Crop Cultivation: मागील दोन महिन्यांपासून हळद लागवडीत उष्ण हवामानाने खोडा घातला आहे. अर्धा जून उलटला असतानाही मॉन्सूनची अद्याप प्रतीक्षा आहे. देशभरात आतापर्यंत अंदाजे अवघी १० ते १५ टक्क्यांपर्यंतच हळद लागवड पूर्ण झाली आहे. लागवडीचा कालावधी संपल्याने यंदा हळदीखालील क्षेत्र घटण्याची शक्यता हळद उद्योगातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातच उष्ण हवामानाचा हळदीच्या उगवण क्षमतेवर परिणाम होत आहे..देशातील प्रमुख हळद उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश होतो. हळद उत्पादक राज्यांमध्ये सर्वसाधारणपणे मे महिन्यापासून लागवडीला सुरुवात होते. जूनच्या मध्यापर्यंत लागवड पूर्ण केली जाते. गतवर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाल्याने हळद लागवडीवर परिणाम झाला होता. बहुतांश भागांत लागवड लांबणीवर पडली होती. मात्र हळद क्षेत्रात घट झाली नव्हती. गतवर्षी देशात ३ लाख १२ हजार ९१ हेक्टरवर लागवड झाली होती. सततच्या पावसाचा उत्पादनावर फारसा परिणाम झाला नाही. भारतीय मसाला बोर्डाच्या अहवालानुसार गतवर्षी ११ लाख ३७ हजार ६०६ टन इतके हळदीचे उत्पादन झाले..Turmeric Cultivation: वाशीममध्ये हळद लागवडीला सुरुवात.गतवर्षीच्या हंगामात हळदीला चांगले दर मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी हळद लागवडीसाठी मोठी तयारी केली होती. बियाण्यांची खरेदी करून ठेवण्यापासून ते लागवडपूर्व मशागतीपर्यंतची कामे शेतकऱ्यांनी वेळेत पूर्ण केली होती. मे महिन्यात लागवडीला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र उष्ण हवामानाने लागवडीत व्यत्यय आणला. महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेले. इतर हळद उत्पादक राज्यांमध्येही उष्णतेची तीव्रता कायम राहिली. त्यामुळे शेतकरी पूर्वमोसमी पावसाची प्रतीक्षा करू लागले होते. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने लागवडीचे नियोजन रखडले..Turmeric Cultivation: रिसोड तालुक्यात यंदा हळद लागवडीत वाढ होण्याची शक्यता.उशिराच्या लागवडीमुळे उत्पादनात घट शक्यशेतकरी अद्याप हळद लागवडीसाठी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस सुरू झाला तर लागवडी होतील. यंदाही गतवर्षीइतकीच लागवड होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र लागवडी झाल्या तरी वाढते तापमान आणि प्रतिकूल वातावरणाचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..यंदा उष्ण हवामान आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सूनचा पाऊस लांबला आहे. या दुहेरी संकटांमुळे हळद लागवड कमी झाली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर लागवडी होतील, असा अंदाज आहे.- डॉ. मनोज माळी, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.हळद लागवड केली आहे; मात्र आता पाण्याची कमतरता जाणवत आहे. उष्ण हवामानामुळे हळदीच्या उगवण क्षमतेवर परिणाम होऊ लागला आहे. सद्यःस्थितीत एकूण लागवडीच्या १० टक्के उगवण झाली आहे. पाऊस लांबल्यास नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतीपंपाच्या विजेचे दोन तास कमी केले आहेत, त्यामुळे उपलब्ध पाण्यावर पीक जगवणे शक्य नाही.- राजेंद्र गायकवाड, कृषिभूषण, हळद उत्पादक शेतकरी, भुईंज, सातारा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.