शेतीरासायनांच स्कॉर्चिंग कसं टाळावं

बहुतेक वेळा आपण वेगवेगळे प्रॉडक्ट एकत्र फवारतो. या खिचडी फवाऱ्यामुळे पिकावर स्कॉर्चिंग येत. स्कॉर्चिंग म्हणजे काय? हा प्रश्न आपल्यातील काहींना पडला असेल. स्कॉर्चिंग मध्ये झाडाच्या अंगावर डाग पडतो किंवा ते सुकते. पिकाच्या पानावर, फुलावर, फळावर किंवा इतर कोणत्याही भागावरील त्वचा जाळून डाग पडणे, किंवा संपूर्ण पीक जळणे याला स्कॉर्चिंग म्हणतात.
what is effect of scorching in farming system?
what is effect of scorching in farming system?

बहुतेक वेळा आपण वेगवेगळे प्रॉडक्ट एकत्र फवारतो. या खिचडी फवाऱ्यामुळे पिकावर स्कॉर्चिंग येत. स्कॉर्चिंग म्हणजे काय? हा प्रश्न आपल्यातील काहींना पडला असेल. स्कॉर्चिंग मध्ये झाडाच्या अंगावर डाग पडतो किंवा ते सुकते. पिकाच्या पानावर, फुलावर, फळावर किंवा इतर कोणत्याही भागावरील त्वचा जाळून डाग पडणे, किंवा संपूर्ण पीक जळणे  याला स्कॉर्चिंग (Scroching) म्हणतात. पोटच्या पोरासारखं वाढवलेलं पीक (Crop) विद्रुप झालेलं पाहून वाईट वाटतं. स्कॉर्चिंग आपल्या लहानसहान चुकांमुळे किंवा लेबलवर (Label) दिलेल्या सूचना न पाळल्यामुळे येत. आपण खबरदारी घेतली तर हे नुकसान टाळता येईल.

स्कॉर्चिंग ला सर्वात जास्त बळी पडतात ते झाडाची पानं. पान जसं अन्न बनवायची फॅक्टरी आहे, तसंच ते नाकाचंही काम करते. स्कॉर्चिंग मुळे झाडाच्या पेशी जळून जातात. त्या जागेवरील हरितलवके मरतात, त्यामुळे झाडाची अन्न बनवायची ताकद कमी तर होतेच पण त्याचबरोबर झाडाची श्वास घेण्याची क्षमताही कमी होते. हरीतलावकांच्या कमतरतेमुळे हार्मोनचा (Hormones) असमतोल होतो, त्वचेला नुकसान झाल्यामुळे, झाडाची पाण्याची देवाणघेवाण करायची ताकद कमी होते. पानावरचा संरक्षक तेलकट थर नष्ट होतो. दीड लाख एकरांतील पिके वाळू लागली

स्कॉर्चिंग कधी येते ? ते आता जाणून घेऊया.

१. शेतीरासायनांचा प्रमाणापेक्षा जास्त डोस वापरल्यावर स्कॉर्चिंग येऊ शकते.

२. बरेच शेतीरासायने एकदुसऱ्यात मिसळायला वर्ज्य असतात. असे रसायनांचे मिश्रण केल्यावर ते त्यांचा परिणाम स्कॉर्चिंग च्या रूपात दाखवतात. 

३. अति जास्त किंवा कमी पीच म्हणजे सामू घातक असतो. अति कमीजास्त सामूचे असलेले शेतीरासायन फवारल्यावर पीक जळू शकते. 

४. पिकाला जर पाण्याचा ताण असेल आणि तरीही आपण फवारणी केली तर ते स्कॉर्चिंग ला आमंत्रण ठरू शकते.

५. पिकाला जर मुख्य किंवा सूक्ष अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर स्कॉर्चिंग लवकर येते.

६. मजुरी आणि वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट मारून एकाच फवाऱ्यात ३-४ औषधांची खिचडी केल्यावर स्कॉर्चिंग येण्याची शक्यता वाढते.

७. चुकून पिकावर तणनाशक फवारालं गेलं किंवा तणनाशकाची वापरलेले पंप न धुता इतर औषधं फवारायला वापरला गेला तर स्कॉर्चिंग ची हमखास ग्यारंटी आहे. 

स्कॉर्चिंग आल्यावर काय करावं ? याची माहिती जाणून घेऊया.

१. स्कॉर्चिंग आल्यावर सगळ्यात आगोदर काय फवारलं होतं ते तपासा. 

२. साध्य पाण्याने झाडाला आंघोळ घातल्यासारखं फवाऱ्याने धुऊन घ्या. झाडावरील औषध धुऊन काढणे हा महत्वाचा उपाय आहे. 

३.  पिकाच्या मुळाशी पाणी द्या. पिकाला पाण्याचा ताण असेल तर स्कॉर्चिंगची भीषणता जास्त असते.

४. सेंद्रिय कार्बन असलेलं प्रॉडक्ट फवारा. फक्त त्यांचा पीएच आठपेक्षा जास्त आणि साडेसहा पेक्षा कमी नको.

स्कॉर्चिंग टाळण्यासाठी काय करावं?

१. बाटलीवरील लेबल काळजीपूर्वक वाचा. त्यात दिलेला डोस आणि इतर प्रॉडक्ट बरोबरची मिश्रणक्षमता तपासा.

२. एकापेक्षा जास्त औषधांचं मिश्रण फवारात असाल तर त्यांची कॉम्पटीबीलिटी म्हणजे मिश्रणक्षमता तपासून घ्या. मिश्रणक्षमता कशी तपासावी हा प्रश्न पडला असेलच. त्यासाठी काचेच्या ग्लासात पाणी घ्या. जे रसायने मिश्रणात वापरणार आहोत त्यांचा योग्य तो डोस घेऊन त्या पाण्यात टाका.  ते द्रावण फुटते का? त्याचे दोन थर होतात का? त्यातून वाफ निघते का? द्रावण गरम होते का? यापैकी एका जरी प्रश्नाचे उत्तर हो आल्यास, ते रसायने मिश्रांशं नाही असे समजावे आणि त्यांची खिचडी टाळावी. 

३. हे द्रावण काही आदल्या दिवशी झाडांवर फवारा. दुसऱ्या दिवशी झाडावर स्कॉर्चिंगची लक्षणे नसल्यास फवारायला हरकत नाही. 

४. सकाळी आणि संध्याकाळी वातावरण थंड असेल तेव्हा फवारा. उन्हात फवारल्याने स्कॉर्चिंग येऊ शकते.

५. फवारणीअगोदर पिकाला पाण्याचा ताण नाहीये ना ? हे तपास. असल्यास आगोदर पाणी देऊन घ्या

६. प्रॉडक्ट च्या लेबल वर जो डोस सांगितलाय तोच फवारा. जास्त रिझल्ट यावा म्हणून किंवा कीड तडकाफडली मरावी म्हणून जास्त डोस वापरू नका. कंपनीने उत्पादन बाजारात आणण्याआगोदर या चाचण्या करूनच उत्पादन बाजारात आणलेले असते.

७. एकाच फवाऱ्यात भरपूर पक्षी मारण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे एकाच फवाऱ्यात किडे, रोग नियंत्रण आणि खते देण्याचा खटाटोप करू नका.

८. पिकाला अती पाणी दिलंय का ते तपासा.

९. अन्नद्र्याव्यांची कमतरता येणार नाही याची काळजी घ्या. पिकाचं योग्य पोषण होईल ते बघा.

हेही पाहा- Tomato पिकावर Tuta Absoluta Pesticide चा प्रादुर्भाव 

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे आपण काळजी घेतली तर स्कॉर्चिंगमुळे होणारे नुकसान टाळता येईल. औषधाचा खप वाढवण्यासाठी काही दुकानदार एकाच फवाऱ्यात ३-४ प्रॉडक्ट मिसळायला सांगतात. अश्यावेळी जाणकार व्यक्तीला विचारा किंवा इंटरनेटवर योग्य वेबसाईट वरून माहिती घ्या. स्कॉर्चिंग मुळे दरवर्षी शेतकरी आणि कंपन्यांमध्ये गैरसमज होतात. स्कॉर्चिंगच्या नावाखाली पैसे उकळण्याचा काही लोकांचा धंदा झालाय. पण अश्या प्रकारामुळे शेतीव्यवसायातली पारदर्शकता काही अंशी होतेय. शेतकरी-डीलर-कंपनी हे सहजीवन टिकून राहावं. त्यांनी हातात हात घालून एकदुसऱ्याच्या प्रगतीत योगदान द्यावं असा विश्वास बाळगूया.

general

general

general

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com