Nashik news: मागणीच्या तुलनेत टोमॅटोची दुप्पटीने आवक होत असल्याने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला आवारात टोमॅटो दरात घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आवक १.५० लाख क्रेट झाली आहे. गेल्या १० दिवसांत दरात मोठी घसरण होऊन २० किलोच्या क्रेटला ४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे..टोमॅटोसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये हंगामाच्या प्रारंभी प्रति क्रेट हजार रुपये असा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण होते. पण गेल्या दोन दिवसांपासून दररोज १.५ लाखांवर क्रेट टोमॅटोची आवक सुरू आहे. पोषक वातावरणामुळे एकरी दीड हजार क्रेट म्हणजे सरासरीपेक्षा दुप्पटीने टोमॅटोचे उत्पादन निघत आहे..Tomato Crop Disease: टोमॅटो पिकातील खोडकुज रोगाचे व्यवस्थापन.शिवाय गोलाकार व कवडी फुटलेल्या दर्जेदार टोमॅटोचे यंदा उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. परिणामी पिंपळगावसह हिवरगांव, नारायणगाव, बेंगलोर येथेही टोमॅटोची बंपर आवक सुरू आहे. पिंपळगाव बाजार समितीचे आवार टोमॅटोच्या आवकेने मंगळवारी (ता. २६) भरले होते. टोमॅटो विक्रीसाठी आलेल्या वाहनांच्या लांबच लाब रांगा जोपूळ रस्त्यावर दिसत होत्या. पिंपळगाव बाजार समितीत कमाल ६०१, सरासरी ४०१ अशा दराने टोमॅटोची विक्री झाली..Tomato Rate : कोल्हापुरातील टोमॅटो शेतकऱ्यांवर आर्थिक संकट; खर्च २० रूपयांचा दर ५ रूपये.दुबईला निर्यातीची प्रतीक्षाउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाना, दिल्ली, राजस्थान येथून पिंपळगाव बसवंतच्या टोमॅटोला मोठी मागणी आहे. कर्नाटक वगळता परराज्यात सध्या टोमॅटोची स्थानिक आवक नाही. संपूर्ण भारताची टोमॅटोची भिस्त सध्या नाशिक जिल्ह्याची टोमॅटोवर आहे. पण मागणीच्या तुलनेत दुप्पट टोमॅटो पोहोचत असल्याने दर कोसळले आहे. बांगलादेशमध्ये निर्यात सुरू आहे. अद्याप दुबईची निर्यात सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. तसे झाल्यास दरात सुधारणा होऊ शकते..पूरक वातावरणामुळे एकरी उत्पादन दुप्पटीने वाढले आहे. परराज्यात मागणीच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त टोमॅटो पोहोचत आहे. परिणामी बाजारभाव निम्म्याने कोसळले आहे.सोमनाथ निमसे, मातोश्री व्हेजिटेबल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.