Wildfire Prevention: खरे तर फेब्रुवारी-मार्चमध्ये जंगल परिसरातील गवत वाळू लागते, मोठ्या वृक्षाची पानगळ होऊ लागते. ही परिस्थिती वणवे लागण्यास पोषक असते. परंतु आता वनोपज गोळा करण्यासह लाकडाच्या चोरीसाठी नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच वणवे लावण्याचे काम काही माफिया करीत आहेत. सातपुडा पर्वतरांगेत डिंक निर्मितीसाठी सध्या वणवे पेटविले जात आहेत. झाडांना आग लावल्यास डिंक चांगला येतो शिवाय अवैध वृक्षतोड आणि त्यांची वाहतूक सोपी जाते, असा चोरट्यांचा समज आहे. वणवे लावण्याचे असेच काहीसे प्रकार राज्याच्या अन्य भागांत पण पाहावयास मिळतात. .वणवे हे काही नैसर्गिक कारणांनी लागले जातात तर मानवनिर्मित वणवे लावलेही जातात. जंगलात लागणारे ९५ टक्के वणवे मानवनिर्मित असतात. वनोपजाबरोबरच वृक्षतोड, वन जागेवर अतिक्रमण करणे, शिकारीसाठी अथवा केलेल्या शिकारीचे पुरावे नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक वणवे लावले जातात. अनेकदा शेतातील राब जाळताना ही वणवा लागतो. जंगल क्षेत्रातील ज्वालामुखी, वीज पडणे, विजेच्या तारांतून पडणारी ठिणगी ही वणवा पेटण्याची काही नैसर्गिक कारणे आहेत..Forest Conservation: वन संवर्धनाचे गांभीर्य कधी?.वणव्यात चराऊ कुरणे, जंगलातील साग, साल, खैर, बांबू आदी मौल्यवान वटवृक्षांसह असंख्य दुर्मीळ वनौषधी नष्ट होत आहेत. वन्य जीव, पशुपक्षीही वणव्यातून आपले प्राण वाचवू शकत नाहीत. एवढेच नव्हे, डोंगर उतारावर केली जाणारी शेती, जंगलालगतच्या जमिनीला वणव्याच्या झळा बसतात. शेतातील पिके, फळझाडे, गोठ्यातील जनावरे वणव्याच्या आगीत होरपळतात. त्यामुळे वनांच्या बरोबरीने शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान हे वेगळेच! वणव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका शेकडो किलोमीटर अंतरापर्यंतच्या पिके आणि वनस्पतींना बसत असल्याचेही एक अभ्यास सांगतो..वणव्यामध्ये जमिनीतील आर्द्रता घटते, वनांची उत्पादनक्षमताही घटते. सातत्याने आगी लागल्यास वनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी घट होते. वणव्यामुळे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन नष्ट होते. जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. मध्य युरोपामधील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे तापमानामध्ये वाढ होत असल्याचेही एका संशोधनातून पुढे आले आहे. यावरून वणव्याच्या दाहक झळा आपल्या लक्षात यायला हव्यात..दुर्गम भागात आदिवासी बांधव वन संरक्षण करीत त्यातील वनोपजोवर आपली उपजीविका भागवत आले आहेत. त्यांनी वणवे पेटवून अथवा निसर्गाला ओरबाडून मध, डिंक असो की इतर वनोपज कधीच गोळा केला नाही. परंतु काही माफिया आता वन परिसरात सक्रिय झाल्याने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईनेच वणवे लावण्यासह त्यांच्या वनांतील इतर अवैध कारवायांना आळा बसेल..Forest Protection: सातपुड्यात डिंकासाठी वणवे पेटविण्याचे प्रकार.वणवे लावणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करायला हवेत. आगीचा इशारा देणारे वायरलेस सेंसरचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळविली जाऊ शकते. वणव्याची माहिती मिळताच तत्काळ ते विझविण्याचे प्रयत्न झाल्यास त्यात होणारी मोठी हानी टाळली जाऊ शकते. वणवा आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाने त्यात स्थानिक लोकांचा सहभाग वाढवायला हवा..पेटलेला वणवा आटोक्यात आणणे हे अत्यंत अवघड काम आहे. त्यामुळे तो पेटूच नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी. वणव्यामुळे वनांचे होणारे नुकसान व त्याचा आपल्या जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत स्थानिक लोकांचे प्रबोधन वाढवावे लागेल. जंगलाबाहेरील आग जंगलात पसरू नये याकरिता जंगलाभोवताली ठराविक रुंदीच्या जाळ रेषा हाही वणवा रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.