पाचोरा (जि. जळगाव) येथील मोटारसायकल दुरुस्तीचे काम करणारे राजेंद्र लोहार यांनी उपलब्ध इंजिन व अन्य सुट्या भागांचा वापर करीत छोटा पॉवर टिलर बनविला आहे. केवळ १८ हजारांत बनविलेल्या पॉवर टिलरमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल. पाचोरा (जि. जळगाव) येथे विश्वकर्मा वेल्डिंग वर्क्सचे संचालक राजेंद्र लोहार हे वेल्डिंगच्या कामांसह गेल्या ३५ वर्षांपासून मोटारसायकल दुरुस्तीचेही काम करतात. त्यांचा उत्कृष्ट मेकॅनिक म्हणून लौकिक आहे. ग्रामीण भागात रहिवास व काळ्या मातीशी जुळलेली नाळ यामुळे शेती आणि शेतकऱ्यांबाबत संवेदनशीलता ते जोपासत आहेत. याच भावनेतून कमी खर्चात शेतीसाठीची अवजारे बनवावीत, असा विचार त्यांनी केला. सुरवातीला विटा तयार करण्याचे यंत्र तयार केले.
पॉवर टिलर निर्मिती
ः राजेंद्र लोहार, ९९७५३९३१८१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.