Hingoli News: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीच्या दरात चढउतार सुरू आहेत.शुक्रवारी (ता. ३१) कमाल हळदीची १८०० क्विंटल आवक असतांना प्रति क्विंटल किमान ११००० ते कमाल १४००० रुपये तर सरासरी १२५०० रुपये दर मिळाले. अनेक महिन्यानंतर दरात सुधारणा होऊन हळदीचे कमाल १४००० रुपयांवर पोहोचले आहेत..हिंगोली बाजार समितीत २०२५ च्या हंगामातील नवीन हळदीची आवक सुरू झाली तेव्हापासून हळदीचे दर १३ हजार रुपयांच्या आतच आहेत. केवळ एप्रिल महिन्यात सरासरी १२९७२ रुपये दर मिळाले. त्यानंतर मे ते जून या कालावधीत सरासरी दर प्रति क्विंटल १०८०५ ते ११९५९ रुपये राहिले. सप्टेंबर महिन्यात हळदीच्या दरात घसरण होऊन किमान दर १०००० रुपयापेक्षा कमी झाले होते..Turmeric Market: हिंगोली बाजार समितीत हळदीची १ लाख ९८ हजार क्विंटल आवक.४ सप्टेंबर रोजी प्रतिक्विंटल किमान ९५००, १५ व २३ सप्टेंबर रोजी किमान ९९०० रुपये, २४ सप्टेंबर रोजी ९९५० रुपये,२५ सप्टेंबर रोजी ९८४० रुपये, २६ सप्टेंबर रोजी किमान ९५०० रुपये दर मिळाले. सप्टेंबर महिन्यात हळदीची ३५०८५ क्विंटल आवक होऊन सरासरी १०८०५ रुपये दर मिळाले. अनेक महिन्यानंतर १ ऑक्टोबर पासून हळदीच्या दरात सुधारणा झाली असून कमाल दर १३००० रुपयांवर पोहोचले..Turmeric Price: हळदीचे दर स्थिरावले; तसेच काय आहेत आले, लसूण, मूग आणि शेपूचे आजचे बाजारभाव .१ ते १५ ऑक्टोंबर पर्यंत १७०३१ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान १०००० ते कमाल १३९०० सरासरी तर ११६६३ रुपये दर मिळाले. १६ ऑक्टोबर रोजी कमाल दर १४००० रुपयांवर पोहोचले. १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान दिवाळीनिमित्त मार्केटमधील लिलाव बंद राहिले. दिवाळीनंतर हळदीच्या किमान दरात २०० ते ६०० तर कमाल दरात १०० ते ४०० रुपये चढउतार झाले. सरासरी १२५०० ते १३०५० रुपये दर मिळाले. दरात सुधारणा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी साठवूण ठेवलेली हळद विक्रीसाठी काढल्यामुळे मार्केटमधील आवकेत वाढ झाली आहे..संत नामदेव हळद मार्केट दर स्थिती (आवक क्विंटलमध्ये)तारिख आवक किमान दर कमाल दर सरासरी दर रुपये२७ ऑक्टोबर १८०० ११५०० १३६०८ १२५५०२८ ऑक्टोबर १५०० ११८०० १३८०० १२८००२९ ऑक्टोबर १७०० ११३०० १३९०० १२६००३० ऑक्टोबर १८०० ११९०० १४२०० १३०५०३१ ऑक्टोबर १८०० ११००० १४००० १२५००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.