Household Consumption Expenditure Survey: मानवाची जशीजशी उत्क्रांती होत गेली तशातशा त्याच्या जगण्याच्या पद्धती बदलत गेल्या. जशा जगण्याच्या पद्धती बदलल्या तशा राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या पद्धतींमध्येही फरक पडत गेला. सर्वसामान्य भारतीयांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मागील दीड-दोन दशकांत पारंपरिककडून ‘फास्ट फूड’ अशा पदार्थांकडे आणि आता पुन्हा हळूहळू हा कल पौष्टिक मिलेट्सह आपल्या पारंपरिक अन्नपदार्थांकडे पाहावयास मिळतोय. .त्यातच आता भारतीय कुटुंबाची अन्न सेवनातील विविधता वाढली आहे. त्यांचा धान्यांवरील खर्च कमी झाला असून अधिक पौष्टिक दूध, फळे, भाजीपाला, कडधान्य, अंडी, मांस, मांसे यांचे सेवन वाढले आहे. ‘एचसीईएस’च्या अर्थात ‘हाऊसहोल्ड कन्झम्प्शन एक्स्पेंडिचर सर्व्हेक्षण’च्या संशोधनात्मक अहवालातून हे पुढे आले आहे..Food Processing Success: अन्न प्रक्रिया उद्योगात कोल्हापूरचा देशात डंका!.सर्वसामान्य ते मध्यम उत्पन्न गटातील लोकांची क्रयशक्ती वाढल्याचे हे निदर्शक आहे. केवळ उदरभरणाऐवजी पोषणमूल्ययुक्त आहारावर सर्वसामान्य नागरिक भर देत आहेत, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. असे असले तरी यातील विरोधाभास असा की अन्नसेवनात विविधता आली, पोषणमूल्ययुक्त आहार वाढला तरी लोह, झिंक, कॅल्शिअम आणि जीवनसत्त्वांची कमतरता मात्र मोठ्या प्रमाणात जाणवते आहे..अनेक महिला, मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते आहे. यावरून अधिक पोषणमूल्ययुक्त वाण निर्मिती आणि वापरात आपण कमी पडलो, हेच स्पष्ट होते. नव्या वाण संशोधनात अजूनही आपला भर उत्पादकता वाढीवरच आहे. नवे पीक वाण संशोधन करताना उत्पादकता ही अधिक पाहिजेतच परंतु त्याचबरोबर ते अधिक पोषणमूल्ययुक्त देखील असायला हवेत, याकडे हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी फार पूर्वी लक्ष वेधूनही कृषी संशोधकांचे मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होते..India Food Consumption: धान्यावरच्या खर्चात घट; दूध, फळे, मांसाकडे कल.भरडधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, दूध, अंडी खाण्याचे प्रमाण देशात वाढले म्हणजे त्यांची मागणी वाढून उत्पादकांच्या पातळीवर अधिक दरही मिळणे अपेक्षित असताना तसे मात्र होताना दिसत नाही. या सर्व शेतीमालाचे दर कमी असून उत्पादकांचा उत्पादनखर्च देखील त्यातून भागत नाही, ही वस्तुस्थिती आहे..सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत देशातील ८० लाख कुटुंबांना मोफत धान्य मिळते, त्यामुळे गरीब कुटुंबे देखील धान्यांऐवजी इतर पोषक घटकांवर अधिक खर्च करीत आहेत. मोफत धान्य वाटप हे धान्यांचे दर कमी राहण्याचे मुख्य कारण आहे. शिवाय शेतीमालाचे भाव वाढू लागले की महागाईच्या झळा नागरिकांना बसू नयेत म्हणून केंद्र सरकार बाजारात हस्तक्षेप करून दर पाडण्याचे, नियंत्रणात ठेवण्याचे काम करते..त्याचवेळी इतर अनेक दैनंदिन गरजेच्या सेवा-उत्पादनांचे भाव कितीही वाढले की त्याकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. येथून पुढे बाजारात पोषक अन्नपदार्थांची मागणी वाढेल, असेही निरिक्षण या अहवालाने नोंदविले आहे. पोषक धान्य तसेच दूध, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची मागणी वाढली म्हणजे भावही वाढून त्याचे लाभ उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडले पाहिजेत, ही काळजी घ्यावी लागणार आहे..मोफत धान्य वाटपात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे धान्य मिळते. शिवाय त्यात अनेकदा गैरप्रकारही होत असतात. अशा वेळी मोफत धान्य वाटपाऐवजी गरीब कुटुंबांना कुपन देऊन त्यांना खुल्या बाजारातून धान्य खरेदी करायला सांगितले तर सरकारला धान्य खरेदी करावी लागणार नाही. शिवाय गरीब कुटुंबे खुल्या बाजारातून दर्जेदार धान्य खरेदी करतील. त्यामुळे धान्यांची मागणी तसेच दरही वाढीस हातभार लागणार आहे. उत्पादक, ग्राहक तसेच शासन अशा तिघांच्याही हिताच्या निर्णयावर सकारात्मक विचार व्हायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.