Cotton Processing: खानदेशासह महाराष्ट्रातील जिनिंग प्रेसिंग कारखाने यंदा दिवाळीनंतरच सुरू होणार हे आता स्पष्ट झाले आहे. या वर्षी राज्यात कापसाची लागवड कमी आहे. त्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिल्या वेचणीत अधिक तसेच दर्जेदार कापूस मिळतो. तोच बाधित झाल्याने यंदा कापसाचे उत्पादन आणि दर्जाही खालावणार आहे. याचा फटका देखील जिनिंग प्रेसिंग कारखान्यांना बसणार आहे..खानदेशात १५२ जिनिंग प्रेसिंग कारखाने असून त्यापैकी काही कारखाने सुरू होण्याचा अंदाज आहे. राज्याचा विचार केला तर जिनिंग प्रेसिंगची अवस्था अधिकच बिकट दिसून येते. राज्यात ७०० पेक्षा जास्त जिनिंग प्रेसिंग कारखाने असून, त्यापैकी जेमतेम २०० कारखाने चालू असतात. शेतीमालाचे मूल्यवर्धन करून विक्री करण्याचा सल्ला सर्रास दिला जातो. कापूस हे तर राज्यातील म्हणण्यापेक्षा देशाचे मुख्य नगदी पीक आहे..Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार.अशा कापसावर उत्पादकांकडून शून्य टक्का मूल्यवर्धन होते म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कच्चा माल कापसाची खेडा खरेदीच अधिक होते. अशा प्रकारच्या व्यवहारात उत्पादकांना योग्य दर तर मिळतच नाही, उलट त्यांची फसवणूक होते. सातत्याने तोट्याच्या कापसाच्या शेतीने अनेक उत्पादक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. यातूनच कापूस उत्पादकांच्या आत्महत्या वाढत आहे. या दुष्टचक्रातून कापूस उत्पादकांना तसेच त्यावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यांना बाहेर काढावे लागणार आहे..जिनिंग, प्रेसिंगला लागलेली घरघर आताची नाही, मागील दीड दशकभरापासून देशातील जिनिंग, प्रेसिंग उद्योग गटांगळ्या खातोय. जिनिंग, प्रेसिंगच्या धीम्या गतीला कापसाच्या कमी आवकेबरोबर वित्तीय संकट हे देखील एक कारण आहे. त्यामुळेच पुढे कापसाची आवक वाढली तरी सर्वच जिनिंग, प्रेसिंग सुरू होऊन ते पूर्ण क्षमतेने चालण्याची शक्यता कमीच आहे. कापसाचे मूल्यवर्धन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर जिनिंग प्रेसिंग मिल्स, सूत गिरण्या तसेच धाग्यापासून कापडनिर्मिती असे सर्व चित्र उभे राहते. ही वस्तुस्थिती देखील आहे..Cotton Ginning Factory: जिनिंग कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा.याकरिता मोठे भांडवल लागते. नवे जिनिंग प्रेसिंग युनिट उभे करणे हे एकट्या-दुकट्या शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. अशा वेळी एका मोठ्या गावातील अथवा लहान चार-पाच गावांतील शेतकरी एकत्र येऊन एक जिनिंग प्रेसिंग कारखाना सुरू करू शकतात. शिवाय कापूस उत्पादक पट्ट्यातील तरुण बेरोजगार जुन्या, बंद पडलेल्या जिनिंग प्रेसिंग मिल्स घेऊन त्या सुरू करण्याचा पर्याय पण चांगला आहे..हा पर्याय अव्यवहार्य वाटत असला तरी काटेकोर नियोजनातून व्यवहारी पद्धतीने जिनिंग प्रेसिंग चालविल्या तर त्या नफ्यात यायला वेळ लागणार नाही. हे शक्य झाल्यास गावातील कापूस उत्पादकांची लूट थांबून गावातला पैसा गावातच खेळू शकतो. शासनाच्या चुकीच्या धोरणाने सुद्धा जिनिंग, प्रेसिंग मिल्स डबघाईला आलेल्या आहेत..अशा वेळी आर्थिक अडचणीतील जिनिंग, प्रेसिंग मिल्सचे कर्ज पुनर्गठण, व्याज सवलत त्यांना मिळायला हवी. उद्योजकांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. शेतीमाल आधारित महत्त्वाच्या अशा या प्रक्रिया उद्योगाला वीजबिलात देखील सवलत मिळायला हवी. हे करीत असताना रुई, सरकी, सूत यांच्या निर्यात वाढीवर देखील लक्ष द्यावे लागणार आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत चीन, बांगला देश, पाकिस्तान यासह इतरही शेजारी राष्ट्रांशी आपली कापूस ते कापड निर्यात कशी वाढेल, हेही पाहावे लागेल. त्याशिवाय कापूस मूल्यवर्धन अथवा प्रक्रिया उद्योग स्थिरस्थावर होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.