Tur Market Update: स्थानिक बाजार समितीत तुरीच्या दराने मंगळवारी (ता. ६) दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. बाजार समितीत १०८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. कमाल १०,३०५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तुरीचा सरासरी दर ९६०० रुपये, तर किमान दर सुमारे आठ हजार रुपये प्रति क्विंटल राहिला.