Commodity Market: वायदे बाजार वारंवार बंद केल्याने अनिश्चितता वाढते आणि त्यातील शेतकऱ्यांचा सहभाग घटतो.‘सेबी’ने (सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) नुकतीच एक अधिसूचना काढून सात शेतीमालाच्या वायदेबंदीला एक वर्षाची (३१ मार्च २०२७ पर्यंत) मुदतवाढ दिली आहे. शेतीमालाच्या वायदेबंदीला दिलेली ही सलग सहावी मुदतवाढ आहे. त्यामुळे बिगर बासमती तांदूळ, मूग, गहू, हरभरा, सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंड, कच्च्या पाम तेलासह मोहरी तेल आणि मोहरी पेंडचे वायदे १९ डिसेंबर २०२१ पासून बंदच आहेत. .खरे तर शेतीमालाचे बाजारभाव, आयात-निर्यात, डाळी-खाद्यतेल आत्मनिर्भरता याबाबत अगदी सुरुवातीपासून मोदी सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये जसा फरक आहे, तसाच फरक वायदे बाजारच्या निर्णयाबाबत देखील दिसून येतो. वायदे बाजार केवळ अंदाजापुरता मर्यादित न राहता त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना झाला पाहिजे..Grain Procurement: यावल येथे शासकीय भरड धान्य खरेदीला सुरुवात.असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या संबंधित ज्या काही संस्था व्यवस्था आहेत, त्या केवळ आभूषणे ठरतील, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१६ मध्ये व्यक्त केले होते. आणि दुर्दैवी बाब म्हणजे डिसेंबर २०२१ पासून शेतीमालावर वायदेबंदी लादून त्याच्या अपेक्षित लाभांपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचे काम हे सरकार करीत आहे..वायद्यांमुळे शेतीमालाचे भाव वाढतात, शेतीमालाचे भाव वाढले म्हणजे ग्राहकांना महागाईचा फटका बसतो, असा सरकारचा वायदेबंदी लादल्यापासूनचा दावा आहे. वायदे बाजारात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होत असल्याचेही बोलले जाते. वास्तविक वायदे बाजारामुळे शेतीमालाच्या किमती किंवा महागाई वाढत असल्याचा कोणताही पुरावा नाही, असा अहवाल २००७ मध्ये स्थापन केलेल्या अभिजित सेन समितीने दिलेला .Grain Procurement: यावल येथे शासकीय भरड धान्य खरेदीला सुरुवात.रिझर्व्ह बॅंकेच्या २००९-१० च्या अहवालानुसार, एखाद्या उत्पादनाच्या दरातील बदल हे मागणी-पुरवठा नियम, आयातीवरील अवलंबित्व, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती यावर अवलंबून असतात. वायदे बाजार हे केवळ भविष्यातील दरबदलांचा ट्रेंड दाखवत असते, तसेच दरातील बदलांमुळे होणारा धोका कमी करण्याची संधी वायदे बाजारातून मिळते..आयआयटी मुंबई आणि बिरला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नाॅलाॅजीने केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, की वायदेबंदीच्या काळातही शेतीमालाच्या किमती वाढल्या होत्या. कारण त्या वेळी पुरवठा कमी होता. पुरवठा सुरळीत झाल्यानंतर किमती कमी झाल्या. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलामुळे किमती ठरत असतात. वायदे बाजार हा मुक्त अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे..Agriculture Commodity Market : हळद, तूर, कांद्याच्या किमतीत घट.हरभरा, सोयाबीन, गहू आणि मका यांच्यासाठी वायदे बाजार प्राइस डिस्कव्हरीसाठी प्रभावी ठरतो. फ्यूचर व्यवहारामुळे महागाई वाढत नाही, उलट किमतींमधील अस्थिरता कमी होते. सट्टेबाजी ही मोजक्याच मालांमध्ये आढळते, सर्वत्र नाही. वायदे बाजार वारंवार बंद केल्याने अनिश्चितता वाढते आणि शेतकऱ्यांचा सहभाग घटतो. त्यामुळे शासनाने धोरणात सातत्य राखून हा बाजार अधिक मजबूत करणे आवश्यक आहे..वायदे बाजाराद्वारे शेतकऱ्यांना जागतिक व राष्ट्रीय पातळीवर मागणी असलेल्या शेतीमालाची माहिती मिळते. दीर्घ कालावधी, तसेच अल्पमुदतीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार कळतात. त्यातून शेतीमाल विक्रीचे अंदाज बांधता येतात. शेतीमालाची बाजार जोखीम यामुळे कमी होते. वायदे बाजारामुळे शेतीमालाच्या किंमत निश्चितीची शक्ती ही मूठभर व्यापाऱ्यांकडून सरकून ती बाजाराच्या हातात, शेतकऱ्यांकडे सरकते..त्यामुळे केंद्र सरकारने मागील सहा वर्षांपासून बंदी असलेले वायदे बाजार तत्काळ सुरू करावे. एवढेच नव्हे तर वायदे बाजारात अधिकाधिक पिके येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. काही घटक वायदे बाजाराचा गैरफायदा घेऊन सट्टेबाजी, कृत्रिम तेजीचे प्रकार करत असले, तरी त्यांना चाप लावणे हा त्यावरचा उपाय आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन वायदेबंदीच्या निर्णयावर पुनर्विचार व्हायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.