Maharashtra Flower Growers Facing Low Market Prices: गणेशोत्सवाचा कालावधी हा शेतकऱ्यांसाठी फुलांच्या विक्रीचा वर्षभरातील सर्वांत चांगला हंगाम मानला जातो. यंदा मात्र गणेशोत्सवात फुलांना अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे फुलांचा उत्पादन खर्चदेखील निघाला नसल्याने फूल उत्पादक आर्थिक संकटात आहेत. पुण्याजवळील यवत (ता. दौंड) हे फुलांचे गाव म्हणून ओळखले जाते. परंतु या गावातील काही शेतकऱ्यांनी फुलशेती परवडत नाही म्हणून तोडणीच बंद केली आहे. .यावरून राज्यभरातील फूल उत्पादक किती अडचणीत असतील, याचा अंदाज आपल्याला यायला हवा. राज्यभरातून तसेच शेजारील राज्यांतून देखील पुणे, मुंबईच्या बाजारात फुले येत आहेत. त्यामुळे स्थानिक फुलांना दर मिळत नाही, असे कारण सांगितले जात आहे. याचा थोडाबहुत परिणाम फुलांच्या बाजारावर झाला असेल. परंतु सर्वत्रच कृत्रिम फुलांच्या बोलबाल्याने नैसर्गिक फुलांचा बाजार खऱ्या अर्थाने कोमेजून गेला आहे, हे मान्य करावे लागेल..Festive Flower Market: गणेशोत्सवात जळगावात बहरला फुलबाजार.पुणे, मुंबई असो की राज्यातील इतर शहरे या वर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छोट्या मोठ्या मंडळांनी आपल्या गणरायाचा दरबार सजवला आहे. मात्र त्या सजावटीमध्ये खऱ्याखुऱ्या फुलांऐवजी प्लॅस्टिकची फुले, हारच अधिक दिसून येत आहेत. झेंडू, गुलाब, चमेली, मोगरा तसेच जरबेरा, ॲस्टर, गुलाब महागड्या फुलांनाही प्लॅस्टिक फुलांचे पर्याय उपलब्ध आहेत. सण-उत्सवच नाही तर लग्न सोहळे, वाढदिवस, नेहमीची घर सजावट अशा कोणत्याही समारंभात कृत्रिम फुलांचाच वापर वाढला आहे. हार, तोरण, कंठी, फुलदाण्या, माळा, रंगीबेरंगी पडदे यामध्ये कृत्रिम फुलापानांचा वापर होत आहे..टिकाऊ, दिसायला आकर्षक, टवटवीत, सजावटीसाठी सोपी आणि स्वस्तही असल्यामुळे ग्राहकांचा कल कृत्रिम फुलांकडे दिसतो. असे असले तरी प्लॅस्टिक फुलांमुळे पर्यावरण धोक्यात येत असून, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसत आहे. मागील दशकभरात कृत्रिम फुलांचा बाजार वाढत जाऊन आज ८० टक्क्यांपर्यंत व्यापला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी फुलशेती करणे सोडून दिले, ही वस्तुस्थिती आहे..Flower Farmers Struggle: फुलबाजारातील शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवा.नैसर्गिक ताजी फुले ही केवळ सजावट नसून ती भक्ती आणि निसर्गाशी असलेले नाते आहे. कमी दराच्या मोहात खऱ्याखुऱ्या फुलांना दुय्यम स्थान देणे योग्य नाही, याचा विचार ग्राहक म्हणून आपण सर्वांनी करायला हवा. कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याची मागणी राज्यातील फूल उत्पादक मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ मार्च २०२६ रोजी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राज्यात प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष अधिसूचना काढण्यात येईल आणि महापालिकांना अशा बाजारपेठांवर कारवाईचे अधिकार देण्यात येतील, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात याबाबत कोणतीही कार्यवाही मात्र अद्याप झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात बाजारात प्लॅस्टिक फुलांची सर्रास विक्री होत आहे..हे असेच चालू राहिले तर पुढे नवरात्र, दसरा, दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईत जिकडे तिकडे प्लॅस्टिकचीच फुले दिसतील. त्यामुळे राज्यात प्लॅस्टिक फुलांवर बंदी आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी..अलीकडच्या काळात रोप निर्मितीपासून ते फुलांची विक्री यांचा खर्च वाढला आहे. उघड्यावरील तसेच पॉलिहाउसमधील फुलशेतीसाठी शेतकऱ्यांचा खर्च अधिक होतोय. त्यात वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी फुल उत्पादक मेटाकुटीस आले आहेत. अशा वेळी ऐन हंगामात कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांची शेती अडचणीत येऊ नये, एवढी काळजी राज्यकर्त्यांनी घेतली तर बरे होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.