Agricultural Economy: साखर कारखान्यांना भविष्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यायी, पर्यावरणपूरक आणि परकीय चलन वाचविणाऱ्या जैवइंधन निर्मितीवर भर द्यावाच लागणार आहे. .अन्नदाता शेतकरी आता ऊर्जादाता, इंधनदाता झाला पाहिजे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी सातत्याने म्हणत असतात. त्या दिशेने केंद्र सरकारद्वारे काही पावलेही उचलण्यात आली आहेत. आता ट्रॅक्टरसह कृषी उपयोगी वाहनांमध्ये जैवइंधन वापरता येईल. परंतु त्यासाठी वाहनांमध्ये काही बदल करावे लागतील, त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दिशेने सरकार पावले टाकत असल्याचे गडकरी यांनी ‘विस्मा’च्या वतीने आयोजित साखर व जैवऊर्जा परिषदेमध्ये नुकतेच स्पष्ट केले. .Ethanol Production: विचाराची शिस्त, आदर्श जपत इथेनॉल निर्मिती : माजी मंत्री बाळासाहेब थोरात .जागतिक तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या तापमानवाढीचे कारण जीवाश्म इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल) वापरातून होणारे कर्ब उत्सर्जन हे आहे. भविष्यात गाड्यांची संख्या वाढत जाणार असल्याने इंधनाचा वापरही वाढणार आहे. दुसरीकडे मागील काही वर्षांपासून चालू असलेल्या युद्धांमुळे जागतिक पातळीवर अस्वस्थ वातावरण आहे. ही युद्धे काही लवकर संपणार नाहीत, असेच दिसते. त्यामुळे महागडे कच्चे तेल आयात करून त्यापासून बनविलेल्या पेट्रोल, डिझेलवरचे वाढते अवलंबित्व काही परवडणारे नाही. त्यातच देशातील साखर कारखाने हे मुळातच आर्थिक संकटात आहेत. त्यात त्यांना आता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहता येणार नाही. साखर कारखान्यांना भविष्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यायी, पर्यावरणपूरक आणि परकीय चलन वाचविणाऱ्या जैवइंधन निर्मितीवर भर द्यावाच लागणार आहे..भारतात सध्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणास पूरक इंजिने बऱ्याच गाड्यांमध्ये आहेत. ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड’ने (बीआयएस) सर्व तपासण्याअंती पेट्रोलमध्ये २२, २५, २७ आणि ३० टक्के इथेनॉल वापरता येईल, असे सांगून नोटिफिकेशन देखील काढले आहे. असे असले तरी पेट्रोलमध्ये ह्या वाढीव टक्क्यात इथेनॉल मिश्रणास पूरक इंजिने निर्मितीसाठी वाहने कंपन्यांना पुढे यावे लागणार आहे. केंद्र सरकारकडून देखील यासाठी पाठपुरावा केला जात आहे. .Brazil Ethanol Production: ब्राझीलचा कल इथेनॉलकडे.उल्लेखनीय बाब म्हणजे मारुती सुझुकी या कंपनीने १०० टक्के इथेनॉलवर चालणारी व्हॅगन आर गाडी निर्माण केली असून त्या गाडीचे लॉन्चिंग ५ जूनला दिल्लीमध्ये आहे. ही फारच आशादायक बाब असून अशाच प्रकारचे इंजिन तयार करण्यासाठी इतर प्रमुख वाहन कंपन्यांनी देखील आता पुढाकार घ्यायला हवा. अशा वाहन कंपन्यांना प्रोत्साहनासाठी काही सवलती देता येतील का, यावर देखील केंद्र सरकारने विचार करायला हवा..जैवइंधनाला पर्याय नाही, हे आता सुनिश्चित झाले असून भविष्यात यांस चांगले दिवस येतील यात शंकाच नाही. त्यामुळे इथेनॉलसाठी देखील केवळ ऊस, मका या एक-दोन पिकांवर विसंबून न राहता शेतातील टाकाऊ पदार्थ, खराब धान्य यांचा वापर वाढला पाहिजे. शिवाय जैवइंधनात साखर कारखान्यांनी केवळ इथेनॉलवर अवलंबून न राहता सीबीजी, ग्रीन हायड्रोजन आणि ‘एव्हिएशन फ्यूल’ यावर प्रयोग करून ते थेट उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. .इथेनॉलसह इतर जैवइंधन निर्मिती तसेच त्याचा वापर वाढत असताना याबाबत धरसोडीच्या धोरणाचा अवलंब केंद्र सरकारने करू नये. असे झाल्यास या देशातील शेतकरी खऱ्या अर्थाने ऊर्जादाता अथवा इंधनदाता बनेल. देशात जैवइंधनावरच्या गाड्या सुसाट धावतील. कर्ब उत्सर्जन कमी होऊन हे पर्यावरणपूरक ठरेल. शेतकऱ्यांना इंधनाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न स्रोत निर्माण होतील. देशाचे परकीय चलन वाचेल. ग्रामीण बरोबरच एकंदरीत देशाचे अर्थकारण बळकट होण्यास हातभार लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.