FMD Vaccination Drive: महाराष्ट्र राज्य लाळ्या खुरकूत मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असून, आतापर्यंत लसीकरण मोहिमेअंतर्गत सलग आठ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आणि नवव्या फेरीला १३ ऑगस्ट २०२६ पासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेत सर्व पशुपालकांनी शंभर टक्के लसीकरण करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. साधारणतः नोव्हेंबर ते जूनपर्यंत लाळ्या खुरकूत आजाराची साथ राहते..या आजाराचा प्रसार झपाट्याने होतो. याचा संक्रमण काळ सुमारे ३ ते ७ दिवस असतो. जनावरास प्रथम ताप येतो. जनावराचे अन्न पाणी घेणे कमी होते. तोंडातून लाळ गळणे सुरू होते. सड, कासेवर, खुरावर फोड येतात, तेथे जखम होते. दुर्लक्ष केल्यास जनावरांचे खूर गळून पडतात. या रोगामुळे मोठी जनावरे मरत नाहीत; परंतु दूध, मांस लोकर, कातडी उत्पादन आणि काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो..Livestock Vaccination: भटक्या पशुपालकांच्या स्थलांतर मार्गांची नोंद होणार; लसीकरण मोहिमेला गती.आजारामुळे दुधाळ जनावरांची दूध उत्पादकता वीस टक्क्यांनी कमी होते. जनावरांची काम करण्याची क्षमता ५० टक्क्यांनी कमी होते. आजारातून मुक्त झालेली जनावरे पुर्ववत कार्यक्षम होऊ शकत नाहीत. लाळ्या खुरकूत सोबत घटसर्पसारख्या आजारांची लागण होऊन जनावरे दगावल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. रोग संसर्ग काळात काही युरोपीय देश, अमेरिका आपल्या देशातील मांस, कातडी, त्यापासून बनवलेल्या वस्तू आयात करण्यास धजावत नाहीत. यावरून या रोगाचे गांभीर्य आपल्या लक्षात यायला हवे..नियमित व नियोजनबद्ध लसीकरण कार्यक्रमामुळे लाळ्या खुरकूत रोगावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे लसीकरणाद्वारे २०३० पर्यंत लाळ्या खुरकूत रोगाचे देशातून समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निर्धारित केले. सोबत सर्व राज्यांना पशुधन संख्येच्या मागणीनुसार लस पुरवठा करण्याचे धोरण निश्चित केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रात २०२० पासून लसीकरणाच्या फेऱ्या होत आहेत. सहा महिन्यांनंतर एक अशा वर्षांत किमान दोन फेऱ्या होणे आवश्यक आहेत..Livestock Vaccination Campaign: ‘लाळ्या खुरकूत’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम १३ ऑगस्टपासून.याप्रमाणे आता १२ वी फेरी चालू असणे अपेक्षित होते. मात्र १३ ऑगस्टपासून नववीच फेरी सुरू होणार असल्याने लसीकरणाची गती संथच आहे म्हणावे लागेल. यापूर्वी लसीकरण फेऱ्यादरम्यान अनेकदा पुरेशा प्रमाणात लस मात्रा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यात तांत्रिक अनियमितताही आढळून आल्या आहेत. दरम्यानच्या काळात लाळ्या खुरकूत रोगाची लागण होऊन जनावरे दगावून पशुपालकांचे नुकसान झाले आहे..राज्याला सुमारे अडीच कोटी लशींची गरज ही एका फेरीला लागते.लसीकरणाची फेरी सहा महिन्यात एकदा अर्थात वर्षात दोनदा घ्यावी लागते. केंद्र शासनाकडून राज्याला नवव्या फेरीसाठी एक कोटी लसमात्राच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा वेळी उर्वरित लशींचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. लाळ्या खुरकूत लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन पशुपालकांना करताना लसीचा पुरेशा प्रमाणात वेळेत पुरवठा होईल, ही काळजी आयुक्तांनी घ्यावी..लस साठवणुकीसाठी ्ग्रामीण भागापर्यंत शीतसाखळी विकसित होईल, हेही पाहावे. लसीकरण परिणामकारक ठरावे यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचे जंतनिर्मूलनही करण्यात येत असून त्याचे स्वागतच आहे. लसीकरणामुळे लाळ्या खुरकूत रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. ती वर्षभर टिकावी म्हणून दर सहा महिन्यांनी त्याला बूस्टर डोस द्यावा लागतो..त्याचेही नियोजन झाले पाहिजे. कर्नाटकातील लाळ्या खुरकूत लसीकरण मोहिमेला मिळालेल्या यशाचे मुख्य कारण ‘एक गाव -एक युनिट’ असे सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यात येते. आपल्याकडे गाव पातळीपासून असे सूक्ष्म नियोजन झाले तरच ही मोहीम फत्ते होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.