Sea Route Mango Export: मागील काही वर्षांपासून राज्यातून विविध देशांना समुद्रमार्गे आंबा पाठविण्याचे यशस्वी प्रयोग होत आहेत. यावर्षी देखील एप्रिल-मे महिन्यात केसर आंबा समुद्रमार्गे इंग्लडला पाठविण्याचा प्रयोग केला जाणार आहे. महाकेसर आंबा बागायतदार संघाबरोबर लखनौ येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर (सीआयएसएच), अपेडा आणि एका एक्स्पोर्ट कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी १९९७-९८ मध्ये समुद्रमार्गे इंग्लंड (लंडन) तसेच अमेरिकेला आंबा निर्यातीचे प्रयोग करण्यात आले होते. .परंतु नंतर त्यात सातत्य आपण ठेवू शकलो नाही. त्यानंतर २१ वर्षानंतर २०१९ मध्ये जहाजाने युरोपला आंबा पाठविण्याचा प्रयोग झाला. त्यानंतर कोरोना काळात याला ब्रेक लागल्यावर २०२२ मध्ये अमेरिकेला समुद्रमार्गे आंबा पाठविण्यात आला तर २०२४ मध्ये याच मार्गे जपानलाही आंबा पोहोचविण्यात आला आहे. आणि आता यावर्षी केसरची समुद्रमार्गे थेट इंग्लंड वारी होणार असल्याने प्रयोगामध्ये सातत्य दिसून येते, ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल..Mango Flowering: रायगडमध्ये थंडीमुळे हापूसचा मोहर बहरला.मागील काही वर्षांपासून हवामान बदलाच्या काळात हापूस असो की केसर आंबा उत्पादक त्रस्त आहेत. एकीकडे नैसर्गिक आपत्तींनी नुकसान वाढत आहे. त्यामुळे उत्पादन घटत आहे तर दुसरीकडे आंब्याला अपेक्षित दर मिळताना दिसत नाही. अशावेळी निर्यातीचा एक चांगला पर्याय आंबा उत्पादकांसमोर आहे. अनेक देशांत भारतीय आंब्याला चांगली मागणी आहे. परंतु हवाईमार्गे आंबा निर्यातीसाठी देशनिहाय प्रतिकिलो २०० ते ५०० रुपये खर्च येत असल्याने निर्यातीवर मर्यादा येत होत्या..समुद्रमार्गे आंबा निर्यातीसाठी प्रतिकिलो केवळ ३० ते ५० रुपये खर्च येणार असल्याने निर्यातदाराची खर्चात मोठी बचत होणार आहे. ही निर्यातवृद्धीची सुवर्णसंधी आहे. आत्तापर्यंतच्या समुद्रमार्गे आंबा निर्यातीमध्ये पणन मंडळाची भूमिका देखील महत्त्वाची राहीली आहे. भारतीय आंबा निर्यात खर्च कमी होऊन, रास्त दरात जगभर उपलब्ध व्हावा यासाठीच्या मागील अनेक वर्षांच्या प्रयत्नाला यश आले आहे..Mango Export: इंग्लंडला समुद्रमार्गे पुन्हा केसर आंबा निर्यातीचा प्रयोग.समुद्रमार्गे दूरदेशी आंबा पोहोचायला २० ते ४० दिवस लागतात. परंतु या प्रवासकाळात आंबा टिकविण्याचे तंत्र आता विकसित झाले आहे. अशा वेळी निर्यात संबंधित सर्व संस्थांनी युरोप, अमेरिकेसह ज्या देशांना शक्य आहे, तिथे समुद्रमार्गे आपला हापूस तसेच केशर पोहोचवायला हवा..उत्पादक आणि निर्यातदार यांच्याबरोबर संशोधन, विक्री, निर्यात यातील संस्थांनी समन्वयातून एकत्र काम केले, निर्यातीतील अडचणी समजून घेऊन त्यावर संशोधनातून मार्ग काढले तर शेतीमाल निर्यातीचे अनेक मार्ग प्रशस्त होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मागील काही वर्षांपासून समुद्रमार्गे आंब्याची होणारी निर्यात! निर्यातीत वाहतूक खर्च कमी झाल्याने आपण इतर देशांशी आता स्पर्धा करू शकणार आहोत..आंबाच नाही; तर इतर कोणत्याही शेतीमालाची प्रामुख्याने निर्यात शेजारील देश; तसेच मध्य पूर्व (इराण, इराक, कुवैत, कतार, सौदी अरेबिया) देशांत होते. या देशांसाठी निर्यातीसाठीचे निकष फारसे कडक नाहीत. त्यामुळे या देशांना आपली निर्यात सुरू राहते; परंतु दर आणि आयातीबाबतदेखील या देशांकडून फारशी शाश्वती मिळत नाही..अमेरिकेसह युरोपियन देशांत शेतीमाल निर्यातीसाठी निकष कठीण आहेत; परंतु हे देश शाश्वत निर्यात आणि दर्जानुसार अधिक दराची हमी देतात. त्यामुळे या देशांत शेतीमालाची टिकवणक्षमता वाढवून समुद्रमार्गे आंब्यासह इतरही शेतीमालाची निर्यात झाली तर ती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर तसेच शाश्वत ठरणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.