Farmer Issues: म्हणून अडचणीतील कोंबडीपालन व्यवसायाला राज्य सरकारने तत्काळ सोयी सवलती द्यायला हव्यात. .बदलते हवामान आणि युद्ध परिस्थिती यांचा फटका अंडी तसेच मांसोत्पादनासाठीच्या कोंबडीपालन व्यवसायाला देखील बसला आहे. यातून हा व्यवसाय सावरण्यासाठी हरियाना सरकारने काही नियम, अटींतून सूट देण्याबरोबर कर सवलती देखील दिल्या आहेत. अनेक कारणांमुळे वाढलेला उत्पादन खर्च कमी करून शेतकरी तसेच व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी तेथील सरकारने हा निर्णय घेतला आहे. .Goat Farming Business: भूमिहीन, अल्पभूधारक? नव्हे, या तर शेळीपालनातील उद्योजिका .Poultry Farming: लेयर कोंबड्यांच्या मरतुकीने अंड्यांचा तुटवडा; उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका.यावर्षी उन्हाळ्यात तापमानाने उच्चांक गाठला होता. त्यामुळे कितीही उपाययोजना केल्या तरी ‘हीट स्ट्रोक’ने पक्षांची मरतूक अधिक झाली. ही मरतूक १५ टक्क्यांपर्यंत झाल्याचे जाणकार सांगतात. एकीकडे अंडी तसेच मांस उत्पादनासाठीचा उत्पादन खर्च वाढला, तर दुसरीकडे उष्णतेने पक्ष्यांची मरतूक अधिक झाली. त्यामुळे सध्या अंडी तसेच ब्रॉयलरचे (मांसोत्पादनासाठीची कोंबडी) दर थोडे वधारले आहेत. संगोपनासाठीच्या पिल्लांचा दरही वाढला आहे आणि ऑर्डर दिल्यानंतर पक्षी मिळण्यासाठी अडीच ते तीन महिने थांबावे लागत आहे. मांसोत्पादनासाठीची कोंबडी तयार होण्यास सहा ते आठ आठवडे तर अंडी उत्पादन सुरू होण्यासाठी २५ आठवडे म्हणजे किमान सहा महिने लागतात. त्यामुळे कोंबडीपालनासाठीचे एकंदरीतच नियोजन अवघड होऊन बसले आहे. अशा विचित्र अडचणीत कोंबडीपालन व्यवसाय सापडला आहे. त्यामुळे हरियाना सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे..आपल्या राज्यात सुद्धा उन्हाळ्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेलेले होते. त्यात कोंबड्यांची मरतूक झाली. त्यातच मजुरी तसेच कोंबडी खाद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. यामुळे कोंबडीपालन व्यवसायाचे एकंदरीतच अर्थकारण बिघडले आहे. उन्हाळ्यात कमी झालेली कोंबड्यांची उत्पादनक्षमता अजूनही म्हणावी तशी वाढली नाही. आणि राज्य शासनाचा या व्यवसायाला काही दिलासा देखील मिळाला नाही. गंभीर बाब म्हणजे पशुसंवर्धन विभागाला कृषीचा दर्जा दिला तरी त्याची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही. कृषिप्रमाणे पशुसंवर्धनाला विजेचे दर अजूनही लागू करण्यात आलेले नाहीत. .Poultry Industry Reform: हरियाना शासन पोल्ट्री क्षेत्रासाठी नियमांत शिथिलता आणणार.उलट पोल्ट्रीसाठी विजेचा वापर अधिक होऊन त्यांना भरमसाठ वीज बिल येते. त्यांना वीजबिलात सवलतही मिळत नाही. कोंबडीपालनासाठी केलेल्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करामध्ये अजूनही सवलत मिळत नाही. पोल्ट्री व्यवसाय गावपरिसरात वाढत असताना त्यावर ग्रामपंचायतीकडून अवास्तव मालमत्ता कर आकारला जातो. त्यामुळे देखील लहान मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. पोल्ट्रीशेड शेत जमिनीच्या पडीक जागेत अथवा डोंगराच्या कडेला उभे केले जाते. ग्रामपंचायतीकडून रस्ता, वीज, पाणी अशी कोणतीही सुविधा त्याला मिळत नाही. .अशावेळी ग्रामपंचायतींनी पोल्ट्री व्यावसायिकांना मालमत्ता करात सूट द्यायला हवी. बँका कोंबडीपालनासाठी घेतलेल्या कर्जाला कृषीप्रमाणे व्याज सवलतही देत नाहीत. कर्जबाजारी पोल्ट्री व्यावसायिकांना व्याज माफी अथवा सवलत व त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करायला हवे. शिवाय खेळत्या भांडवलाअभावी राज्यात अनेक पोल्ट्री युनिट बंद पडले आहेत. अशावेळी खेळत्या भांडवलासाठी अर्थसाह्य मिळायला हवे. कोंबडी पालनातून मिळणारे खत शेतीसाठी उपयुक्त ठरते. अंडी आणि मांस उत्पादनाद्वारे मानवाला प्रथिनयुक्त आहार मिळतो. .कोंबडीपालन व्यवसाय ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करते. राज्यात अनेक शेतकरी तसेच व्यावसायिकांनी बँकांकडून अर्थसाहाय्य घेऊन मोठी भांडवल गुंतवणूक करून अंडी आणि मांसोत्पादनासाठीचा कोंबडीपालन व्यवसाय उभा केला आहे. अशा वेळी अडचणीतील कोंबडीपालन व्यवसायाला राज्य शासनाने आधार द्यायला हवा. शेतीप्रमाणे कृषिपूरक व्यवसाय म्हणून आपणच केलेल्या घोषणेप्रमाणे कोंबडीपालनाला तत्काळ सोयी सवलती द्यायला हव्यात. शिवाय हरियानाच्या धर्तीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे सुलभिकरण, कोंबडी खाद्यासाठी अन्न राज्यातून येणाऱ्या कच्च्या शेतीमालावर बाजार शुल्क माफी, शिवाय ‘चेंज ऑफ लॅंड यूज’ अटीतून सवलत अशी पावले उचलायला हवीत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.