सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे सुधारित वाण,त्या अनुषंगाने बीबीएफ तंत्रज्ञान व लागवड पद्धती यांचा प्रसार अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत केला आहे. प्रात्यक्षिके व प्रशिक्षणातून शेतकरी या तंत्राचा चांगला उपयोग करीत असूनत्याचे फायदेही त्यांना मिळत आहेत.
सुधारित रुंद वरंबा सरी यंत्राव्दारे पेरणी केलेले हस्नापूर (ता.परभणी) शिवारातील महेश शेळके यांचे सोयाबीन.
सुधारित रुंद वरंबा सरी यंत्राव्दारे पेरणी केलेले हस्नापूर (ता.परभणी) शिवारातील महेश शेळके यांचे सोयाबीन.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे सुधारित वाण, त्या अनुषंगाने बीबीएफ तंत्रज्ञान व लागवड पद्धती यांचा प्रसार अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत केला आहे. प्रात्यक्षिके व प्रशिक्षणातून शेतकरी या तंत्राचा चांगला उपयोग करीत असून त्याचे फायदेही त्यांना मिळत आहेत.   परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आपले तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचवले आहे. येथील सोयाबीन संशोधन केंद्राने ४७ वर्षांच्या कालावधीत सोयाबीनचे ११ वाण राज्यासह देशाच्या विविध भागांसाठी प्रसारित केले. त्यात एमएयुएस ७१, एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, एमएयुएस ६१२ हे वाण बियाणे साखळीत (सीड चेन) आहेत. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातर्फे प्रक्षेत्रावर २०१४-१५ ते २०१६ -१७ या कालावधीत रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ) पेरणी प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यातून एकरी उत्पादकता वाढतेच. शिवाय मूलस्थानी जलसंधारण होत असल्याने कोरडवाहू क्षेत्रासाठी या तंत्राचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली. सोबतच केंद्रातर्फे मराठवाडा विभागातील ट्रॅक्टर मालक चालकांसाठी बीबीएफ यंत्र जोडणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास मदत झाली. अशी घडली प्रात्यक्षिके विद्यापीठातील कृषी यंत्रशक्ती विभाग आणि हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र यांनी संयुक्तरित्या पाच फणी बहुउद्देशीय रुंद वरंबा सरी यंत्र विकसित केले आहे. याव्दारे पेरणी, रासणी, फवारणी तसेच कोळपणी करता येते. कृषी विभागाच्या सहकार्याने गेल्यावर्षी (२०२० )आणि यंदा (२०२१) परभणी तालुक्यातील ४० ते ४५ गावांत सुमारे १५० एकरांवर याव्दारे शेतकऱ्यांना पेरणी करून देण्यात आली. त्याबाबतचे शेतकऱ्यांचे अनुभव सकारात्मक आहेत. यंत्राच्या व्यावसायिक निर्मितीसाठी एका खासगी कंपनीसोबत सामंजस्य करारही करण्यात आला. यंदा परभणी तालुक्यात सुमारे ३०० एकरांवर या यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी झाली. काही निवडक गावातील शेतकऱ्यांना फवारणीचेही प्रात्यक्षिक दिल्याचे संशोधक अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी सांगितले. शेतकरी अनुभव गेल्या तीन वर्षांपासून खरीप हंगामात सोयाबीनच्या एमएयुएस ६१२ वाणाची बैलचलित पेरणी यंत्राव्दारे दोन ओळीमध्ये १४ इंच अंतर ठेवून पेरणी करतो. एकरी १४ ते १५ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत आहे. तीन वर्षांपासून याच वाणाचे उन्हाळी हंगामात एकरी ७ ते ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. -गणेशराव ढगे, परभणी ९६७३१११०४८   गेल्यावर्षी पासून रुंद वरंबा सरी पद्धतीने एक एकरावर सोयाबीन पेरणी करीत आहे. एकरी १६ ते १७ किलो बियाणे लागते. एकरी १२ ते १३ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे. गेल्या महिन्यात आमच्या मंडळात अतिवृष्टी झाली. मात्र तंत्राचा वापर केल्याने सऱ्यांमधून अतिरिक्त पाणी वाहून गेले. जमीन लवकर वाफशावर आली. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले नाही. -जनार्दन आवरगंड माखणी,ता..पूर्णा, जि..परभणी ९६५७२४०२६३   आम्ही शेतकरी संघामार्फत उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनचे सुमारे दोन हजार एकरांवर बीजोत्पादन घेत असतो. त्यात परभणी विद्यापीठाच्या एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, एमएयुएस ६१२या वाणांचे क्षेत्र सुमारे अडीचशे एकरांपर्यंत असते. एमएयुएस ६१२ हा वाण अधिक उत्पादन देणारा आहे. परतीच्या पावसात भिजल्यानंतर बुरशीस प्रतिकारक्षम तसेच शेंगांमध्ये कमी उगवणशक्ती असलेले वाण विकसित करण्याच्या संशोधनावर भर द्यावा.बीबीएफ तंत्रज्ञानही अनेक बाबतीत फायदेशीर ठरले आहे. -ॲड. अमोल रणदिवे, उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट सीड फेडरेशन, सारोळा बुद्रूक, जि..उस्मानाबाद ९८८१३०३१२८ विद्यापीठाने प्रसारित केलेल्या सोयाबीनच्या विविध वाणांचे बिजोत्पादन १० ते १२ एकरांवर घेतो. सन २०१४ पासून बीबीएफ तंत्राचा अंगीकार केला आहे. त्यामुळे दर एकरी बियाणे कमी लागते. उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एमएयुएस ६१२ वाणाचे चांगले उत्पादन मिळत आहे. -मंगेश देशमुख, पेडगाव, जि..परभणी. ९९६०३१०३५८   ५० एकरांपैकी ३० एकरांवर सोयाबीन घेतो. दहा वर्षापासून विद्यापीठाच्या विविध वाणांचे उत्पादन घेतो. एमएयुएस ६१२ हा वाण किडी- रोगांना प्रतिकारक्षम व उत्पादनाच्या बाबतीत चांगला आढळला आहे. -अनंतराव गायकवाड, शेतकरी, हलगरा,ता..निलंगा, जि..लातूर.   यंदा ७० एकरांवर सोयाबीन पेरणी केली आहे. विद्यापीठाच्या संशोधन केंद्राने केलेल्या शिफारसींनुसार पीक व्यवस्थापन करतो. -मोनिका शर्मा, खडेपुरी, जि..जालना   माझी ३८ एकर शेती आहे. गेल्यावर्षी तीन एकरांवर विद्यापीठाच्या सुधारित यंत्राव्दारे पेरणी केली. चांगले उत्पादन मिळाले. यंदा २८ एकरांवर सोयाबीनची बीबीएफ तंत्राद्वारे पेरणी केली. त्यात एमएयुएस ६१२ वाणाचे क्षेत्र सहा एकर आहे. -महेश शेळके,९८९०६९१२१९ हस्नापूर, जि..परभणी. विद्यापीठाचे वाण व यंत्र याव्दारे सोयाबीन उत्पादनात आर्थिक क्रांती होण्यास मदत झाली. -डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.   राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर लोकप्रिय ठरलेल्या सोयाबीन वाणांच्या पैदासकार बियाण्याचा पुरवठा बियाणे महामंडळ तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना केला जातो. येत्या सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन विषयावर कार्यशाळा घेणार आहोत. -डॉ.दत्तप्रसाद वासकर, संशोधन संचालक,   सोयाबीनचे वाण विकसित करणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. हवामान बदलानुसार अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करण्यावर भर दिला जात आहे. यंदा शेंगा खाण्यायोग्य म्हणजे ‘व्हेजिटेबल सोयाबीन’ वाणाच्या चाचण्या घेत आहोत. -डॉ. एस..पी..म्हेत्रे, प्रभारी अधिकारी सोयाबीन पैदासकार (विद्यापीठ) ७५८८१५६२१०, ९४२१४६२२८२ संपर्क- डॉ.स्मिता सोलंकी- ८००७७५२५२६ (कृषी यंत्रशक्ती विभाग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com