Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागांत खरिपातील उडदाची काढणी बऱ्यापैकी उरकली आहे. त्यामुळे येथील बाजार समितीसह जिल्हाभरातील बाजार समितीत उडदाची आवक वाढली आहे. मात्र आवक वाढताच दरात घट झाली आहे. .आवक वाढताच सर्वच बाजार समित्यात हमी दरापेक्षा कमी दराने उडदाची खरेदी होत आहे. उडदाला ५ हजार ते ६ हजार ३०० व सरासरी ५ हजार ६५० रुपयांचा दर मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत खरिपात उडदाचे पीक घेतले जाते. प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला व लकवर पाऊस झाला तर मूग आणि उडदाचे क्षेत्र वाढत असते. .Urad Sowing : शेतकऱ्यांनी उडीद पिकाखालील क्षेत्र वाढवावे .यंदा लवकर पावसाला सुरुवात झाल्याने उडदाच्या क्षेत्रात काहीशी वाढ होईल, असे वाटत होते, मात्र क्षेत्र वाढले नाही. यंदा राज्यात ३,७७,८४२ हेक्टरवर उडदाचे पीक घेतले. त्यात प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यात ७२,०२६ हेक्टर, सोलापूर जिल्ह्यात १,०७,५३२ हेक्टर, सांगली जिल्ह्यात १९,९२५ हेक्टर, बीड जिल्ह्यात ५१,२३६ हेक्टर, धाराशीव जिल्ह्यात ५१,२३६ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात १४,१९९ हेक्टरवर उडदाचे पीक घेतले. .आता खरिपातील उडदाची काढणी बऱ्यापैकी उरकत आली आहे. मागील पंधरा दिवसांत झालेल्या पावसाने उडदाचे नुकसानही झाले आहे. बाजारात उडदाची आवक बऱ्यापैकी होत आहे. सध्या एकट्या अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ५०० ते ६०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. .Urad Crop Damage: पावसाने उडदाची हानी, पीक काढणीवर.मात्र खरिपातील उडदाची आवक वाढली की बाजारात दर कमी झाले आहेत. सध्या मालाचा दर्जा चांगला नसल्याचे सांगत खरेदीदार हमी दरापेक्षा कमी दराने (नॉन एफएक्यु) दराने उडदाची खरेदी करत असून ५ हजार ते ६ हजार ३०० व सरासरी ५ हजार ६५० रुपयांचा दर मिळत आहे. .मुगापाठोपाठ आता उडदाचीही बऱ्यापैकी विक्री होत असताना शासनाकडून मात्र अजूनही सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत. केंद्रे सुरू होतील की नाही याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अनभिज्ञ आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दरानेच उडदाची विक्री करावी लागणार आहे, असे दिसतेय..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.