डॉ. सिद्धया जी. म., डॉ. राखी कुमारी, डॉ. अजित चौधरीBlack Soldier Fly Conservation: ‘ब्लॅक सोल्जर फ्लाय’च्या (बीएसएफ) अळ्या प्राण्यांच्या खाद्यातील पारंपरिक प्रथिन स्रोतांना एक उत्तम शाश्वत पर्याय आहेत. सेंद्रिय कचऱ्याचे उच्चमूल्य असलेल्या पोषक तत्त्वांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता, त्यामुळे होणारे पर्यावरणीय आणि आर्थिक फायदे लक्षात घेता भविष्यात बीएसएफ माशीच्या अळ्यांचे संवर्धन उपयोगी ठरणार आहे. .जागतिक स्तरावर लोकसंख्येचा दर ज्या गतीने दिवसेंदिवस वाढत आहे आणि या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या अन्न सुरक्षेचा दबाव कृषी आणि सलग्न क्षेत्रावर उत्पादन वाढीसाठी सातत्याने होत आहे. पारंपरिक अन्न उत्पादन स्रोतांच्यासाहाय्याने भविष्यातील अन्न सुरक्षेची पूर्तता करणे शक्य होणार नाही; त्यासाठी काळानुरूप या प्रणालीमध्ये पर्यायी अन्न उत्पादन स्रोतांचा समावेश करावा लागेल. सध्याच्या घडीला बीएसएफ माशीच्या अळ्यांचा पशुपालन, कुक्कुटपालन आणि मत्स्यसंवर्धन करण्यासाठी लागणाऱ्या खाद्यामध्ये एक पर्यायी प्रथिने स्रोत म्हणून वापर होत आहे..Fish Processing: मत्स्य प्रक्रिया, मूल्यवर्धनातील संधी.ब्लॅक सोल्जर माशीच्या अळ्याबीएसएफ (हर्मेटिया इल्युसेन्स) ही एक कीटक वंशाची, आक्रमक नसलेली माशीची प्रजाती आहे; या माशीचे मूळ अमेरिकेत आहे; परंतु आता ती जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते.प्रौढ माशी फक्त काही दिवस (६-१० दिवस) जगते आणि ती जास्त काही खातही नाही, परंतु त्यांच्या अळ्या जैविक कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात, परिणामस्वरूप त्यांच्या शरीरामध्ये उच्च-गुणवत्तेची प्रथिने, मेद आणि इतर मौल्यवान पोषक तत्त्वे तयार होतात..मत्स्य संवर्धनामध्ये बीएसएफ अळ्यांचा वापरमत्स्य संवर्धनामध्ये या बीएसएफ अळ्यांचा वापर करून तयार केलेले खाद्य सालमन, ट्राउट, सामान्य कार्प, गवत्या मासा, तिलापिया, शिंगाळे मासे, जिताडे जातीचे मासे, वाम, इत्यादी प्रकारच्या थंड प्रदेशातील, गोड्या पाण्यातील, निम-खाऱ्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील माश्यांसाठी वापरण्यात आले. विविध प्रयोगातून या माशांची उत्तमरीत्या वाढ झाल्याची दिसून आली..पर्यावरणीय आणि आर्थिक फायदेजैविक कचऱ्याचा योग्य वापरबीएसएफ अळ्या अन्न कचरा, शेती उप-उत्पादने आणि खत यासारख्या विविध प्रकारच्या सेंद्रिय कचरा पदार्थांचे सेवन करू शकतात. यामुळे जमिनीवरील जैविक कचऱ्याचा भार आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यासही मदत होऊ शकते.उच्च अन्न रूपांतरण कार्यक्षमताबीएसएफच्या अळ्या सेंद्रिय पदार्थांचे बायोमासमध्ये अतिशय कार्यक्षमतेने रूपांतर करतात. त्यांना पारंपरिक पशुधन किंवा सोया उत्पादनापेक्षा खूपच कमी जमीन, पाणी आणि ऊर्जा लागते..Fish Processing Business: मत्स्य प्रक्रिया व्यवसायासाठी क्लाउड किचन, फूड ट्रक.स्थानिक स्तरावर अधिक उत्पादन करण्याची क्षमताबीएसएफचे पालन लहान किंवा मोठ्या प्रमाणात केले जाऊ शकते, ज्यामुळे शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागातही उत्पादन सहज शक्य आहे.इतर संभाव्य उपयुक्तताखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अळ्यांव्यतिरिक्त, अवशेष (विष्ठा) उच्च-गुणवत्तेचे सेंद्रिय खत म्हणून वापरले जाऊ शकते. सुकविलेल्या अळ्यांपासून बोयोडिझेल सुद्धा तयार केले जाऊ शकते..अळीचे जीवनचक्रबीएसएफ चे जीवनचक्र हे अंडी, अळी, कोश आणि प्रौढ माशी या विविध टप्प्यांतून जाते.कोंबडी आणि मत्स्य खाद्यात या अळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.अळ्या हे सफाई कामगाराप्रमाणे अन्नाचे तुकडे, शेतीतील उप-उत्पादने आणि सेंद्रिय खत यासारखा जैविक कचरा खाद्य म्हणून सेवन करतात..बीएसएफ अळ्यांमध्ये असलेले पौष्टिक घटकबीएसएफच्या अळ्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात, या वैशिष्ट्यांमुळे ते पशुपालन, कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन करताना वापरल्या जाणाऱ्या खाद्यांसाठी अत्यंत योग्य घटक आहेत.पोषक घटक अंदाजे प्रमाण (टक्के कोरडे पदार्थ)प्रथिने ४०-६२मेद/चरबी युक्त पदार्थ १०-३०कार्बोदके ३-७कुल राख ७-१५तंतुमय पदार्थ ५-८- डॉ. अजित चौधरी ८३२९८७९५९३(केंद्रीय गोडे पाणी मत्स्य संवर्धन संस्था, भुवनेश्वर, ओडिशा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.