पोल्ट्री वेस्टपासून बायोगॅस निर्मिती

पोल्ट्री वेस्टपासून बायोगॅस निर्मिती
पोल्ट्री वेस्टपासून बायोगॅस निर्मिती

भारतात दरवर्षी २८ ते ३० दशलक्ष टन इतकी कोंबड्यांची विष्टा तसेच इतर टाकाऊ पदार्थ (पोल्ट्री वेस्ट) कुक्कुटपालन उद्योगातून निर्माण होतात. मात्र प्रक्रियेअभावी त्यांच्या दुर्गंधीचा मोठा त्रास होतो. इज्जतनगर (उत्तर प्रदेश) येथील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेने कोंबड्यांच्या विष्टेवर प्रक्रिया बायोगॅस निर्मिती होऊ शकेल असे तंत्रज्ञान विकसित केले.

या तंत्रज्ञानामध्ये २०० लिटर क्षमतेची हवाविरहित डायजेस्टर टाकी, इनलेट पाइप, आउटलेट पाइप, बायोगॅस संग्राहक, बायोगॅस कॉम्प्रेसर व बायोगॅस साठविण्यासाठी सिलिंडर यांचा वापर केला आहे. टाकीमध्ये हवाविरहीत वातावरणात कोंबडीच्या विष्टेवर प्रक्रिया होऊन गॅस तयार होतो. दररोज इनलेट पाइपमधून कोंबडीची विष्टा आणि पाणी टाकीत सोडावे लागते. आउटलेट पाइपमधून बायोगॅस निर्मितीनंतर तयार झालेली स्लरी बाहेर येते. बायोगॅस साठविण्यासाठी संग्राहक टाकी आहे. बायोगॅस भरण्यासाठी सिलिंडर्स, कॉम्प्रेसर्सची सोय आहे.

संयंत्राची वैशिष्ट्ये :

  • संयंत्रातून बाहेर पडणारा इंधन वायू निळ्या रंगाची ज्योत निर्माण करतो. त्यामुळे अधिक उष्णता.
  • बायोगॅस संयंत्रामधून मिळणाऱ्या मिथेनइतकीच किंवा त्यापेक्षा जास्त मिथेन वायूची या बायोगॅस संयंत्रातून निर्मिती.
  • केवळ पोल्ट्री वेस्ट पदार्थांचा बायोगॅस निर्मितीसाठी वापर करता येतो. इतर संयंत्रामध्ये पोल्ट्री वेस्टचा बायाेगॅस निर्मितीसाठी वापर करताना त्यात गाईचे शेण मिसळावे लागते.
  • स्लरीचा पुन्हा पोल्ट्री वेस्टबरोबर मिसळून बायोगॅस संयंत्रात मिसळता येते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
  • हिवाळ्यात गारव्यामुळे पुरेशी उष्णता न मिळाल्याने बायोगॅस संयंत्रात गॅसनिर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे बायोगॅस संयंत्र बंद पडतात. मात्र या संयंत्रामध्ये हिवाळ्यामध्येही बायोगॅस निर्मितीवर कोणताही परिणाम होत नाही.
  • फायदे :

  • एक घनमीटर बायोगॅस निर्मितीसाठी उन्हाळ्यात १२ ते १३ किलो आणि हिवाळ्यात १९ ते २० किलो पोल्ट्री वेस्ट लागते.
  • ४ ते ५ सदस्य असलेल्या कुटुंबासाठी तीनवेळचा स्वयंपाक करण्यासाठी पुरेशा प्रमाणात बायोगॅस निर्मिती.
  • पोल्ट्रीशेडमध्ये पुरेशी उष्णता निर्माण करण्यासाठी या बायाेगॅसचा वापर शक्य.
  • स्लरीचा हे उत्कृष्ट सेंद्रिय खत.
  • लघू पोल्ट्री उद्योजक किंवा शेतकरी यांना ऊर्जा स्वावलंबी होता येते.
  • पाच हजार लेअर कोंबड्या असलेल्या पोल्ट्रीमध्ये तयार होणाऱ्यापासून पोल्ट्री वेस्टपासून दरवर्षी ४१०० किलो बायाेगॅसनिर्मिती करता येते. दरवर्षी स्लरीपासून १२८ टन सेंद्रिय खत निर्मिती. या संयंत्रामुळे टाकाऊ पोल्ट्री वेस्टचे पाच पटीने मूल्यवर्धन.
  • - पोल्ट्री वेस्टमुळे होणारे वायुप्रदूषण, माश्यांचा त्रास यापासूनही मुक्तता.
  • .

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com