भविष्यामध्ये सौरऊर्जेचा वापर वाढत जाणार आहे. मात्र या वाढीचे विपरीत परिणाम पर्यावरणातील विविध घटकांवर विशेषतः परागवहक कीटकांवर होणार नाहीत, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लँकेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी युरोपातील सौरऊर्जा विकासाचे नेमक्या परिणामांचे विश्लेषण केले आहे. त्यावर आधारित परागवाहकांसाठी फायदेशीर ठरेल अशा प्रकारचा सौरऊर्जा विस्ताराचा आराखडा मांडला आहे. जागतिक पातळीवर विद्युत ऊर्जेच्या पुरवठ्यासाठी सौर फोटो व्होल्टाइक पॅनेलचा वापर वेगाने वाढत आहे. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात जागा लागते. ही स्वच्छ ऊर्जा मानली जात असली तरी भविष्यात वाढत्या सोलर पॅनेलटा फटका परागवाहकांना उदा. मधमाश्या, होव्हर फ्लाइज, वास्प, भुंगेरे, फुलपाखरे, पतंग यांना बसू शकतो. हे सर्व घटक जागतिक पातळीवरील अन्न उत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असून, सुमारे ३५ टक्के अन्नधान्य उत्पादन हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या त्यांच्यावर अवलंबून आहे. लँकेस्टर विद्यापीठातील पर्यावरण शास्त्रज्ञांच्या गटाने उत्तर पश्चिम युरोप येथील सौर पार्कमधील जमिनींचे व्यवस्थापन आणि परागवाहकांची जैवविविधता यांचा सुव्यवस्थित अभ्यास केला आहे. त्यांच्या या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल रिन्युएबल अॅण्ड सस्टेनेबल एनर्जी रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. इकडे लक्ष देण्याची गरज लँकेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी रीडिंग विद्यापीठातील आपल्या सहकाऱ्यांसह मिळवलेल्या पुराव्यावर आधारित परागवाहकांची जैवविविधता वाढवण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढील गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.
केवळ इंग्लंडच नव्हे, तर जगभरातील परागवाहकांची घटती संख्या हे अन्नधान्य उत्पादनापुढील आव्हान असणार आहे. सध्या शेतीखाली असलेल्या जमिनीमध्ये परागवाहकांच्या जैवविविधतेच्या वाढीवर अनेक मर्यादा आहेत. मात्र सौर पार्क आणि परिसरामध्ये त्यांचे नैसर्गिक रहिवास नक्कीच उभारता येतील. यातून सौर पार्क आणि शेती या दोन्हींचाही फायदा होईल. - हॉली ब्लायडेस, लँकेस्टर विद्यापीठ. जमिनीच्या सोलर पार्कसाठी वापरातील बदलामुळे मातीचा व जैवविविधतेचा ऱ्हास होऊ शकतो. हा बदल जितक्या पर्यावरणपूरक पद्धतीने होईल, तितके ते जैवविविधता आणि परागवाहकांसाठी फायदेशीर ठरेल. अशा सौर पार्कना चालना दिल्यास त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही लक्षणीय वाढ होईल. - डॉ. अलोना आर्मस्ट्राँग
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.