Khandesh Fruit Market: खानदेशात यंदा कलिंगड लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी पश्चिम आशियातील युद्धभडाक्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्याचा काळ हंगामी फळांच्या रेलचेलीचा असला तरी कलिंगडाचे दर मात्र नीचांकी पातळीवर घसरले आहेत. शेतकऱ्यांना जागेवरच प्रतिकिलो २ ते ३ रुपये मिळत दर आहे..गेल्या दशकभरात खानदेशात टरबूज व कलिंगड लागवडीचे प्रयोग वाढले आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या या पिकाचा उत्पादन खर्च जास्त असूनही एकरी सुमारे लाखभर रुपयांचे मिळणारे हे उत्पन्न खुणावत असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळले. पण आता त्यांचा अपेक्षाभंग होत असल्याची परिस्थिती आहे. कारण, हे पीक आता तोट्यात ढकलणारे ठरू लागले आहे..Watermelon Price: कलिंगड, खरबुजाचे दर पडल्याने उत्पादक सापडले अडचणीत.नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान खानदेशात ११ हजार हेक्टरवर कलिंगड लागवड झाली. नोव्हेंबरमध्ये एकरी ५ ते ६ टन उत्पादन मिळाले, तर प्रतिकिलो १२ ते २१ रुपये दर जागेवर मिळाले..Watermelon Price Crash: खरेदीदारांकडून उठाव नसल्याने कलिंगड शेतात पडून.फेब्रुवारीपासून दर घसरू लागले. परंतु, फेब्रुवारीअखेरपर्यंत मात्र दर चांगले राहिल्याने लागवड वाढत गेली. फेब्रुवारीनंतर आखातात युद्ध सुरू झाले. त्याचा थेट परिणाम कलिंगड बाजारावर झाला..मार्चअखेर काढणीला आलेल्या कलिंगडाची खरेदी करताना खरेदीदारांची चलबिचल वाढली. तसेच, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.