शेतकऱ्यांची मागणी दररोज दिवसा आठ तास विजेची असून, ती पूर्ण क्षमतेने द्या, असा त्यांचा आग्रह आहे. परंतु त्यांच्या माथी रात्रीचीच अतिरिक्त व शिल्लक वीज मारली जाते. माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी देशातील सर्व राज्यांशी समन्वय साधून शेतीपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी राज्यसभेत केली. वन्यप्राणी - मानवाच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली. राज्यात सर्वत्रच मानव - वन्यप्राणी संघर्ष तीव्र होत आहे. विदर्भात शेतकऱ्यांवर वाघांचे हल्ले वाढले आहेत. जुन्नर, शिरूर या भागांत बिबट्यांनी थैमान घातले आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याने पुणे, अहिल्यानगर परिसरांतील काही शेतकऱ्यांनी शेतात पिके घेण्याचे टाळले आहे, एवढी त्यांची दहशत आहे. अशा भीतिदायक वातावरणामध्ये अनेक शेतकऱ्यांना रब्बीच्या सिंचनासाठी जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे. .सध्या हरभरा, गहू, मका, करडई, भुईमूग ही रब्बी पिके वाढीच्या अवस्थेत असून या काळात त्यांना सिंचनाची सर्वाधिक गरज असते. राज्यात मात्र एक आठवडा दिवसा तर दुसरा आठवडा रात्री असे शेतीसाठीच्या विजेचे वेळापत्रक आहे. त्यामुळे ऊस तोड मजुरांबरोबर आता शेती सिंचनासाठी रात्री शेतात गेलेल्या शेतकरी-शेतमजुरांवरकील बिबट्या, वाघ, रानडुकरे, अस्वले यांचे हल्ले वाढू शकतात. शेतीला दिवसा वीज पुरवठा हा वन्यप्राणी - मानव संघर्ष टाळण्यासाठीचा एक प्रभावी उपाय म्हणून त्याकडे पाहायला हवे. राज्यात शेतीला दिवसा वीजपुरवठ्याच्या अनेकदा घोषणा झाल्या. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळापासून यासाठी आग्रही आहेत. परंतु अद्यापही शेतीला दिवसा वीजपुरवठा होत नाही..Agriculture Electricity Connection : कृषिपंप वीज संयोजनासाठी शेतकऱ्यांची वणवण.शेतकऱ्यांची मागणी २४ तास विजेची नाही, तर त्यांना दररोज दिवसा आठ तास वीज हवी असून, ती पूर्ण क्षमतेने द्या, असा त्यांचा आग्रह असून, तो रास्तच म्हणावा लागेल. परंतु त्यांच्या माथी रात्रीचीच अतिरिक्त व शिल्लक वीज मारली जाते. दिवसा विजेचा वापर आणि मागणी अधिक असते, त्यामुळेच तर शेतीची वीज कमी करून ती घरगुती वापरासह उद्योगाला पुरविली जाते. रात्रीची वीज शेतकऱ्यांना कोणत्याच दृष्टीने फायदेशीर ठरत नाही. वन्यप्राण्याबरोबर रात्री साप, किडे-किटूक चावण्याचाही धोका अधिक असतो. राज्यात पाण्याच्या कार्यक्षम वापराकरिता ठिबक, तुषार सिंचनाचा अवलंब वाढला आहे.. Agriculture Electricity Connection : शेतकऱ्यांनी मागणी केल्यास वीज कनेक्शन मिळणार महावितरण अधिकाऱ्यांच्या सूचना.रात्री ड्रीपर अथवा स्प्रिंकलर बंद पडले तर ते लक्षात येत नाही. लक्षात आले तर दुरुस्त करणे अवघड असते. शिवाय रात्री फर्टिगेशन करणेही अशक्यप्राय आहे. विजेच्या लपंडावात पंप वारंवार चालू बंद करणेही रात्री मोठे जिकिरीचे ठरते. रात्रीच्या वेळी फ्यूज उडाला अथवा कुठे काही बिघाड झाला तर लाइनमन हजर नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्र विजेच्या प्रतीक्षेत घालवावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा कसा होईल, यावर आता खरेच गांभीर्याने विचार आणि कृतीची देखील गरज आहे. राज्यात अतिरिक्त वीज उपलब्ध असल्याचा दावा वारंवार केला जातो..असे असताना केवळ नियोजनाअभावी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत नाही. शेतकऱ्यांचा वीजवापर १५ टक्के असून गळती ३० टक्के आहे. १५ टक्के गळती शेतकऱ्यांच्या नावे खपविली जाते. तसेच बहुतांश शेतकऱ्यांना होणारे विजेचे बिलिंगही दुप्पट केले जाते. विजेची गळती थांबवून सौर शेती फीडर योजना द्रुतगतीने संपूर्ण राज्यभर अंमलात आणल्यास शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जाऊ शकतो, असे यातील जाणकार सांगतात. सौरऊर्जा निर्मितीमध्ये तेलंगणा राज्याने आघाडी घेतली म्हणून त्यांना मोफत आणि २४ तास शेतीसाठी वीजपुरवठा करता येत आहे. शेतीसाठीच्या प्रगत राज्यात मात्र शेतकरी अजूनही दिवसा विजेच्या प्रतीक्षेतच आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.