Agriculture Advisory: सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि त्यात खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीनंतर रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असता ऑक्टोबरमधील पाऊस आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या ढगाळ वातावरणामुळे त्यात व्यत्यय आला. रब्बी हंगामातील हरभरा, गहू यांसह इतरही पिकांना स्वच्छ सूर्यप्रकाश तसेच कोरडे थंड हवामान पोषक मानले जाते..ही पिके उगवताना अथवा ती लहान असताना पाऊस पडला तर ती उधळून जाण्याची (मोठ्या प्रमाणात मर होण्याची) शक्यता अधिक असते. आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आकाश काहीसे निरभ्र झाले आहे..शिवाय उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्राकडे कूच केल्याने राज्यात थंडीचा कडाकाही वाढू लागला आहे. राज्याच्या बहुतांश भागात पारा १० ते १२ अंशावर घसरल्याने गारठा वाढला आहे, तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटकाही बसतोय. त्यामुळे सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा अशी काहीशी स्थिती आहे..Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज.विशेष म्हणजे पूर्वीसारखे हिवाळ्यातील थंडीचे सातत्य आता राहिले नाही. पूर्वी दसऱ्याला सुरू होणारी थंडी होळीपर्यंत असायची. आता मात्र या काळात केवळ थंडीच्या लाटा येतात आणि लाटेपुरतीच थंडी मर्यादित झाली आहे. अर्थात हवामान बदलाच्या फेऱ्याने हिवाळा या ऋतुलाही सोडले नाही..हवामानशास्त्रीय परीभाषेनुसार किमान तापमान जर सामान्यापेक्षा ४ अंश सेल्सिअस ने उतरले तर मग थंडीची लाट आली असे म्हटले जाते. किमान तापमान जर सरासरीहून ६ अंश सेल्सिअसने खाली आले तर ही थंडीची तीव्र लाट समजली जाते. आपल्याकडे सध्या काही मोजक्या ठिकाणी थंडीची लाट जाणवत असून तीव्र लाट अजून तरी आलेली नाही..त्यामुळे सध्याचे १० ते १२ अंश सेल्सिअस तापमान रब्बीसह इतरही पिकांना पोषक आहे. परंतु अजून याखाली पारा (आठ अंश सेल्सिअस) गेला आणि थंडीबरोबर धुकेही असले तर मग मात्र सर्वच पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम दिसायला सुरुवात होईल. थंडीपासून बचाव करण्याच्या स्थितीत पिके कोमेजून जातात..Rabi Sowing: रब्बीचा पेरा आघाडीवर; हरभरा, गव्हासह मोहरीकडे शेतकऱ्यांचा कल.अन्ननिर्मिती वेग मंदावल्यामुळे फूल, फळधारणेवर परिणाम होऊन उत्पादन घटू शकते. जास्त काळ आठ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान राहिले तर पिकांची मुळे पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्य शोषण करू शकत नाहीत, पानातून उत्सर्जन कमी होते. वनस्पती थंडीपासून संरक्षण करण्याच्या परिस्थितीमध्ये कोमेजून जातात..सकाळच्या वेळी धुक्यासह दवही पडत असल्याने गहू, ज्वारीसह द्राक्ष, केळी, आंबा या पिकांवर कीड-रोग प्रादुर्भाव वाढतो. मानवासह पाळीव पशुपक्षांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील वाढती थंडी चांगली नसते. अतिगारवा प्रत्येक मनुष्याला सहन होतोच असे नाही. त्यामुळे काही जणांना अति थंडीत आरोग्याच्या तक्रारीही जाणवू लागतात. त्यामुळे पिकांसह पशुपक्षी तसेच मानवाने देखील थंडीच्या लाटेत काळजी घ्यायला हवी..हंगामी पिके, फळपिकांची थंडीच्या लाटेत काय काळजी घ्यायला हवी, याबाबतचे मार्गदर्शन कृषी तज्ज्ञ तसेच विस्तार कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना करायला हवे. थंडीपासून फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी बागेत ठिकठिकाणी काडीकचऱ्याचे ढीग करून पहाटे जाळून धूर केल्यास बागेच्या तापमान वाढून पिकांना फायदा होतो..रब्बी पिकांना सायंकाळी पाणी दिल्यास जमिनीचे तापमान योग्य राहते. असे उपाय शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करायला हवेत. कुक्कुट पक्षी, रेशीम कीटक, दुभती जनावरे यांनाही थंडीचा फटका बसू नये, असे उपाय तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सांगायला हवेत. मनुष्यप्राण्यात जुने दुखणे थंडीच्या काळातच डोके वर काढू लागले की त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.