Pune News: देशात तुरीचे घटलेले उत्पादन, हमीभावाने खरेदीचा आधार, कमी पुरवठा यासह आंतरराष्ट्रीय बाजारातील तुटवडा आणि चांगली मागणी यामुळे तुरीच्या भावात चांगली तेजी आली आहे. तुरीचा भाव ८५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाववाढीसाठी पोषक वातावरण असून, तूर यंदा ९ हजारांचा टप्पा गाठू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..देशातील तूर उत्पादन सलग तिसऱ्या वर्षी कमी झाले आहे. केवळ उत्पादनच कमी झाले नसून अनेक भागांत गुणवत्ताही खालावली असल्याचे चित्र आहे. देशात ४५ ते ४७ लाख टनांच्या दरम्यान तुरीची गरज असते. पण आजघडीला उत्पादन कमी आहे. सरकारच्या अंदाजानुसार, यंदा उत्पादन ३६ लाख टनांच्या दरम्यान राहू शकते. अभ्यासकांच्या मते, २८ ते ३२ लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होईल. मागील दोन वर्षे सरकारने आयात वाढवून देशात तूर पुरवठा वाढविला होता. मागील वर्षभर तुरीचे भाव खूपच पडले होते. त्यामुळे केवळ देशातच नाही, तर निर्यातदार देशांमध्येही उत्पादन कमी झाले आह.Cotton,Tur Prices: अकोटमध्ये कापूस, तुरीच्या दरात जोरदार तेजी.शिल्लक साठा कमीदेशात कमी उत्पादनासोबतच तुरीचा शिल्लक साठाही कमी आहे. सरकारकडे केवळ ४.५ लाख टन साठा असल्याची माहिती आहे. मागील हंगामात ६.५ लाख टनांची खरेदी सरकारने केली होती. यंदा देशातील पुरवठा कमी राहून आयातही कमी राहणार, हे निश्चित झाल्यानंतर तुरीच्या भावात तेजी आली आहे. तुरीचे भाव डिसेंबरच्या तुलनेत आजघडीला एक हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. तर सप्टेंबरच्या तुलनेत २ हजारांनी वाढले आहेत. नव्या तुरीची बाजारात आवक सुरू झाल्यापासूनच भावात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे..हमीभाव खरेदीमुळे ‘बूस्ट’सरकार यंदा हमीभावाने तुरीची खरेदी करणार आहे. महाराष्ट्रात ३.३६ लाख टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातमध्येही तुरीची खरेदी सुरू आहे. यंदा सरकारने तुरीसाठी ८ हजार रुपये हमीभाव जाहीर केला. सरकार तुरीची १०० टक्के खरेदी करणार, अशीही चर्चा सुरू आहे. त्यातच उत्पादन कमी असल्याने शेतकरी हमीभावाच्या खाली तूर विकणार नाहीत, हे निश्चित होते. त्यामुळे बाजारात भाववाढीला ‘बूस्ट’ मिळाला..Tur Prices: मुरूम बाजार समितीत तुरीला उच्चांकी भाव.निर्यातदार देशांतही घटयंदा निर्यातदार देशांमध्येही तुरीचे उत्पादन घटले आहे. २०२३-२४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचा भाव १५०० डॉलर प्रति टनांपर्यंत पोहोचला होता. तर २०२४-२५ मध्ये हा भाव कमी होऊन ६०० डॉलरपर्यंत स्थिरावला. त्यामुळे आफ्रिका आणि म्यानमारमध्ये तुरीची लागवड कमी झाली. आफ्रिकेत १३ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज होता. पण प्रत्यक्ष उत्पादन ९ लाख टन झाले. म्यानमारमध्ये यंदा ३ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. पण अभ्यासकांच्या मते उत्पादन २० टक्क्यांपर्यंत कमी राहील. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची उपलब्धता कमी असणार आहे. यामुळे देशातील बाजारात तुरीचे भाव वाढण्यास मदत झाली आहे..भाववाढ कायम राहणारदेशातील बहुतांशी बाजारांत सध्या तुरीचे भाव ८ हजारांच्या पुढे आहेत. सरासरी बाजारभाव ८ हजार २०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. सध्या भावावरून काहीसे चढ-उतार अपेक्षित असले तरी तूर तेजीतच राहण्याची शक्यता आहे. सध्या तुरीची आयात खुली असूनही तेजी आली आहे. भाव कमी करण्यासाठी सरकारने ‘स्टॉक लिमिट’ लावले तरी भाव पडण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे तूर ९ हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..देशातील तूर उत्पादन यंदा २८ लाख टनांवर स्थिरावले आहे. आफ्रिका आणि म्यानमारमध्येही उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे आयात कमी झाली आहे. तुरीला मागणी चांगली आहे. परिणामी, तुरीच्या भावात तेजी आली आहे. तुरीचे भाव यंदा टिकून राहण्याची शक्यता आहे. राहुल चौहान, शेतीमाल बाजार विश्लेषक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.