Kaas Plateau Environmental Impact: जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठाराचा हंगाम यावर्षी चार सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी सुरू करण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. असे असले तरी मागील काही वर्षांपासून कासचे नैसर्गिक सौंदर्य मात्र पूर्वीसारखे फुलताना दिसत नाही. ऑगस्ट ते सप्टेंबर हा कास पठारावर फुले उमलण्याचा सर्वोत्तम काळ! परंतु यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी अनेक प्रजातींची फुले फुललेली दिसत नाहीत. कारवीच्या काही प्रजाती ठरावीक वर्षांनीच फुलतात, हे मान्य! मात्र ठरावीक वर्षांनंतर देखील त्यांचे फुलणे बंद झाले आहे. याची अनेक कारणे आहेत. .त्यापैकी एक म्हणजे पुष्प वनस्पती फुलायला सूर्यप्रकाश महत्वाचा असतो. परंतु या भागात सतत पाऊस सुरू असून मागील अनेक दिवसांपासून सूर्यदर्शनच झाले नाही. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कास पठारावर पर्यटक येऊ नयेत, आले तरी ते फुले फुलण्याच्या विशिष्ट भागात त्यांना जाता येऊ नये म्हणून या पठाराला २०१२ मध्ये पर्यावरण तसेच वनस्पती तज्ज्ञांच्या विरोधाला न जुमानता कुंपण घातले होते. कुंपणामुळे वन्यप्राण्यांची चराई बंद झाली. शेतकऱ्यांकडील पाळीव प्राणी गाई-म्हशी-शेळ्या-मेंढ्या हेही कुंपणामुळे आत पोहोचू शकले नाही..Natural Calamity : प्रकोप ः नैसर्गिक अन् मानवनिर्मितही.त्यामुळे पठारावर गवतवर्गीय वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याचा प्रतिकूल परिणाम पुष्पवर्गीय वनस्पतींवर होऊन त्यांचे वाढणे, फुलणेच बंद झाले. ही चूक लक्षात आल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी (२०२३) तेथील कुंपण काढले गेले. कुंपण काढले तरी हवामानात फारसा बदल झाला नाही तर पूर्वीसारखे कास पठार फुलायला अजून सात-आठ वर्षे लागतील, असे जाणकारांनी कुंपण काढतानाच स्पष्ट केले होते. कास पठाराला कुंपण घालतानाच ते योग्य की अयोग्य, याची शहानिशा तज्ज्ञ समिती नेमून केली असती तर ही वेळ आज आली नसती..पश्चिम घाटातील कास पठाराला जैवविविधतेचा खजिना मानले जाते. कास पठाराची जागा पूर्ण खडकाळ असून, तिथे उगवणाऱ्या पुष्प वनस्पती अल्पजीवी आहेत. या भागामध्ये ८५० पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आढळून येत असून त्यापैकी ३५० हून अधिक पुष्प वनस्पती आहेत. युनेस्कोच्या यादीप्रमाणे धोक्यात असलेल्या ६२४ वनस्पतींपैकी कंदीलपुष्प, दुधी, भुईचक्र, वायतुरा यांसारख्या ३८ जाती या पठारावर आढळतात..Agro Tourism Pune : शेती इकली नाय, तर राखली....कास पठारावर क्रमाक्रमाने फुले फुलत असल्यामुळे निसर्ग आठ-पंधरा दिवसांनी नवा रंगी-बेरंगी शालू नेसतो की काय, असा अनुभव येतो. कासचे संपूर्ण पठार सूक्ष्म जीवशास्त्राच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण असून अतिसंवेदनशील आहे. अशा पठाराचे नैसर्गिक सौंदर्य लुप्त होणे, ही जैवविविधतेची मोठी हानी म्हणावी लागेल. कास पठार लवकरच पूर्ववत फुलण्यासाठी यावर्षीचा फुलांचा हंगाम संपल्यानंतर कृत्रिम गवत कापणी करावी, असा सल्ला काही वनस्पती शास्त्रज्ञांनी वन विभागाला दिला आहे..हा सल्ला वन विभाग किती गांभीर्याने घेते हे पाहावे लागेल. येथे नियंत्रित पर्यटन करावे लागेल. कास पठारावरील अत्यंत आकर्षक, अमूल्य आणि दुर्मिळ अशा रानफुलांवर संशोधन करून त्यांना व्यावसायिक लागवडीत आणण्यासाठी संशोधन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे पुष्प संशोधन संचालनालयाचे तत्कालीन संचालक यांनी २०१७ मध्ये स्पष्ट केले होते. त्यावरही पुढे काहीच काम झालेले दिसत नाही. जपानसारख्या देशात पठारावर फुलांची लागवड करून पुष्पपठार फुलविली जातात, त्यांचे उत्तम संवर्धनही केले जाते. आपल्याकडे मात्र कास सारखे अनेक पुष्पपठारे, पुष्पदऱ्या ह्या नैसर्गिक असून त्यांचे जतन संवर्धन देखील आपल्याकडून होत नाही, ही दुर्दैवी बाब नाही तर काय?.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.