Farmer Support: देशातील बाजारपेठा दिवाळीनिमित्त उत्साहानं भरलेल्या आहेत. या बाजारपेठांत मातीचे दिवे, लक्ष्मीच्या मूर्ती, पूजा वस्तू, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रंगीबेरंगी माळा, शुभ लाभ फलक आणि ओम सारख्या सौभाग्याचं प्रतीक असलेल्या वस्तू उत्पादनांची रेलचेल आहे. या वर्षी ग्रामीण आणि शहरी बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येनं व्यापारी आणि दुकानदार स्थानिक, स्वदेशी वस्तूंच्या विक्रीला प्राधान्य देत आहेत..सणांच्या काळात देशभरातील दुकानं फक्त स्वस्त आणि आकर्षक चिनी वस्तूंनी भरलेली असायची, ते दिवस आता कमी झाले आहेत. पारंपरिक बाजारपेठांपासून ते आधुनिक मॉलपर्यंत, ग्राहक स्थानिक आणि स्वदेशी उत्पादने खरेदी करण्यास उत्सुक आहेत. जीएसटी फेररचनेनंतर वस्तूंच्या किमतीत घट झाल्याचा फायदा घेणारा ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीत गुंतला आहे..Farmer Relief : आमदार पवारांकडून बाराशे अतिवृष्टिग्रस्तांना सव्वा कोटी मदत.शहरी बाजारपेठांत असा झगमगाट असला तरी ग्रामीण बाजारपेठा काहीशा काळोखात आहेत. शेतीमालाच्या किमती कमी राहिल्यामुळं ही स्थिती आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. या वर्षी देशभर प्रचंड अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाड्यात सप्टेंबरमधील पावसाने थैमान घातले. पिकं गेली, घरं गेली, जनावरं वाहिली आणि माणसं मूक झाली. अन्य नुकसान केव्हाही भरून येऊ शकतं; परंतु जिला बळी राजा काळी आई म्हणतो, तीच खरवडून गेली. माती तयार व्हायला शेकडो वर्षे लागतात. आता सरकारनं काही हजार रुपये दिले असले, तरी त्यातून माती आणणार कुठून आणि एवढा भराव टाकायचा, कसा या चिंतेत शेतकरी आहेत..२०२३ मध्ये दिवाळी उत्सवाच्या बाजारात पावणेचार लाख कोटी रुपये आणि २०२४ मध्ये सव्वाचार लाख कोटी रुपयांची खरेदी झाली होती. या वर्षी उत्सवाच्या काळात होणारी खरेदी पावणेपाच लाख कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. त्यातील शेतकऱ्यांची खरेदी किती असेल, हा पुन्हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. निसर्गाचा अमानुषपणा पाहून शेतकरी हादरून गेला. जगायचं कसं? पोराबाळांना शिकवायचं कसं? लेकबाळ उजवायची कशी? कुठं मन मोकळं करावं, तर आभाळच फाटलेलं! त्याची जगण्याची उमेदच हरवली..Farmer Issue: जमीन खरडून गेलेल्यांना सरसकट दिलासा नाहीच.अतिवृष्टीमुळं घायकुतीला आलेला शेतकरी अडकला आहे, तो ‘मायक्रो फायनान्स’ आणि बँकांच्या कर्ज वसुलीच्या मगरमिठीत. मराठवाड्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या शेतकऱ्यांचं कर्जही तुलनेनं अल्पच आहे; परंतु खरिपाचा हंगाम हातून गेला. शेतकऱ्यांकडून आता कर्जवसुली केली नाही, तर ते बुडणार, असं गृहीत धरून बँका, ‘मायक्रो फायनान्स’वाल्यांनी पठाणी वसुली सुरू केली आहे. सरकारकडून मदत मिळाली तरी ती तुटपुंजी असेल. मायबाप सरकारचे प्रतिनिधी आणि विरोधकांचे प्रतिनिधी बांधावर जाऊन आले..शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना जाणून घेतल्या; परंतु त्यांना किती पाझर फुटला, हे तेच जाणोत. अशा वेळी सरकारबरोबरच काही खासगी संस्था, सेवाभावी संस्था एवढेच नाही तर समाजाने देखील मदतीसाठी पुढे यायला हवे. ‘सकाळ रिलीफ फंड’देखील याकरिता पुढाकार घेत असून, सर्वसामान्य नागरिक याद्वारे आपली मदत अतिवृष्टिग्रस्तांपर्यंत पोहोचवून बळीराजाच्या घरात आपण प्रकाश पेरू शकता. असे झाले तर संकटग्रस्तांची दिवाळी गोड होईल. त्यांच्या आनंदात आपणही आनंद शोधला तर आपला आनंदही द्विगुणित होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.