Turmeric Production: हळद उत्पादन, वापर आणि निर्यातीतही भारत देश जगात अग्रेसर आहे. जागतिक उत्पादनाच्या ७५ ते ८० टक्के उत्पादन भारतात होते. आपल्या उत्पादनाच्या सुमारे १२ टक्के हळद आपण निर्यात करीत असलो तरी हा जागतिक बाजारातील आपला वाटा ६५ टक्के ठरतो. इतर शेतीमालाप्रमाणे हळदीच्या दरात चढ-उतार होत राहतात. मागील पाच वर्षांत प्रतिक्विंटल पाच हजार ते २५ हजार अशी हळदीच्या दरात मोठी तफावत आढळून आली आहे..निर्यातीच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यातही चढ-उतार पाहावयास मिळतात. असे असले तरी मागील पाच वर्षांत एक लाख ७० हजार ते एक लाख ८० हजार टन या दरम्यान आपली हळद निर्यात (अपवाद २०२३-२४ - एक लाख ६२ हजार टन) राहिली आहे. मागील महिन्यापासून हळद निर्यातीस गती मिळाल्याने सध्या दर तेजीत (प्रतिक्विंटल १४ ते १६ हजार रुपये) आहेत..Turmeric Export: पाच महिन्यांत हळदीची ८० हजार टन निर्यात.जागतिक बाजारपेठेत मागणी वाढत असल्याने यंदा निर्यातवाढही संभवते. आपली हळद जागतिक बाजारात ‘भारतीय केशर’ (इंडियन सॅफ्रॉन) म्हणून ओळखली जाते. असे असले तरी देशात पूर्वापार शेतकरी घेत असलेल्या या मसालावर्गीय मुख्य पिकाबाबत लागवडीपासून ते प्रक्रिया, निर्यात अशी कशातही सुसूत्रता दिसत नाही..हमखास उत्पादन आणि बऱ्यापैकी दर याबरोबर कीड-रोगांचा आणि जंगली जनावरांचा त्रास कमी म्हणून शेतकरी हळदीला प्राधान्य देत होते. परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून देशात हळद लागवड क्षेत्रातही चढ-उतार दिसून येत आहेत. वर्ष २०२३ च्या हंगामात देशपातळीवर हळद क्षेत्र दीड लाख हेक्टरने घटले होते..Turmeric Production: देशात हळद उत्पादन वाढण्याचा अंदाज.देशात हळदीच्या ५३ जाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, प्रचलित जातींचे पण शुद्ध, खात्रीशीर बेणे बहुतांश शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होत नाही. कमी उत्पादकता, वाढता उत्पादन खर्च तसेच मूल्यवर्धन-ब्रॅंडींग-निर्यातक्षम गुणवत्तेचा अभाव ह्या प्रमुख समस्या उत्पादकांपुढे आहेत..आपल्याकडे आजही हळदीची काढणी, काढलेली हळद गोळा करणे हे काम सध्यातरी मजुरांकडूनच केले जाते. हळद काढणी, गोळा करणे यासाठी उत्पादकांना यंत्रे-अवजारे उपलब्ध झाले पाहिजे. कच्च्या हळदीवरच प्रक्रियेचे तंत्र तैवान, डेन्मार्क या देशांमध्ये उपलब्ध आहे.यामध्ये कुरकुमीनचे प्रमाण पण अधिक राखले जाते. हे तंत्र आपल्या देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला हवे. दररोजच्या अन्न निर्मितीत हळद सर्वत्र वापरली जाते. शिवाय हळदीवर प्रक्रिया करून अनेक उपयुक्त पदार्थ तयार केले जातात. औषध, अन्न प्रक्वाढेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.