Agriculture Crisis: यावर्षी अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीने शेतकरी हैराण झालेला आहे. संपूर्ण पीक वाया गेल्याने पावसाने भरलेल्या शेतातून अनेक शेतकरी आपला आक्रोश समाज माध्यमांद्वारे व्यक्त करीत आहेत. अशा वेळी पीक नुकसानीस इतरही काही घटक कारणीभूत ठरत असतील तर त्या शेतकऱ्याला होत असलेल्या व्यथा-वेदनांची कल्पना न केलेली बरी! .आणि अशी व्यथा शेतकऱ्याने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याकडे मांडली असता त्यात त्याला न्याय मिळण्याऐवजी चौकशीसाठी आलेले अधिकारी उलट शेतकऱ्यालाच धमकी देत असतील, त्यातून त्याला आत्महत्या करण्याची वेळ आली असेल तर ती आत्महत्या नाही तर तो व्यवस्थेचा बळी ठरला म्हणावे लागेल. असा बळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी संजय कोहकडे ठरले आहेत. हा सर्व प्रकार प्रशासनाच्या अकार्यक्षमता, असंवेदनशीलतेचा कळस आहे..Maharashtra Farmer Issue: पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या.भारतीय राज्यघटनेतील कलम ३५३ नुसार सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या कामात व्यत्यय आणणे, हा गुन्हा मानला जातो. परंतु या कलमानुसार कामात व्यत्यय आणणे म्हणजे काय ते नेमकेपणाने स्पष्ट केले आहे. येथे तर शेतकरी रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या नाल्यांमुळे पिकांचे नुकसान कसे होते, हे सांगत होते. ते ऐकून त्यास न्याय देण्यात संबंधित अधिकारी कर्मचारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत..यात एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने त्यास कारणीभूत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे मुख्य कर्तव्य हे सर्वसामान्य जनतेच्या समस्या ऐकून घेणे, त्या सोडविण्यासाठी पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणे काम करणे हे आहे. शेतकरी आत्महत्येच्या या प्रकारात तर अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या मूळ कर्तव्यालाच हरताळ फासला आहे..Indian Agriculture Growth : भारतीय कृषी क्षेत्राची वाढ जगात सर्वाधिक.सुमारे दहा दिवसांपूर्वी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस सर्वत्र साजरा केला गेला. त्या अनुषंगाने झालेल्या एका अभ्यासात शेतकरी असो की विद्यार्थी त्यांच्या वाढत्या आत्महत्येस आर्थिक कारणांबरोबर मानसिक वेदनाही जबाबदार असल्याचे पुढे आले. त्यामुळे संवाद आणि संपर्कातून या आत्महत्या कमी होतील, असे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले. अशा वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अतिसंवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे आहे, हे शासन-प्रशासन आणि समाजाने देखील लक्षात घ्यायला हवे..राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या या स्थानिक शेतकऱ्यांच्या संघटनांचे अपयश असल्याचे मत संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी व्यक्त केले आहे. शरद जोशी असताना ज्या गावात शेतकरी संघटनेचा प्रभाव होता तिथे आत्महत्या होत नव्हत्या, असेही एक निरीक्षण आहे. त्याचे कारण म्हणजे समस्या, व्यवस्थेविरोधात लढण्याचे बळ शेतकऱ्यांना मिळत होते. पूर्वी आलेले संकट हे समाजावरचे आहे, ही भावना होती..शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संकटावर मात करण्यासाठीचा मानसिक आधार शेतकऱ्यांना होता. हा आधार तुटल्याने शेतकऱ्यांना आता कसेही पिळले, लुटले तरी चालते, अशी शासन-प्रशासनाची भावना निर्माण झाली आहे. त्यातून त्यांना कसलाही धाक उरला नाही. या परिप्रेक्ष्यातून टिकैत यांच्या टीकेकडे सर्व शेतकरी संघटनांनी पाहून एकत्र येत मुजोर प्रशासन आणि सुस्त शासनाविरोधात निर्णायक लढा उभा करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते आहे. आपापसांतील वाद, हवेदावे विसरून सर्वच शेतकरी संघटनांनी यावर गांभीर्याने विचार करायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.