H-1B visa: आयात शुल्काच्या माध्यमातून अवघ्या जगाला वेठीस धरणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज वाढीव व्हिसा शुल्काचा बाँब टाकला. ‘एच-वन बी’ व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करत ते दोन ते पाच हजार डॉलरवरून थेट एक लाख डॉलरवर (८८ लाख रुपये) नेण्यात आले आहे.