Lasalgaon Market Wheat Supply: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ६) गव्हाची ३,९८१, विंचूर उपबाजार आवारात ४,५७५, तर निफाड उपबाजार आवारात ७४५ क्विंटल आवक नोंदविली गेली. आत्तापर्यंत लासलगाव व विंचूर येथे एका दिवसात झालेली ही सर्वाधिक आवक ठरल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. गव्हाला किमान २०००, कमाल २,६२७ व सरासरी २,२६१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. .निफाड तालुक्यातील पाणी उपलब्धता आणि शेतकऱ्यांनी सुधारीत वाण व पीक पद्धतीचा केलेला वापर यामुळे उत्पादकतेत वाढ दिसून आली आहे, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले. गेल्या आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण ६३ हजार ५१७.०६ क्विंटल गव्हाची आवक झाली होती..Wheat Direct Selling: ‘गहू कोठार’ यंदा समृद्ध; थेट विक्रीवर शेतकऱ्यांचा भर.त्यावेळी किमान भाव १५०१ रुपये, कमाल ३,७०० रुपये, तर सरासरी २,७१६ रुपये इतका दर मिळाला होता. यंदा सध्या मिळणारे दर सरासरी पातळीवर स्थिर असून, उत्पादन वाढल्याने दरांवर दबाव आहे. कांदा लागवडी करताना अडचणी आल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून गव्हाला पसंती दिल्याने क्षेत्र वाढल्याचे एकंदरीत पाहायला मिळाले..पाच वर्षांत आवकेत घट; दरात वाढगेल्या पाच वर्षांत (२०२०-२१ ते २०२४-२५) ‘आवकेत घट आणि दरात वाढ’ असा स्पष्ट कल दिसून येतो. २०२०-२१ मध्ये जेव्हा आवक १ लाख ३९ हजार २९०.६१ इतकी उच्चांकी होती, तेव्हा सरासरी दर केवळ १,७०७ रुपये होता. मात्र, २०२४-२५ पर्यंत आवक निम्म्याहून अधिक घटून ६३,५१७.०६ वर आली. यावेळी सरासरी दराने २,७१६ रुपयांचा उच्चांक गाठला आहे. २०२०-२१ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये सरासरी दरात सुमारे ५९ टक्के वाढ झाली आहे..Wheat Market: गव्हाची वाढली आवक, पण ज्वारीने खाल्ला भाव.गेल्या पाच वर्षातील स्थिती (दर रुपयांत)वर्ष आवक (क्विंटल) किमान कमाल सरासरी२०२०-२१ १३९२९०.६१ १००० २५२६ १७०७२०२१-२२ ८२७८३.०५ १००० २७७१ १९००२०२२-२३ ६६३५२.४१ १४०० ३४०१ २४०३२०२३-२४ ९६६८४.१७ १००० ३५०० २५१५२०२४-२५ ६३५१७.०६ १५०१ ३७०० २७१६.असे राहिले दर (ता. ६ एप्रिल रोजी)बाजार आवार आवक किमान कमाललासलगाव मुख्य आवार ३९८१ २००० २६२७विंचूर उपबाजार आवार ४५७५ २००० २५५०निफाड उपबाजार आवार ७४५ २०२६ २६००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.