Eco Friendly Farming India: देशातील सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचा विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लिंक्डीन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केले. पंतप्रधानांनी १९ नोव्हेंबर रोजी कोइमतूर येथील दक्षिण भारत नैसर्गिक शेती संमेलनाला हजेरी लावली होती. तिथे अनेक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीतील आपल्या यशस्वी प्रयोगांची माहिती सादर केली..एकंदरीतच तमिळनाडू राज्यात झालेली नैसर्गिक शेतीची प्रगती पाहून प्रभावित झालेल्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरात या पद्धतीचा अंगीकार केला जावा, असा आग्रह धरला आहे. याआधीही त्यांनी या विषयावरील आपली आग्रही भूमिका वारंवार मांडलेली आहे. महाराष्ट्रातही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतला आहे..Natural Farming: नैसर्गिक शेती स्वीकारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी.त्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा पुनरुच्चार केला. वास्तविक २०२४ मध्ये केंद्र सरकारने देशात नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियान राबविण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला एक कोटी शेतकरी आणि एकूण ७.५ लाख हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्या तुलनेत महाराष्ट्राने २५ लाख हेक्टरचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले आहे..रसायनमुक्त शेती, जमिनीचे आरोग्य, निविष्ठांवरील वाढता खर्च, हवामान बदलाला सुसंगत शेती पद्धती, शाश्वतता, सुरक्षित अन्न या कारणांसाठी नैसर्गिक शेतीचा अंगीकार करणे गरजेचे आहे, असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी याच कारणांसाठी सेंद्रिय शेतीचा आग्रह धरला जात होता.आता मात्र सरकार दरबारी नैसर्गिक शेतीचा बोलबोला आहे. प्रचलित रासायनिक शेती पद्धतीत निविष्ठांचा बेसुमार वापर केला जात असल्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी पर्यायी शेती पद्धतींचा विचार केला पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही..Natural Farming: नैसर्गिक शेतीसमोरील वास्तविक आव्हाने.परंतु तरीही या शेती पद्धतींना शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद का मिळत नाही, याच्या खोलात जाणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीत उत्पादनात घट होत असल्यामुळे सरकारने अनेक वर्षे प्रचार करूनही शेतकऱ्यांना ती व्यवहार्य वाटत नाही, अशी कबुली महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दिलेली आहे.पंतप्रधानांनीही काही हजार हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आल्याची माहिती दिली आहे. त्याचा अर्थ उद्दीष्ट अजून बरेच लांब आहे. या पर्यायी शेतीपद्धतींमध्ये उत्पादनात येणारी घट आणि सेंद्रिय किंवा नैसर्गिक उत्पादनांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणा.तसेच नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती या दोन संकल्पनांबाबत मोठा संभ्रम आहे. सेंद्रिय शेतीमध्ये काही सेंद्रिय निविष्ठा शेताबाहेरून आणून वापरण्यास मान्यता आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाची मानांकनेदेखील निश्चित केलेली आहेत. मात्र नैसर्गिक शेतीमध्ये शेताबाहेरील निविष्ठा वापरणे अपेक्षित नाही..निसर्गाच्या नियमांमध्ये ढवळाढवळ न करता ही शेती केली जाते. वास्तविक नैसर्गिक संसाधनांचा सजग व संतुलित वापर, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य राखणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन यांचा मेळ घालणारी शेती पद्धती अवलंबणे ही काळाची गरज आहे..सध्या रासायनिक निविष्ठांचा अतिरेकी वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता, पीक उत्पादन, पर्यावरण, मानवी आरोग्य यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला तोंड देण्यासाठी विविध पर्यायी शेती पद्धतींचा आग्रह धरला जात आहे. पण या शेती पद्धतींवर आधी सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच या शेती पद्धती शेतकऱ्यांसाठी किफायतशीर व शाश्वत ठरल्या पाहिजेत. तरच शेतकरी त्यांचा स्वीकार करतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.