Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean : सोयाबीन हंगामाची स्थिती काय राहील?

युएसडीएनं जागातील सोयाबीन उत्पादन वाढीचाही अंदाज व्यक्त केलाय. यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी वाढेल, तसंच जागतिक गाळपही अधिक राहण्याची शक्यता आहे.

पुणेः जगात २०२१-२२ च्या हंगामात महत्वाच्या सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) देशांचं उत्पादन घटलं होतं. ब्राझील आणि अर्जेंटीनात (Argentina Soybean Production) दुष्काळाचा फटका बसला. तर अमेरिकेतील उत्पादन (America Soybean Production) उद्दीष्टाच्या तुलनेत कमी राहील. मात्र २०२२-२३ च्या हंगामात जागतिक उत्पादनात (Global Soybean Production) ११ टक्के वाढ होईल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने व्यक्त केलाय. मग भारतात सोयाबीन बाजाराची काय स्थिती राहू शकते? सोयापेंड उत्पादन (Soymeal Production) आणि वापर कसा राहील? याची सविस्तर माहिती घेऊया आजच्या मार्केट ट्रेंडमधून.

युएसडीएनं जागातील सोयाबीन उत्पादन वाढीचाही अंदाज व्यक्त केलाय. यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी वाढेल, तसंच जागतिक गाळपही अधिक राहण्याची शक्यता आहे. चालू वर्षात ब्राझीलमधील उत्पादन १८ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर अमेरिकेत दीड टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. अमेरिकेत यंदा बऱ्याच भागांत दुष्काळी स्थितीचा फटका बसतोय. अर्जेंटीनात ६ टक्क्यांनी उत्पादन वाढेल, असंही युएसडीनं म्हटलंय.

Soybean Rate
Soybean : अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटणार

युएसडीएने यंदा भारतात ११५ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत देशात यंदा सोयाबीन उत्पादन ४ लाख टनांनी कमी राहील. विशेष म्हणजे मागील हंगामात चांगला दर मिळाल्याने यंदा लागवड वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र तरीही युएसडीने देशात उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला.

Soybean Rate
Soybean : अमेरिकेत सोयाबीन उत्पादनाची स्थिती काय ?

भारतात यंदा उत्पादन घटणार असलं तरी सोयाबीन गाळप तीन लाख टनांनी वाढणार आहे. सोयाबीन गाळप केल्यानंतर तेल आणि पेंड मिळते. त्यामुळे सोयापेंड उत्पादन वाढेल. यंदा भारतात ८० लाख टन सोयापेंड निर्मितीची शक्यता आहे. तर मागीलवर्षी ७७ लाख टन सोयापेंड मिळाली होती. उत्पादन वाढीसह सोयापेंड वापरही वाढण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ६४ लाख टन सोयापेंडचा देशात वापर झाला होता. तो यंदा ६८ लाख टनांवर पोचेल. देशात २०२१-२२ मधील १० लाख ३४ हजार टन सोयाबीनचा शिल्लक साठा असेल. त्यामुळं सोयापेंड उत्पादन मागीलवर्षीच्या तुलनेत अडीच लाख टनांनी वाढणार आहे. मात्र देशातील सोयापेंड वापरही साडेचार लाख टनाने वाढेल, असंही युएसडीएनं म्हटलंय.

म्हणजेच, देशात यंदा मागील वर्षातील शिल्लक सोयाबीन १० लाख टन राहील. मात्र उत्पादन ४ लाख टनानं घटणार आहे. तर सोयाबीन गाळप वाढून सोयापेंड उत्पादन अडीच लाख टनाने अधिक राहील. सोयापेंडचा वापरही साडेचार लाख टनांनी वाढणार आहे. म्हणजेच यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये जास्त तफावत नसेल. यंदाच्या हंगामातही सोयाबीनला चांगली मागणी राहू शकते. यामुळं शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळू शकतो. सोयाबीन हंगामात शेतकऱ्यांना पाच ते साडेपाच हजारांच्या दरम्यान दर मिळण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता जाणकारांनी व्यर्तविली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com