Tur Market: तूर उत्पादन ३० लाख टनांवरच स्थिरावणार?

देशातील तूर उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज सर्वच पातळ्यांवरून व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला केंद्र सरकारने यंदा देशातील तूर उत्पादन ३९ लाख टनांवरच स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला.
Tur Market
Tur MarketAgrowon

पुणेः देशातील तूर उत्पादन (Tur Production) यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटले. यंदा देशातील तूर (Tur Rate) उत्पादन ३० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज कडधान्य (Pulses) उद्योग आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. तसंच यंदा ८ लाख टनांच्या दरम्यान आय़ात (Tur Import) होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.

देशातील तूर उत्पादन (Tur Production in India) यंदा कमी राहण्याचा अंदाज सर्वच पातळ्यांवरून व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला केंद्र सरकारने यंदा देशातील तूर उत्पादन ३९ लाख टनांवरच स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला.

तर मागील हंगामात ४३ लाख ५० हजार टन उत्पादन झाले होते. पण केंद्राचा हा पहिला अंदाज होता. पुढील काही दिवसांमध्ये केंद्राचा दुसरा अंदाज येण्याची शक्यता आहे. या अंदाजात केंद्र सरकार तूर उत्पादनाचा अंदाज आणखी कमी करण्याची शक्यता आहे.

प्रक्रिया उद्योग आणि व्यापारी जगतानेही आता देशातील तूर उत्पादनाचा अंदाज जारी केला. त्यानुसार यंदा देशातील तूर उत्पादन ३० लाख टनांवरच स्थिरावेल, असं म्हटलंय.

यंदा तूर लागवडीला उशीर झाला, पावसाचं प्रमाण कमी जास्त राहीलं, कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळं यंदा उत्पादनात मोठी घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्योगाचा हा अंदाज खूपच कमी असला तरी त्याला अनेक जाणकारांनीही पसंती दिली आहे.

असा राहील पुरवठा

यंदा देशात ३० लाख टन तूर उत्पादन होणार आहे. तर मागील हंगामातील शिल्लक साठा ७ लाख ५५ हजार टन आहे. तर आयात ८ लाख १० हजार टनांवर होईल.

म्हणजेच यंदा देशात तुरीचा एकूण पुरवठा ४५ लाख ६५ हजार टनांचा असेल. तर देशात दरवर्षी जवळपास ४४ लाख टनांचा वापर होतो.

म्हणजेच देशातील तूर पुरवठा मागणीच्या तुलनेत जास्त नसेल. पुढील हंगामासाठी केवळ १ लाख ७० हजार टन तूर शिल्लक राहील.

Tur Market
Tur Market: देशातील तूर उत्पादनात मोठी घट होणार | Agrowon

म्यानमारमधून किती आयात होऊ शकते?

म्यानमारमध्ये यंदा २ लाख ७५ हजार टन तूर उत्पादन झाले, असं येथील उद्योगानं स्पष्ट केलं. तर म्यानमारमध्ये मागील हंगामातील शिल्लक साठा २५ हजार टनांचा आहे.

म्हणजेच यंदा एकूण तुरीची उपलब्धता ३ लाख टनांच्या दरम्यान राहील. यापैकी भारताला २ लाख ७० हजार टनांपर्यंत निर्यात होऊ शकते.

आफ्रिकेतून किती तूर येऊ शकते?

आफ्रिकेतील देशातून भारताला मोठ्या प्रमाणात तूर निर्यात केली जाते. यंदा आफ्रिकेतील महत्वाच्या देशांमध्ये ६ लाख ते ६ लाख ५० हजार टन तूर उत्पादनाचा अंदाज आहे.

यापैकी जवळपास ५ लाख ७५ हजार टन भारताला निर्यात होऊ शकते, असा अंदाज आयातदारांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com