Maharashtra Farmers Issues: कमी पाऊसमानामुळे राज्यावर यंदा दुष्काळाचे संकट ओढवले आहे. उन्हाळा जसजसा जवळ येईल, तसतशी या संकटाची तीव्रता आणि त्याच्या शेतकऱ्यांना बसणाऱ्या झळाही वाढणार आहेत. त्यामुळेच अशा संकटाच्या काळात समाजाने शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता जपावी, त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती प्रसन्न हराळे यांनी केले आहे. .अलीकडच्या दुष्काळांची तुलना १९७२ च्या दुष्काळाशी केली जाते. १९७२ चा दुष्काळ हा अन्नधान्य टंचाईचा होता. अलीकडचे बहुतांश दुष्काळ हे तीव्र पाणी टंचाईचे आहेत. अन्नधान्य सहज कुठूनही उपलब्ध करता येऊ शकते, तसे पाणी सहजासहजी उपलब्ध होत नाही. तेव्हाचा आणि आत्ताचा दुष्काळ केवळ अन्न-पाणी टंचाईपुरताच मर्यादित नाही. १९७२ दरम्यान राज्यात बहुतांश एकत्र कुटुंब पद्धती होती. दुष्काळासारखे संकट आले तरी त्यावर मात करण्यासाठी गाव, घर, कुटुंबात एकोपा होता..आलेले संकट हे समाजावरचे आहे, ही भावना होती. सर्वांनी मिळून संकटाचा सामना करावयाचा आहे, हा संवेदनशील भाव जिवंत होता. आज याच्या अगदी विपरीत परिस्थिती आहे. दुष्काळासारखे संकट वाटून घ्यायला पुढे कुणी सरसावत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल होतो, खचून जातो. त्यातून शेतकरी आत्महत्या देखील वाढत जातात. अशा वेळी त्याला मदतीची आधाराची खूप गरज असते, हे शासन आणि समाजाने देखील लक्षात घेतले पाहिजे..Drought Relief: दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत, २२,४०० कोटींच्या एनडीआरएफ मदतीची मागणी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना निवेदन.भीषण असा दुष्काळ अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावा लागणार आहे. अर्थात दुष्काळात केवळ तांत्रिक, आर्थिक मदत पोहोचविण्यापलीकडे शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देखील द्यावा लागणार आहे. शासन-प्रशासन पातळीवर दुष्काळग्रस्तांच्या आर्थिक मदतीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून ती पारदर्शीपणे त्यांच्या पदरी पडायला हवी..Drought Crisis: संकट मोठे असले, तरी शेतकऱ्यांनी धीर सोडू नये : कृषिमंत्री .दुष्काळाच्या अनुषंगाने इतरही उपाययोजनांची (कर्जवसुली स्थगिती, फीस माफी, चारा छावण्या) प्रभावी अन् गतिमान अंमलबजावणी झाली पाहिजे. यापलीकडे जावून दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेमुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी गावपातळीवर समुपदेशन केंद्रे उभारायला हवीत. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद वाढविला पाहिजे..दुष्काळाची व्याप्ती पाहता शासन-प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडतात, अशा वेळी समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्याला जमेल तशी मदत दुष्काळग्रस्तांना केली पाहिजे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन केवळ दिवाळी साजरी केल्याने त्यांचे संकट दूर होणार नाही, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. कॉर्पोरेट कंपन्यांना आपला ‘सीएसआर’ फंड दुष्काळी मदतीकडे वळविता येईल का, हेही पाहावे..याशिवाय स्वयंसेवी संस्था, समाजातील काही दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन दुष्काळग्रस्त कुटुंबाच्या मुलभूत गरजा, त्यांच्या मुलांचे शिक्षणासाठी काही हातभार लावता येतो का, यावरही विचार करायला हवा. दुष्काळासारख्या संकटाच्या काळात सामाजिक संवेदनशीलता आणि परिस्थितीचे भान ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे..राज्यातील नागरिकांनी उत्सव, समारंभ आणि इतर अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देता येईल का, हेही पाहावे. दुष्काळ ही नैसर्गिक तसेच मानवनिर्मिती देखील आपत्ती आहे. ही आपत्ती अत्यंत संवेदनशीलतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीनेच हाताळावी लागेल. आपण एकटे नाहीत, तर सर्व समाज आपल्या पाठीशी आहे, ही जाणीवच दुष्काळात जगण्याचे बळ शेतकऱ्यांना देणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.