Indian Agriculture: महाराष्ट्र राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत १८८९ मिलिमीटर म्हणजे सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबरमधील मुसळधार पावसाने मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात खरीप पिके जमीनदोस्त केली. हे नुकसान पिकांपुरते मर्यादित न राहता या पावसाने जीवित-वित्तहानी खूप केली आहे. या नुकसानीचे पाहणी पंचनामे होत राहतील सरकारकडून काही मदतही जाहीर केली जाईल. .परंतु यातून शेतकऱ्यांना खंबीरपणे उभे राहायचे आहे, पुढे जायचे आहे. एखाद्या हंगामात नैसर्गिक आपत्ती आली, की त्याची कसर लगेच दुसऱ्या हंगामात काढण्यासाठी शेतकरी कंबर कसत असतो तसा आताही तो रब्बी हंगामासाठी उभे राहण्याकरिता कंबर कसणार आहे. मॉन्सूनच्या अधिक पावसाने जमिनीत ओलावा भरपूर आहे. शिवाय नदी-नाले, बोअरवेल-विहिरीपासून ते तलाव-धरणांत वाढलेल्या पाणीसाठ्याने यंदा रब्बी पीकपेरा वाढू शकतो..Rabi Season MSP: गव्हात १६०, हरभऱ्यात २२५ रुपये वाढ.परंतु याकरिता शेतकऱ्यांना आपल्या सर्वांच्या आधाराची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीने खराब झाली अशा शेतकऱ्यांना ती लागवड योग्य करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून काही तरतूद करता येईल का, ते पाहावे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा रब्बी हंगामासाठीच्या भांडवलाचा आहे. रब्बी हंगामासाठी फारच कमी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळते..या वेळी खरीप पिकांचे नुकसान झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे पैसाच राहणार नाही. अशा वेळी रब्बीसाठीच्या पीककर्जाची अधिकाधिक जागृती निर्माण करावी लागेल. राज्य शासनासह बँकांनी रब्बी पीककर्जासाठीच्या अटी शर्ती थोड्या शिथिल करून अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल ही काळजी घ्यायला हवी. याशिवाय शेतकऱ्यांना रब्बी पिकांचे बियाणे, पेरणीसाठी रासायनिक खते अनुदान अथवा सवलतीच्या दरात देता येतात का, हेही पाहावे लागेल. यासाठी राज्य सरकारसह महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच खासगी कंपन्या पुढाकार घेऊ शकतात..निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड कोरडी हवा, असे रब्बी हंगामात पिकांना पोषक वातावरण असते. या हंगामात खरिपाच्या तुलनेत रोग-किडींचा प्रादुर्भावही कमी असतो. विशेष म्हणजे पावसाच्या अनिश्चिततेमुळे होणाऱ्या नुकसानीचा धोकाही रब्बी हंगामात कमीच असतो. त्यामुळेच रब्बी हंगाम अधिक शाश्वत मानला जातो. परंतु या वर्षी मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक आहे, असा हवामान अंदाज आहे..Rabi Sowing : रब्बी पिकांची पेरणी ११० टक्क्यांवर शक्य.हा पाऊस ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान पडतो. अशा पावसामुळे रब्बी पिकांच्या नुकसानीची शक्यता देखील अधिक आहे. ही सर्व परिस्थिती पाहता रब्बी पिके तसेच जातींची निवड आणि त्यानंतरची काळजी याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करायला हवे..राज्याचा विचार करता रब्बी ज्वारी, हरभरा, करडई ही पिके उपलब्ध ओलावा अथवा संरक्षित सिंचनावर घेतली जाऊ शकतात. तर गहू, मका, वाटाणा आणि भाजीपाला ही पिके खात्रीशीर पाण्याच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांना घेता येतील. पीकविम्याच्या बाबतीतही नेहमी जसा घोळ घातला जातो, तसा रब्बीमध्ये अपेक्षित नसून, अधिकाधिक रब्बीचे क्षेत्र पीकविम्याद्वारे कव्हर व्हायला हवे..रब्बी हंगामासाठी केवळ पाणी उपलब्ध असून चालणार नाही; शेती सिंचनासाठी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सोडावे लागेल. राज्यभर विजेचा अखंड आणि पूर्ण क्षमतेने पुरवठा व्हायला हवा. असे झाले तरच रब्बीसाठीच्या पोषक वातावरणाचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. आणि खरीप हंगामातील कसर रब्बी हंगामात काढता येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.