Farmers Support: दहा सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. हा दिवस आत्महत्या रोखण्यासाठीची सामाजिक जबाबदारी, जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीचे आवाहन करतो. देशात शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र राज्य तर शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्यांमध्ये सुद्धा आघाडीवर आहे. शिक्षणातील जीवघेणी स्पर्धा, भविष्याबाबत साशंकता, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, महागडे शिक्षण, अभ्यासाचे ओझे ही काही कारणे विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागची आहेत. .तर सातत्याने तोट्याची शेती, वाढता कर्जबाजारीपणा, बॅंक अथवा सावकारांचा वसुलीसाठीचा तगादा, त्यातून होणारी मानहानी ही शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागची प्रमुख कारणे आहेत. शेतकरी असो की विद्यार्थी आर्थिक कारणांबरोबर मानसिक वेदनाही त्यांच्या आत्महत्यांस तेवढ्याच जबाबदार आहेत..Farmers Issue : शेतकऱ्यांचा आवाज एकसंध राहिला तरच त्याला न्याय मिळेल.अशा वेळी सतत निराशा व जगण्याची उमेद हरविलेल्यास एकटं वाटू न देता त्याच्याशी संवाद साधला, संपर्क ठेवला तर आत्महत्या कमी होतील, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. शेतकरी-विद्यार्थी यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन-प्रशासन पातळीवर हल्ली काही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशावेळी एकमेकांशी संवाद अन् संपर्कातून आत्महत्या कमी होण्यास हातभार लागत असेल तर व्यक्ती तसेच समाजाने पुढे यायला हरकत नाही..शेती हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायती केव्हाच नव्हता. परंतु पूर्वी शेती ही भांडवली नव्हती. सेवा व वस्तू विनिमय पद्धतीत (बार्टर सिस्टिम) शेतकरी-समाजाच्या बहुतांश गरजा भागविल्या जात होत्या. त्यामुळे ग्रामीण व्यवस्थेत पैशाची फारशी गरज कोणालाही नव्हती. शिवाय पूर्वी संकटे आल्यावर त्यावर मात करण्यासाठी घर-भावकी-समाज-गावात एकोपा होता. सर्वांनी मिळून संकटांचा सामना करायचा हा भाव होता..Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा.आपण एकटे-दुकटे नाही तर आपल्या पाठीमागे घर-समाजातील अनेक माणसे उभी आहेत, हा मानसिक आधार शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीतही जगण्याचे सामर्थ्य देत होता. आपले सण-वार-उत्सव-यात्रा-जत्रा या माध्यमांतून गावातील लोक एकत्र येत होते. सुख-दुःख वाटले जात होते. मैदानी खेळ शारीरीक-मानसिक अवस्था सुदृढ ठेवत होते. मागील साडेतीन दशकांत म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेनंतर शेती भांडवली होत गेली..त्याचबरोबर हळूहळू घर-समाज-गाव विघटित झाले. माणसे एकटे जगत आहेत. दुःख वाटून घ्यायला कोणीही पुढे सरसावत नाही. सण-वार-यात्रा-जत्रा यांचे स्वरूप पालटून तिथे व्यावसायिकता आली आहे. मैदानी खेळांच्या जागी मोबाइलवरील खेळ, टीव्ही, इंटरनेट वापरातून एकाकीपण वाढत आहे. अर्थात सामूहिकपणे दुःख कमी करणारी व्यवस्था आज समाजामध्ये जिवंत नाही..आणि यातून शेतकरी-विद्यार्थ्यी यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अशावेळी मानसोपचार तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे ‘तू ठीक आहेस ना!’ हा प्रश्न आपल्या संपर्कात असलेल्यांना अर्थात कुटुंबातील व्यक्ती, मित्र, शेजारी, गावकरी यांना विचारा. तो नैराश्यात असताना तर आवर्जून विचाराच!.आपल्या या छोट्या प्रश्नात एखाद्याचा जीव वाचविण्याची ताकद आहे, हे लक्षात ठेवा. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात विशेषतः कृषी व्यवसायामध्ये सांघिक प्रयत्नांना खूप महत्त्व आहे. त्या दिशेने सर्वांनी पावले उचलायला हवीत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी संवाद, संपर्काबरोबर यंत्रवत अभ्यास करण्याच्या पद्धती आणि जीवघेणी स्पर्धा बदलून नवी प्रणाली रुजवायला हवी. पालकांनी आपल्या पाल्यावरील अनाठायी महत्त्वाकांक्षेचे ओझेही कमी करायला हवे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.