्मी’ शेळीने जालना येथे २०१९ मध्ये झालेल्या पशुप्रदर्शनात उस्मानाबादी शेळी गटामध्ये राज्यातून पहिला क्रमांक मिळवून दिला. त्या वेळी तत्कालीन मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते बाबासाहेबांना २५ हजारांचा धनादेश व सन्मानपत्र मिळाले. तिचे जीवनातील स्थान अधोरेखित करताना बाबासाहेबांच्या डोळ्यांमध्ये आजही पाणी येते. कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे काळजी घेतली जाते. ही उस्मानाबादी शेळी विकणे हा विषय त्यांच्या मनाला आजपर्यंत शिवलेला नाही.-बाबासाहेब कुकडे ८००७३२८६८२ विक्रम कुकडे ७८७५९२९५२५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.