Indian Agriculture: हवामान बदलाच्या मागील दोन-अडीच दशकांत वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी कोलमडून पडला आहे. यावर्षी राज्यात झालेल्या अभूतपूर्व अशा अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान आणि नुकसानग्रस्तांना मदतीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेमक्या अशा वेळी मानव - वन्यजीव संघर्षामुळे दरवर्षी शेतीचे १० ते ४० हजार कोटींचे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या एका अभ्यासातून पुढे आलेले आहे. .वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होणारे हे नुकसान मोठे असून याचा प्रतिकूल परिणाम शेतकऱ्यांबरोबर शेतमजूर आणि एकंदरीतच ग्रामीण अर्थकारणावर होत आहे. हे नुकसान केवळ पिकांपुरते मर्यादित नाही तर वन्यप्राण्यांना कंटाळून राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात अनेक शेतकरी-शेतमजूर तसेच त्यांचे पशुधन जखमी होतात, त्यात काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत..Wildlife Agriculture Damage: वन्यप्राण्यांमुळे शेतीचे ४० हजार कोटींचे नुकसान.एवढा गंभीर हा विषय असताना शासन-प्रशासन पातळीवर मात्र तेवढाच तो हलक्यात घेतला जातो. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी-शेतमजूर-पाळीव प्राणी यांचा जीव गेल्यास अथवा त्यांना कायमचे अपंगत्व आल्यास, शिवाय पिकांच्या नुकसानीतही आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु कितीही आर्थिक मदत केली तरी गमवाव्या लागलेल्या जिवाची आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीची बरोबरी होत नाही. त्याहूनही दुर्दैवी बाब म्हणजे काही वन्यप्राण्यांनी केलेले नुकसान लगेच लक्षात येत नाही शिवाय भरपाईसाठीची प्रक्रिया, नियम-अटी एवढ्या किचकट आहेत, की यात अनेक जण भरपाईपासून वंचित राहतात..खरे तर मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढण्यास मानवजातच जबाबदार आहे. पूर्वी वन्यजीवांसाठी असलेल्या परिसंस्थेमध्येच त्यांचा अधिवास असायचा. वन्यजीवांच्या अन्न-पाणी गरजा तिथेच पूर्ण होत होत्या. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष नव्हताच. मात्र, गेल्या काही वर्षांत आपण जंगले, गायरान जमिनी, गवताळ कुरणे, नैसर्गिक पाणवठे, नदी-नाल्यांभोवतालची घनदाट झाडेझुडपे नष्ट केली आहेत..Sugarcane Crop Loss: अतिवृष्टीचा उसाला मोठा दणका.त्यामुळे वन्यप्राण्यांना राहण्यासाठी नैसर्गिक घर राहिले नाही, शिवाय त्यांना तिथे अन्न-पाणी मिळेनासे झाले आहे. अन्न-पाण्याच्या शोधात वन्यजीव आता शेतजमिनी, मानवी वस्त्यांमध्ये घुसखोरी करीत आहेत. यातूनच शेतपिकांच्या नुकसानीबरोबर प्रामुख्याने बिबट्या-मानव संघर्ष वाढला आहे. असे असताना वन्यप्राण्यांची समस्या ही पोरकी मानली जाते. कृषी विद्यापीठे, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभाग यांनी ही समस्या कधी आपली मानली नाही..वन्यप्राण्यांचा प्रश्न वनखात्याचा आहे, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, अशी कृषी विभागाची धारणा आहे. वन्यप्राण्याच्या नुकसानीत शेतकऱ्यांना तत्काळ पुरेशी भरपाई मिळायलाच हवी. शिवाय भविष्यात वन्यप्राण्यांचा शेती-शेतकऱ्यांना त्रास कमी होईल, यावर देखील काम करावे लागणार आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या अभ्यास अहवालात पिकांचे नुकसान कमी करण्याबरोबर शेतकरी आणि वन्यजीव अशा दोघांच्याही हिताच्या काही शिफारशी असून त्यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा..वन्यप्राण्यांची संख्या वाढत असल्याने त्यांची नसबंदी करून तर काही वन्यजीवांची शिकार करण्यास (वन्य जीव अधिनियमात सुधारणा करून) शेतकऱ्यांना परवानगी मिळावी, असे उपायही सुचवले जात आहेत. या दोन्ही उपायांवर मतमतांतरे आहेत. त्यामुळे जाणकारांच्या सल्यानेच या उपायांवर विचार व्हायला हवा. वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांवरील अतिक्रमणे थांबवावे लागतील. वनविभागाची सौर शेतकुंपणाची योजना आहे. परंतु या योजनेचा प्रसार-प्रचार शेतकऱ्यांमध्ये झाला नाही. या योजनेबाबत जाणीव जागृती निर्माण करून ती प्रभावीपणे राबवावी लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.