Climate Disaster Relief: गेल्या अनेक दशकांतील सर्वांत मोठ्या महापुराने पंजाबची मोठी हानी झाली आहे. पंजाबमधील जवळपास सर्वच जिल्हे, दोन हजारांहून अधिक गावे, चार लाख लोक आणि सुमारे दोन लाख हेक्टर शेती क्षेत्र या महापुराने बाधित झाले आहे. ५० हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला. अनेक जनावरे वाहून गेली. घर-गोठे यांसह शेतकऱ्यांची झालेली वित्त हानी फार मोठी आहे. पंजाबला धान्याचे कोठार मानले जाते..येथील सुपीक मातीत पिकणारा भात आणि गहू देशाची भूक भागवितात. परंतु नद्यांना आलेल्या पुराने पिकांबरोबर सुपीक माती वाहून गेली. शेतात रेती येऊन साचली. पंजाब सरकारने ‘ज्याची शेती त्याची रेती’ असा निर्णय घेतला असला, तरी शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीची कशानेही भरपाई होणार नाही, हे मात्र नक्की! या महापुराने पंजाबची अवस्था ‘बुडता पंजाब’ अशी केली आहे..Punjab Flood: पंजाबमधील पूर संकट; केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांनी आढावा घेतला.अभूतपूर्व अशा पुराचा पंजाब सामना करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आपल्याला जगभराची चिंता आहे, असे भासवीत होते. अफगाणिस्तानमधील भूकंपाबद्दल दुःख व्यक्त करीत होते. या महापुरादरम्यान बिहार दौऱ्यासाठी देखील त्यांनी वेळ काढला म्हणून त्यांच्यावर टीकेची झोडही उठली. शेवटी हिमाचल प्रदेश आणि पंजाबला भेट देत मदतीची घोषणा केली असता त्यावरही वादंग सुरू आहे. प्राथमिक अंदाजात पंजाबमध्ये २० हजार कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असताना मोदी यांच्याकडून मदतीची घोषणा मात्र एक हजार ६०० कोटींची झाली..ही मदत तुटपुंजी असल्याचे मत पंजाबमधील मंत्री हरदीपसिंग यांनी व्यक्त केल्यावर तुम्हाला हिंदी समजत नाही का? अशा भाषेत त्यांचा अपमान करण्यात आला. एकंदरीतच या सर्व वादाच्या मुळाशी सुरुवातीपासूनचा केंद्र-राज्य सरकारमधील दुरावा आणि तीन कृषी कायद्यांना प्रामुख्याने पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे केलेला विरोध हे आहे. परंतु आपत्तीच्या काळात राजकारण बाजूला ठेवून पंजाबला अधिकाधिक आर्थिक मदत देऊन ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल हे पाहावे लागेल..Punjab Flood Funds: पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मदतनिधीवरुन कलगीतुरा.पंजाबमधील पूर हा नैसर्गिक तसेच मानव निर्मित देखील आहे. पंजाबसह हिमाचल प्रदेश आणि जम्मू, काश्मीर या भागांत झालेली अतिवृष्टी हे महापुराचे प्रमुख कारण आहे. सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या पाच नद्यांची भूमी म्हणून पंजाबला ओळखले जाते. पंजाबमध्ये कृषी समृद्धी आणणाऱ्या या नद्या आता पंजाबचे अश्रू बनल्या आहेत. या सर्व नद्यांचा उगम हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर अर्थात हिमालय पर्वतात आहे..अतिवृष्टीने हिमाचल प्रदेश तसेच पंजाबमधील धरणे भरलेली होती. त्यात वरून कोसळधार सुरू असताना धरणांतून पाणी सोडणे गरजेचे होते. त्यामुळे नदी परिसर पुरात बुडाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पंधरा दिवस आधीच या पुरांचा अंदाज दिला होता. राज्य व केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन उपाय योजनांची आखणी-अंमलबजावणी केली असती तर महापुराने एवढी हानी झाली नसती..पूर क्षेत्रावर झालेले अतिक्रमण, नद्या आणि कालवे यांच्या तटबंधांच्या देखभालीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये महापुराने नुकसान वाढले आहे. हिमाचल प्रदेशात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यांचं रुंदीकरण, बोगदे, पूल, रिसॉर्ट, हॉटेल्स यांनी नद्यांवर अतिक्रमण केले. या परिसरात जंगलतोडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या घटना पण वाढत आहेत. मानवाचा निसर्गातील अनावश्यक हस्तक्षेप कमी झाला नाही तर निसर्ग त्याचे अजून उग्र रूप दाखवू शकते, हेही या पुराच्या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.