India 2047 Vision: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना शेती, ऊर्जा, निर्यात, रोजगार आदी क्षेत्रांत सुधारणांसह विकसित भारतावर भाष्य केले. खरे तर सुमारे तीन वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०४७ हा अमृतकाळ घोषित करून २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे करताना भारत विकसित देश असेल असे उद्दिष्ट मोदी यांनीच ठेवले होते. त्या वेळी देखील त्यांच्या या उद्दिष्टावर ‘आरबीआय’चे (रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांनी टीका करून याबाबतची वस्तुस्थिती मांडली होती. .मोदी यांनी विकसित भारताचे ठेवलेले ध्येय मूर्खपणाचे आहे, असे याआधी त्यांनी स्पष्ट केले होते. आताही भारताच्या विकासाला गती देण्यासाठी नव्या सुधारणांची गरज राजन यांनी बोलून दाखविली. अलीकडेच एस ॲण्ड पी या जागतिक पत मानांकन संस्थेने तब्बल १८ वर्षांनंतर सार्वभौम पत मानांकनात सुधारणा केल्याचे दाखवून दिल्यानंतर ‘फिच’कडून देखील भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूत वाढीवर शिक्कामोर्तब केले आहे..Maharashtra Development: समतोल विकासाचे ‘द्रविडीयन प्रारुप’.जीएसटी आणि इतर सुधारणांमुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढण्याची शक्यता देखील या संस्थेने वर्तविली आहे. असे असले तरी २०४७ पर्यंत विकसित भारत होण्यासाठी विकासदर ८ टक्क्यांहून अधिक आणि त्यात सातत्य लागणार आहे..केवळ शेतकरी, गरीब, युवक आणि महिला या विकासाच्या केंद्रस्थानी आहेत, केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, असे सांगून विकासदरात वाढ होणार नाही, हे आधी धोरणकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आकडेवारीनुसारच बोलायचे झाले तर आपला गेल्या वीस वर्षांचा सरासरी अर्थव्यवस्था वाढीचा दर ६.४ टक्केच आहे. आपण या वर्षी सुद्धा तेवढाच वाढीचा दर गाठणार आहोत..Maharashtra Development: शेती, ऊर्जा क्षेत्रांत राज्याची भरारी.हाच आपला दीर्घकालीन वाढीचा दर आत्तापर्यंत राहिला आहे. अशावेळी विकासदरात दोन ते अडीच पटीने वाढ आणि त्यात सातत्य हे सोपे काम नाही. विशेष म्हणजे त्या दिशेने आपले पूरक प्रयत्न पण दिसत नाहीत. सध्या जागतिक आर्थिक परिस्थिती स्थिर नाही. टेरिफ वॉरमुळे जागतिक बाजारात मोठे बदल पाहावयास मिळताहेत. यामुळे निर्यातीला खीळ बसत आहे. भारताच्या आर्थिक विकासवाढीतील हाही एक मोठा अडसरच म्हणावा लागेल..तरुणांचा देश म्हणूनही आपण विकसित देश होण्याचे स्वप्न पाहत आहोत. परंतु लोकसंख्येतील स्थित्यंतर पाहता पुढील २० वर्षांत देश तरुण राहणार नाही, तर तो श्रीमंत होण्याआधीच म्हातारा होईल. आता तरुणांचा देश म्हणून आपण मिरवीत असलो तरी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची देशात वानवा आहे. त्यामुळे बहुसंख्य हाताला काम देण्यास आपण असमर्थ ठरल्यामुळे निर्मिती तसेच सेवा क्षेत्रात आपली पिछाडी दिसून येते..शेती विकासाशिवाय विकसित भारताचा विचार देखील होऊ शकत नाही. अशावेळी शेती सातत्याने तोट्याचा व्यवसाय ठरत असल्याने त्यात गुंतवणूक होत नाही. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपल्या प्राधान्यक्रमात कृषी उत्पादकता, रोजगार व कौशल्यविकास, सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहर विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, संशोधन आणि विकास आणि मुख्य म्हणजे पुढील पिढीसाठीच्या सुधारणा या बाबी असायला हव्यात..आर्थिक निकषांशिवाय मानवी विकास निर्देशांक, साक्षरता (शिक्षण), आरोग्य, जीवनमान इत्यादींचा विचारही विकसित भारतात केला जातो. अशावेळी आर्थिक विकासाची फळे हे देशातील गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायला हवी. या सर्व बाबी विचारात घेऊन विकसित भारतासाठीचा रोडमॅप निश्चित करून त्या दिशेने पावले टाकावी लागतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.