Akola News: स्थानिक बाजार समितीत तुरीचा कमाल दर ८२४५ रुपये आणि किमान दर ७००० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला असून, सरासरी दर सुमारे ८००० रुपये प्रति क्विंटल आहे. हा दर शासनाने ठरवलेल्या आधारभूत दराच्या (८००० रुपये) जवळपास मिळत आहे. .सध्या तुरीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, शेतकऱ्यांची माल विक्रीची गती वाढली आहे. खुल्या बाजारात मिळणाऱ्या योग्य दरामुळे शासकीय केंद्रावरील विक्रीपेक्षा स्थानिक पातळीवर विक्री करून शेतकरी मोकळे होत आहेत..Tur MSP Procurement: दहा खरेदी केंद्रांवर तूर खरेदीला सुरुवात.येथील बाजार समितीत सध्या दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. विशेष म्हणजे, या वर्षी तुरीची उत्पादकता काही ठिकाणी समाधानकारक आलेली आहे. सध्या कोरडवाहू पट्ट्यातील पिकाची काढणी होत आहे. हा माल बाजारात विक्रीला येण्याचे प्रमाण वाढले आहे..Tur Cultivation: तूर लागवडीतून शेतकऱ्यांना मिळतोय आधार.हरभऱ्याची आवक टिकूनबाजार समितीत हरभऱ्याची आवकसुद्धा गेले काही दिवस टिकून आहे. बाजारात मंगळवारी सुमारे ३१०० क्विंटलची आवक झाली होती. हरभऱ्याचा कमाल दर ५३५० आणि किमान दर ५१०५ रुपये मिळाला..सरासरी ५२५० रुपयांपर्यंत हा दर मिळत आहे. या दरांमध्ये स्थिरता आल्याचे दिसून येते. गव्हाचा हंगाम सुरू झाल्याने आवक वाढत चालली आहे. बाजार समितीत १४०० क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. बाजारात गव्हाला सरासरी २४६५ रुपये दर मिळाला. कमाल दर २६३० आणि किमान २२०० रुपये दर होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.