Monsoon Return Journey : आजपासून मॉन्सूनच्या (नैऋत्य मोसमी वारे) परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. २०२० पासूनच्या सुधारीत वेळापत्रकानुसार एक सप्टेंबरऐवजी १७ सप्टेंबर अशी तारीख परतीच्या प्रवासाची निश्चित करण्यात आली होती. या सुधारीत तारखेच्या दोन दिवस आधीच पश्चिम राजस्थानमधून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे..गेले परतीच्या वाटे मेघ पावसाळीनभ निवळले निळे ऊन सोनसळीपरतीच्या मेघांनी निरोप घेतल्यावर आकाश जसे निरभ्र होते, तसेच नद्या-निर्झर, तलाव-सरोवर याचं गढूळले पाणी निवळून काचेसारखे नितळ होते. निरभ्र नभ या नितळ पाण्याच्या आरशात आपले रूप न्याहाळताना दिसते. नितळ पाण्यात सांडलेले हे नभ मोठे मोहक वाटतात, असे परतीच्या पावसाचे सुंदर वर्णन कवी रवींद्र पांढरे यांनी केले आहे. .Return Monsoon : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू.देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात मॉन्सूनचा पाऊस पडतो. परंतु दर वर्षी मॉन्सूनचे आगमन, वितरण आणि परतीचा प्रवास यात बदल दिसून येतो. कोणत्याही दोन वर्षांचा मॉन्सून एकसमान नसतो आणि हेच भारतीय मॉन्सूनचे मुख्य वैशिष्ट राहीले आहे. यावर्षी सुरुवात ते अगदी आता शेवट राज्यात मॉन्सूनचा खूपच लहरीपणा दिसून आला. राज्यात मे पूर्ण महिना मॉन्सूनपूर्व पावसाने गाजविला. त्यानंतर २५ मे लाच राज्यात दाखल होऊन आगमनाचा मागील साडेतीन दशकांचा विक्रम मोडीत काढला..वेळेआधीच दाखल झालेला हा पाहुणा पेरणीच्या हंगामात मात्र रुसून बसला. जून शेवटी रुसवा सोडून मॉन्सूनने बरसायला सुरुवात केली. पुढे जुलै, ऑगस्टमध्ये सुद्धा पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे अतिवृष्टीने शेतीमालाचे नुकसानच अधिक झाले. यावर्षी मराठवाड्यात प्रामुख्याने नांदेड, लातूर जिल्ह्यांत अधिक पाऊस झाला. आता परतीचे संकेत मिळाले तरी या दोन जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसत आहे..दरवर्षीचा मॉन्सून आपल्याला बरेच काही शिकवून जातो. परंतु त्यापासून केवळ नोंदीच्या पलीकडे फारसा काही बोध हवामान विभाग देखील घेताना दिसत नाही. मागील तीन-चार वर्षांपासून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाचे वेळापत्रक बदलले तरी खरीप-रब्बी हंगाम, पिके, त्यांची वाण या अनुषंगाने त्यास पूरक काम राज्यात झाले नाही. परतीच्या पावसाचे ढग स्थानिक असतात आणि त्यांची उंची खूप असते. .Monsoon Update: मॉन्सून सोमवारपासून परतीच्या प्रवासावर.हा पाऊस वादळी स्वरूपाचा असतो त्यामुळे परतीचा पाऊस लांबला, रेंगाळला तर खरिपातील काढणीला आलेले सोयाबीन आणि पहिल्या-दुसऱ्या वेचणीचा कापूस भिजतो, तर रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकांना वरचा पाऊस लाभदायक समजला जात नाही. .दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जेथे खरीप हंगामात पुरेसा पाऊस पडत नाही, तेथे परतीचा पाऊस उपयुक्त ठरतो. परतीच्या पावसाच्या ओलाव्यावरच तिथे रब्बी पिके काढता येतात. असे असताना मॉन्सूनच्या आगमनाविषयी जितके संशोधन झालेले आहे तितके परतीविषयी झालेले नाही..राज्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा अचूक अंदाज शक्य तितका लवकर मिळावा यासाठी हवामानशास्त्र विभागाने प्रयत्न करायला हवेत. खरीप पिकांच्या नियोजनासाठी आणि रबी पिके निवडण्यासाठी तो अतिशय उपयुक्त ठरेल. परतीच्या मॉन्सूनच्या बदलत्या ‘पॅटर्न’नुसार खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांच्या जाती तसेच पेरणीच्या नियोजनात काही बदल करावा लागेल का, यावर कृषी विद्यापीठांनी संशोधन वाढवायला हवे. या संशोधन शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम कृषी विभागाला करावे लागणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.