गोव्यातील बिचोलिम येथील प्रगतशील शेतकरी अनिता आणि त्यांचे पती मॅथ्यू वल्लीकाप्पेन यांनी शाश्वत उत्पादनासाठी सालेम भागात १.८ हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे. यासाठी त्यांनी ओल्ड गोवा येथील केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांकडून तांत्रिक मार्गदर्शन घेतले. या प्रकल्पास त्यांनी ‘ब्लू हार्वेस्ट फार्म’ असे नाव दिले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाउनचा परिणाम सर्वच स्तरांवर झालेला आहे. विशेषतः शेतीसह विविध कृषिपूरक व्यवसाय आणि अन्य व्यवसायांवरही प्रतिकूल परिणाम झाला. सागरी किनारपट्टी भागातील लोकांकडे सागरी उत्पादनाशिवाय इतर कोणतेही शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही. तेथील सर्व आर्थिक व्यवहार हे पर्यटन आणि सागरी उत्पादनांवर अवलंबून आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांचे अर्थकारण कोलमडले आहे. या गोष्टीचा विचार करता एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब किनारपट्टी भागात उपयुक्त ठरू शकतो, असे दिसून आले आहे. कोळंबीमध्ये वाढता रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादनाचा जास्तीचा खर्च, उपलब्ध साधनांची वाढती गरज आणि किमतीमध्ये सातत्याने होणारी घसरण या सर्व बाबींचा कोळंबी उत्पादकांना सामना करावा लागत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी गोव्यातील बिचोलिम येथील प्रगतशील शेतकरी अनिता आणि त्यांचे पती मॅथ्यू वल्लीकाप्पेन यांनी शाश्वत उत्पादनासाठी सालेम भागात १.८ हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे. यासाठी त्यांनी ओल्ड गोवा येथील केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांकडून तांत्रिक मार्गदर्शन घेतले. या प्रकल्पास त्यांनी ‘ब्लू हार्वेस्ट फार्म’ असे नाव दिले आहे. या प्रकल्पात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, वराहपालन, पोल्ट्री, फळझाडे, भाजीपाला, गांडूळ खत आणि बायोगॅस या घटकांचा समावेश करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी साधारणपणे २९ लाख रुपये गुंतवणूक खर्च आला. खर्च वजा करून या संपूर्ण प्रकल्पातून अपेक्षित उत्पादन मिळेल अशी आशा आहे. केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेद्वारे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, शाश्वत आणि संसाधनांनी परिपूर्ण अशा एकात्मिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मत्स्यपालन, वराहपालन, पोल्ट्री, फळझाडे, भाजीपाला, गांडूळ खत आणि बायोगॅस निर्मिती हे एकात्मिक शेती पद्धतीमधील मुख्य घटक आहेत. संशोधकांनी माशांच्या विविध प्रजातींच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन केले. यासोबतच मत्स्यपालन, कुक्कुटपालन, फळबाग आणि परसबागेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संशोधकांच्या मते, या पद्धतीद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. एकात्मिक शेती पद्धती गोड्या पाण्यातील मत्स्यपालन
वराहपालन
कुक्कुटपालन
फळबाग आणि परसबाग लागवड
इतर नियोजन
एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.