Marathi Writer Death: महापुराच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमक्या अशा वेळी याच मातीतल्या शेतकऱ्यांच्या दुःख, वेदनेच्या कथा आपल्या लेखनीतून मांडणारे थोर ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव काळाच्या पडद्याआड गेले आहेत. हा नियतीचा खेळच म्हणावा लागेल. .ग्रामीण भागातील लोकांचे जगणे, शेतकरी शोषितांच्या व्यथा-वेदना ते वाचकांच्या डोळ्यासमोर तेवढ्याच समर्थपणे उभे करायचे. त्यामुळे त्यांचे साहित्य म्हणजे ग्रामीण वास्तवाचे हुबेहुब आणि प्रामाणिक प्रतिबिंब आहे, असे अनेक जाणकारांचे मत आहे..Writer Success Story : एका शेतकऱ्यामधला लेखक कसा घडतो? .मातीशी अतूट नाते ठेवत शेतकरी चळवळीची वैचारीक भुमिका स्वीकारून ते लेखन करीत होते. त्यामुळे शेती, शेतकरी, शेतमजूर अशा समाजघटकांचे मूलभूत प्रश्न - दुष्काळ, हमीभाव, शेतकऱ्यांची लूट, बेरोजगारी आदी ते अत्यंत पोटतिडकीने मांडत असत. त्यांच्या कथालेखनाचे मूळ शेतीविचाराशी निगडीत असले तरी त्यांच्या विचारविश्वाची व्याप्ती दलित, आदिवासी, स्त्रीवादी आणि जनवादी अशी व्यापक होती. त्यामुळे त्यांच्या कथा शेतकऱ्यांच्या दुःखाबरोबर समग्र गावगाड्याची कहाणी सांगत सांगतात..Book Review : लेखकावर नव्हे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चाकूहल्ला.स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा तो काळ होता. दुष्काळ, अन्नटंचाई, दलित-दारिद्र्यात असलेल्यांचे शोषण अशा अनेक समस्यांनी शेतकरी आणि समाज गांजलेला होता. अशा वेळी मातीतल्या माणसांच्या वेदनेबद्दल बोलण्यात, लिहिण्यात भास्कर चंदनशिव हे नाव अग्रणी होते. जांभळढव्ह, भूक, मसनवटा, पीळ, अंगारमाती, लाल चिखल आदी कथांमधून त्यांनी सर्वसामान्यांच्या वेदनांना वाट मोकळी करून दिली. कथासंग्रहाबरोबर त्यांनी ललित लेख, समीक्षा ग्रंथांचेही लेखन केले..त्यांचा अंगारमाती कथासंग्रह वाचून शरद जोशी यांनी ‘तुमच्या रूपाने शेतकरी चळवळीला भाष्यकार मिळाला, या ग्रंथाचे गावागावात जाहीर वाचन व्हायला हवे,’ अशी प्रतिक्रिया पत्राद्वारे चंदनशिव यांना कळविली होती. शेतीमालाची बाजारात होणारी लूट, शेतीमालास मिळणारा कमी भाव, भाजीपाल्यासारखा नाशिवंत शेतीमाल बाजारात नेणेही परवडत नसल्याने शेतकऱ्यांना तो फेकून द्यावा लागतो, हे दाहक वास्तव त्यांनी ‘लाल चिखल’ मधून मांडले..विशेष म्हणजे आजही हे दाहक वास्तव कायम आहे, असे म्हणण्यापेक्षा त्याची धग वाढतच जात आहे. यावरून शेतकऱ्यांच्या समस्या आपण किती गंभीरतेने घेतो, याचे आत्मपरीक्षणही करायला हवे. लाल चिखल कथासंग्रह खूप गाजला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.