Navratri Empowerment Message: देशभर शारदीय नवरात्र उत्सव कालपासून साजरा केला जात आहे. राज्याच्या ग्रामीण भागात मात्र नवरात्रीवर दुष्काळाचे सावट स्पष्टपणे दिसते. खरे तर खरीप सुगीनंतर येणारा हा उत्सव राज्यात अतिशय आनंदात साजरा केला जातो. परंतु यावर्षी दुष्काळामुळे सुगीच नाही, म्हटले तरी चालते. केंद्रीय पथकांची शेतशिवारात पाहणी सुरु आहे..यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आरती अमोल वासनिक या महिलेने केंद्रीय पथकासमोर मांडलेली व्यथा मन सुन्न करणारी आहे. ‘पिकलं नाही म्हणून धनी गेले. आता घर कसं सांभाळायचं, जगायचं कसं,’ असा सवाल ही महिला केंद्रीय पथकाला विचारते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी तिने हार मानली नाही, तर तिला घर सांभाळायचे आहे, जगायचे आहे..Women Empowerment: बचत गटांमुळे मिळाली ओळख.आपण पाहतोय राज्यात शेतकरी आत्महत्या सातत्याने होतात. परंतु महिला शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. महिला शेतकरी खचून जाऊन आत्महत्या तर करीतच नाही, उलट आपल्या नवऱ्याने आत्महत्या केली तरी ते दुःख पचवून एक हाती शेती अन् संसाराचा गाडा त्या नेटाने हाकताहेत. ही महिलांची खरी ताकद आहे..सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होऊन त्या शक्ती रुप मूर्तीला ‘देवी’ असे नाव मिळाले. या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्थितः। अर्थात अनेक रूपात स्थित असलेल्या देवीचे एक शक्तीरुप देखील आहे. या देवी दुर्गामातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा सण म्हणजे नवरात्र..Women Farmers: राबते हात, न मिळणारी जमीन.आपल्या आजूबाजूला देखील परिस्थितीवर मात करीत शेतीच नाही तर उद्योग, व्यवसाय, नोकरी, सेवा, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी उल्लेखनीय काम केल्याचे आपण पाहतोय. आदिशक्ती किंवा दुर्गामातेचे एक रुप अष्टभुजा देवी देखील आहे. अष्टभुजा देवीला आठ भुजा म्हणजे हात आहेत. ढाल, तलवार, त्रिशूल, धनुष्यबाण, कमळ, शंख अशी आयुधे तिच्या हाती आहेत..दृष्ट राक्षसांपासून स्वतःच्या अन् भक्तांच्या रक्षणार्थ अशी आयुधे अष्टभुजा देवीने आपल्या हाती धरली असल्याची आख्यायिका आहे. आजच्या युगातील आधुनिक अष्टभुजांना दोनच हात असले तरी शेतीतील अनेक कामे करण्याकरिता त्यांनी विविध आयुधे हाती धरलेली आहेत. कष्ट, चिकाटी, प्रामाणिकपणा, परोपकार हे महिलांचे नैसर्गिक गुणवैशिष्टे आहेत, तर बचत ही त्यांना लाभलेली सवय आहे. महिला पुरुषांपेक्षा अधिक सहनशील, मेहनती, जिद्दी, कल्पक आणि व्यवहारी असतात, याचा प्रत्यय व्यवहारात अनेकदा येतोय..असे असताना आपले हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, समानता, संधी यासाठी त्यांना झगडावे लागते. महिला सबलीकरणाबाबत वारंवार बोलले जाते. परंतु खरच महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण झाले आहे का, हाही संशोधनाचा विषय आहे. एक महिला म्हणून त्यांचा कोणताही हक्क, अधिकार डावलण्यात येऊ नये. त्यांना समान संधी, तसेच शेती असो वा व्यवसाय यामध्ये स्वातंत्र्य हवे..शिवाय शेती असो वा घरगुती निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाव हवा. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ मानला जातो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच एक खेळ असतो. या नवरात्री उत्सवात मुर्तीरुपी शक्तीची आराधना करण्याबरोबर प्रत्यक्षातील नवदुर्गांना देखील सन्मान बहाल करूया. नवदुर्गांना शेती, उद्योग-व्यवसायाबाबत संपूर्ण स्वातंत्र्य देवू या. नवदुर्गा म्हणून त्यांना कोणताही हक्क, अधिकार, समानता, संधी डावलण्यात येऊ नये, ही काळजी देखील घेवूया..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.