ID Implementation Challenges: शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात ज्याकाही त्रुटी, अडचणी आहेत, त्या शासन-प्रशासनाने तत्काळ दूर करायला हव्यात. भारतात डिजिटल शेती अभियानांतर्गत नोव्हेंबर २०२४ पासून प्रायोगिक तत्त्वावर, तर जानेवारी २०२५ पासून मोठ्या प्रमाणावर ‘शेतकरी ओळखपत्र’ (फार्मर आयडी) देण्यास अधिकृत सुरुवात झाली. महाराष्ट्रात या उपक्रमाची व्यापक अंमलबजावणी १४ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू आहे..भारतात डिजिटल शेती अभियानांतर्गत नोव्हेंबर २०२४ पासून प्रायोगिक तत्त्वावर, तर जानेवारी २०२५ पासून मोठ्या प्रमाणावर ‘शेतकरी ओळखपत्र’ (फार्मर आयडी) देण्यास अधिकृत सुरुवात झाली. महाराष्ट्रात या उपक्रमाची व्यापक अंमलबजावणी १४ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू आहे. राज्य सरकारने १५ एप्रिल २०२५ पासून सर्व कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. फार्मर आयडी काढण्यापासून तो अनिवार्य करण्यापर्यंत राज्य सरकारने थोडीच घाईच केली. त्याचे कारण राज्यात अजून २९ लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळालेला नाही. .Farmer ID Issues: राज्यातील तीन लाख शेतकरी ‘फार्मर आयडी’ पासून वंचित.या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी काढण्यामध्ये शेतकरी तसेच प्रशासनाला देखील अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी योजनांच्या लाभावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात भोगवटादार वर्ग दोन, महार वतन, देवस्थान आणि इतर विशेष भूधारणा प्रकारांतील लाखो शेतकऱ्यांची नोंद महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीत स्वतंत्रपणे वर्गीकृत करण्यात आलेली नाही. त्यामुळे ॲग्रीस्टॅक प्रणालीद्वारे या शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ देणे शक्य होत नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. विशेष भूधारणा गटातील काही शेतकऱ्यांकडे सातबारा उपलब्ध असून, त्यांच्या पिकांची नोंद ई-पीक पाहणीद्वारेही केली जाते. तरीही त्यांना फार्मर आयडी मिळत नाहीत. अर्थात ॲग्रीस्टॅक प्रणालीत तांत्रिक त्रुटी देखील आहेत. याशिवाय वृद्ध शेतकऱ्यांचे बोटाचे ठसे न उमटण्यापासून ते फेरफार नोंदी प्रलंबित असल्याने देखील काही शेतकरी फार्मर आयडी काढू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे..Farmer ID Mandatory: फळपीक विम्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक.फार्मर आयडी काढण्यासाठी एकतर शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणेकडे संपर्क साधायचा आहे, नाही तर यंत्रणेने स्वतःहून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे आहे. यातील दुसरा पर्याय अधिक सुलभ असून शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावण्यापेक्षा यंत्रणेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा फार्मर आयडी काढून द्यायला हवा. अति दुर्गम भागात यंत्रणेने कसे पोहोचायचे, असा सवाल देखील काही अधिकारी-कर्मचारी उपस्थित करीत आहेत. मतदान घेण्यासाठी कितीही दुर्गम भागात यंत्रणा पोहोचू शकते, मग फार्मर आयडीसाठी का पोहोचू नये, असा प्रश्न वंचित शेतकरी उपस्थित करीत आहेत. .शेतकऱ्यांसह सर्वांनाच आधी आधार कार्ड काढून घ्यायला सांगितले. आधार क्रमांक हा सर्व शासकीय योजनांच्या लाभासह इतरही बहुतांश ठिकाणी मुख्य ओळखपत्र म्हणून वापरता येईल, असे सांगितले गेले. आधार कार्ड काढताना सुद्धा अनेकांना अडचणी आल्या. सर्वसामान्य जनतेला यांत बराच त्रासही झाला. आधारची सक्ती स्थिरावत असतानाच शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घेण्यास सांगितले गेले..त्या वेळी आता फार्मर आयडी कशाला, असा मुद्दा अनेकांनी उपस्थित देखील केला. परंतु फार्मर आयडीचे महत्त्व नंतर कळू लागले. यामुळे योग्य व्यक्तीला योजनेचा लाभ मिळून त्यातील गैरप्रकार कमी होण्यास हातभारच लागतो. आधार क्रमांकांत केवळ नाव, गाव, पत्ता वय एवढेत होते. मात्र फार्मर आयडीमध्ये शेतकऱ्यांची समग्र माहिती साठविलेली असते. यामुळे ऑनलाइन योजनेचे लाभ शेतकऱ्यांना सुलभ झाले. अशा वेळी फार्मर आयडीपासून जे वंचित आहेत त्यांना तत्काळ तो मिळायला हवा. शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात ज्याकाही त्रुटी, अडचणी आहेत, त्या शासन-प्रशासनाने तत्काळ दूर करायला हव्यात..अनेक शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित राहण्याला महसूल तसेच कृषी विभागांतील असमन्वयाची किनार देखील आहे. असे यापूर्वी पीएम-किसान तसेच दोन विभागांचा संबंध असलेल्या इतरही योजनांबाबत झाले होते. ॲग्रीस्टॅक योजनेला गती देण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे तर प्रत्यक्ष अंमलबजावणी कृषीकडे आहे. महसूल विभाग मनुष्यबळ नाही म्हणून हात वर करीत आहे, तर कृषी विभागाची कामात कुचराई काही लपून राहिलेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.