Vijayadashami Festival: नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर करून देवीच्या विविध रूपांची आराधना केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण आला आहे. यालाच विजयादशमी असेही म्हटले जाते. नवरात्र तसेच विजयादशमी हा खरे तर शेतीमधील संक्रमण काळ असतो. वर्षा ऋतूतून शरद ऋतूत प्रवेश होतो. पाऊस थांबून थंडीची चाहूल लागू लागते. खरीप पिकांची काढणी-विक्री तसेच रब्बी हंगामाची मशागत आणि पेरणीची शेतशिवारात लगबग सुरू असते. सर्वत्र चैतन्यमय आणि आनंदी वातावरण असते..दसऱ्याच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक समजले जाणारे शेतात नवीन आलेले धान्य, पिकांची कणसे-ओंब्या तर संवर्धनाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या आंबा-शमी-आपट्यांची पाने तसेच गतिचे प्रतीक असणारे शेती यंत्रे-अवजारे घरी आणून शेतकरी हे सर्व पूजेसाठी ठेवतात. यालाच काही भागात सीमोल्लंघन म्हटले जाते. नवरात्रीमध्येच घरोघरी मातीचे घट बसवून नवधान्यांची पेरणी केली जाते..Agriculture Task Force: ‘टास्क फोर्स’ : एक फार्स.नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या फुलांच्या माळा याला घातल्या जातात. यावेळी रब्बी हंगामासाठी बियाण्यांची उगवण परीक्षण देखील होते. परंतु यावर्षी मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारातील पिके वाहून गेली. शेतात पाणी साठल्याने ती कुजत आहेत. हाताला आलेल्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पशुधन, यंत्रे-अवजारेही वाहून गेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी दुःखी कष्टी असून आता सीमोल्लंघन करायचे कशाचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे..विजया दशमी साजरी करण्यामागे संघर्षाच्या व त्यानंतर मिळविलेल्या घवघवीत यशाच्या अनेक कथा आहेत. संघर्ष हा तर शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुंजलेला. हवामान बदलाच्या काळात शेतकऱ्यांचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. शेतकऱ्यांचे नवरात्रीचे नऊ दिवस महापूरासोबतच्या संघर्षात गेले. त्यामुळे आज विजयादशमीच्या मुहूर्तावर नवा अध्याय लिहिण्यासाठी शेतकऱ्यांना काही सीमोल्लंघन करावे लागणार आहेत. काळ कसोटीचा आहे..Indian Agriculture: आत्मनिर्भर की आयात निर्भर.लढवय्या शेतकरी अशा अनेक संकटावर मात करून आत्तापर्यंत पुढे गेला आहे, आत्ताही जाणार आहे. अभूतपूर्व अशा महापूरात झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. काही शेतकरी त्यातून आत्महत्याही करीत आहेत. काळ कितीही कठीण असला तरी तो पुढे सरकत असतो. आता आलेले संकटही निवारणार आहे. त्याकरिता थोडा वेळ मात्र द्यावा लागेल. टोकाचा विचार करतानाही कोठे थांबावे हे ज्याला योग्यप्रकारे कळते, तेच खरे सीमोल्लंघन ठरणार आहे..त्यामुळे नैराश्याला हद्दपार करून जगण्याच्या वेगळ्या वाटा शोधाव्या लागणार आहेत. वाहून गेलेल्या मातीने ओसाड झालेल्या जमिनीला लागवड योग्य करण्यासाठी विशेष बाब म्हणून शासन-प्रशासनाने देखील जुन्या योजना, त्यांच्या निकषांत बदलांचे सीमोल्लंघन करायला हवे. हवामान बदलाच्या काळात प्रामुख्याने मराठवाडा विभागात खरीप पेरणीच्या निर्धारित कालावधीत, पिके, त्यांच्या जाती यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का, याबाबतचा विचार दशकभरापूर्वीपासून होत आहे..शास्त्रज्ञ त्या अनुषंगाने संशोधन करीत असल्याचेही सांगताहेत. परंतु यातून शेतकऱ्यांना ठोस असे अजून तरी काही मिळालेले नाही. कृषी शास्त्रज्ञांनी पारंपरिक संशोधनाचे सीमोल्लंघन करीत नवी पिके, नव्या जाती, नव्या पेरणीच्या वेळा देण्याची देखील हीच वेळ आहे. प्रतिकूल परिस्थितीतही पिकविलेल्या शेतीमालास रास्त दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या सीमा ओलांडून उत्पादित मालाचे मूल्यवर्धन-प्रक्रिया तसेच थेट विक्री व्यवस्थेत उतरायला हवे. शेतीतील जोखीम वाढत असताना शेतीपूरक व्यवसायाबाबतही सीमोल्लंघन अपेक्षित आहे. चौबाजूने घेरलेल्या संकटात निर्धाराने उभे राहण्यासाठी हे गरजेचेच आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.