Cotton Farmers and Ginning Industry Partnership: जिनिंग व्यावसायिकांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेला प्रोत्साहन द्यावे. तसेच शेतकऱ्यांना उच्च प्रतीच्या बियाण्यासह इतर आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ‘इंडियन कॉटन समिट - २०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरिराज सिंह यांनी केले. आपल्या देशातील प्रमुख नगदी पिकांचा विचार केला तर ऊस आणि कापूस ही पिकेच प्रथम डोळ्यासमोर येतात.कारण साखर आणि कापड हे दोन मोठे उद्योग त्या आधारे उभे आहेत. .परंतु ऊस, कापूस या दोन पिकांची तुलना करता ऊस उत्पादकांपेक्षा कापूस उत्पादक तंत्रज्ञानाच्या अवलंबापासून ते एकंदरीतच अर्थार्जनामध्ये देखील खूपच मागे आहे. त्याचे एक प्रमुख कारण साखर कारखाने ऊस उत्पादकता वाढीपासून ऊस तोडणी तसेच त्याच्या गाळपासाठी देखील प्रयत्नशील असतात. कापसाच्या बाबतीत मात्र नेमके याच्या उलट चित्र दिसते. कापसामध्ये दर्जेदार बियाणे, प्रगत लागवड तंत्राचा अवलंब, यांत्रिकीकरण, कापूस वेचणी, विक्री तसेच प्राथमिक प्रक्रिया याबाबत जिनिंग व्यावसायिक असो की कापड उद्योग काहीही मार्गदर्शन करीत नाही..Cotton Farming Crisis: कपाशीवर संकटाची चाहूल !.प्रक्रियेच्या बाबतीत विचार केला तर या दोन्ही पिकांमध्ये खूप तफावत जाणवते. उसाच्या क्षेत्राजवळच साखर कारखाने उभे राहिले आहेत. तसेच साखरेशिवाय इथेनॉल, सहवीज निर्मिती अशी उपउत्पादने देखील कारखान्यांतच तयार होतात. कापसाच्या बाबतीत मात्र पिकतो एका ठिकाणी त्यावर प्राथमिक प्रक्रिया (जिनिंग) होते दुसऱ्याच ठिकाणी तर त्यापुढील धागा ते कापडनिर्मिती होते तिसऱ्याच ठिकाणी. गंभीर बाब म्हणजे कोणाचाच कोणाला ठावठिकाणा नसतो..अशा वेळी जिनिंग व्यावसायिकांनी कापूस उत्पादकांना मार्गदर्शनाचा धागा पकडायला हवा. वैयक्तिक शेतकऱ्यांना असे मार्गदर्शन करणे आता शक्य देखील नाही. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करून त्यांना मार्गदर्शन केले तर ते अधिक प्रभावी ठरू शकते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भरवशावरच जिनिंग - प्रेसिंग तसेच कापड उद्योग चालतो. कापूस पट्ट्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर जिनिंग व्यावसायिकांनी शेतकऱ्यांच्या प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. याकडे जिनिंग व्यावसायिक गांभीर्याने पाहतील, अशी आशा करूया..Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई.दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कापूस उत्पादकांप्रमाणे मागील एक-दीड दशकांपासून जिनिंग व्यवसायाला देखील चांगलीच घरघर लागली आहे. जिनिंग - प्रेसिंग मिल्सला लागलेल्या घरघरीचे एक कारण त्यांना होत असलेला कमी कापूस पुरवठा हे आहे. राज्यातीलच जवळपास निम्म्या जिनिंग - प्रेसिंग मिल्स मागील चार-पाच वर्षांपासून बंदच राहतात. ज्या जिनिंग - प्रेसिंग मिल्स चालू होतात, त्याही पूर्ण क्षमतेने चालत नाहीत..जिनिंग, प्रेसिंगच्या धीम्या गतीला कापसाच्या कमी आवकेबरोबर वित्तीय संकट हे देखील एक कारण आहे. यंदाचे वर्ष तर दुष्काळी आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन कमीच होऊन हा पुरवठा अजून मंदावणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिनिंग - प्रेसिंग मिल्स वाचविण्यासाठी मदतीचा धागा देखील महत्त्वाचा ठरू शकतो. आर्थिक अडचणीतील जिनिंग, प्रेसिंग मिल्सचे कर्ज पुनर्गठण, व्याज सवलत, वीज बिल सवलतीची मागणी उद्योजक करताहेत. कापूस, रुई, सूत, धागा यांची निर्यात वाढली तर सूत गिरण्यांचा गाडा रुळावर येईल तसेच कापसाच्या शेतीला देखील स्थैर्य लाभेल. या सर्व बाबींचा केंद्र-राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.